एखाद्या गोष्टीसाठी आपले शरीर, मन पात्र होते, तेव्हा ती गोष्ट आपल्या जीवनात चमत्कारिक रित्या प्रगट होते

श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामी भक्त हो नमस्कार,

मागील स्वामी वानित आपण बघितले की स्वामींनी गोसव्याला सांगितले. बैरागी बुवा तुम्हाला श्री कृष्णाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे ना. ती नक्की पूर्ण होईल. भरोसा ठेवा. स्वामी भक्त हो जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपले शरीर, मन पात्र होते. तेव्हा ती गोष्ट आपल्या जीवनात चमत्कारिक रित्या प्रगट होते. हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे. आणि आपली पात्रता वाढविण्याचे कार्य स्वामी करत असतात.

गोसव्यास जलोदराच्या व्याधितून मुक्त केल्यावर गोसावी अक्कलकोट मध्ये राहू लागला. स्वामींच्या लीला आणि स्वामींची शिकवण समजावून घेऊ लागला. द्वारकेला जावून श्री कृष्णाचे सगुण दर्शन घ्यावे ही इच्छा त्याच्या अंतर्मनात होतीच. स्वामी कृपा ग्रहण करण्यासाठी त्या गोसाविचे शरीर आणि मन पात्र झाले होते.

आणि तो योग आला एके दिवशी मेहेंदरगीचे पांडुरंग सोनार स्वामीसाठी मोत्याचे कुंडले आणली होती. ते त्यांनी स्वामींच्या कानात घातली. त्या दिवशी भक्त मंडळींची भरपूर गर्दी झालेली होती. अनेक लोक स्वामींचे दर्शन घेत होते आणि त्या गर्दीत हा गोसावी सुद्धा आलेला होता. गोसव्या ची अनन्य भक्ती स्वामी पर्यंत पोहोचली होती. आणि म्हणून गोसाव्याला स्वामींच्या ठिकाणी श्री कृष्ण दिसू लागले.

द्वारका नाथाचे सगुण रूप बघून गोसावी आनंदाने नाचू लागला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू येऊ लागले. मुखातून शब्द उमटू लागले. हे श्री कृष्णा हे भगवंता हे वैकुंठाधिपती हे द्वारका धीशा आणि स्वामींच्या चरणी तो वारंवार लोटांगण घालू लागला. सभोवताली जमलेले लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले. थोड्या वेळाने भानावर आला नंतर आणखी एक नवल घडले.

स्वामींच्या कानात असलेली मोत्याची कुंडले पाषाणाची झाली. स्वामींच्या अतर्क्य लीला बघून गोसाव्याचा विश्वास अजूनच दृढ झाला. आपली द्वारका धिशाची इच्छा पूर्ण झाल्यावर स्वामीच श्री कृष्ण आहेत हा विश्वास अधिक दृढ झाला. आणि पुढे तो अक्कलकोट मध्ये च राहिला. पुढे स्वामींच्या समाधी लीलेनंतर पुन्हा तीर्थ यात्रेला निघून गेला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

आजच्या स्वामींचा बोध खूपच छान आहे. मागील स्वामी वाणीत आपण पाहिले की जेव्हा आपण स्वामीना प्रार्थना करतो तेव्हा स्वामी महराज आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण सृष्टीला हुकूम देतात. यात स्वामी महाराज स्वतः श्री गुरु रूपाचे पात्र निभावत असतात. आपली इच्छा पूर्ती साठी ज्या ज्या गोष्टी आडव्या येतात.

त्यांना विलीन करून नकारात्मक सवयी मोडून विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सवयींचे संस्कार आपल्यावर करतात. आपले कर्म म्हणजे स्वामींची सेवा ही समज दृढ करून सेवा केल्यास नक्कीच जुन्या सवयींचा त्रास न होता सकारात्मक सवयी जोपासतो. आणि बघा जसा त्या गोसाव्या चा जलोदराचा तर त्रास घालवून कडुलिंबाचा पाला गोड करून त्याची श्रद्धा बळकट केली.

त्यामुळे तो अक्कलकोट मध्ये राहू लागला. स्वामींच्या सहवासात राहून त्याला अनेक शिकवण देत लीला करत त्याची भक्ती दृढ केली. आणि त्याची श्री कृष्ण दर्शनाची पात्रता तयार केली. आणि चमत्कारिक दृष्ट्या एके दिवशी त्याला स्वामींनी श्री कृष्ण रुपात दर्शन देऊन त्याची इच्छा देखील पूर्ण केली. अगदी तसेच आपल्या सुद्धा इच्छांची पूर्ती होते.

<
आजच्या लीलेतून बोध घेता हा दृढ विश्वास ठेवायचा आहे. आपली कोणतीही इच्छा असू दे प्रापंचिक असू दे की आध्यात्मिक असू दे. आपली इच्छा पूर्ण होण्याचे सृष्टीचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. जसे अ अधिक ब बरोबर क असे आहे. यासूत्रा त आपण अ आणि ब ची किंमत एक ठेवा किंवा करोडोंमध्ये ठेवा.

या सूत्रात बेरीज च होणार. अगदी तसेच स्वामींचे नियम सर्व इच्छा साठी सारखे असतात. आपली इचाच कितीही छोटी असुदे किंवा मोठी ज्या गोष्टींसाठी आपले शरीर मन पात्र बनते. ते आपल्याला मिळतेच. या लीलेत पांडुरंग सोनार यांनी मोत्याची कुंडले आणली होती. पण स्वामींचे श्री कृष्ण रुपात दर्शन झाले नाही.

पण एका दारोदार फिरणाऱ्या गोसाव्यास श्री कृष्ण चे दर्शन झाले. म्हणून एका मोत्याचे दगडात रुपांतर करून स्वामींनी आपल्याला हीच समज दिली आहे. की स्वामींच्या जवळ जायचे असेल, जीवनाची सर्वोच्च इच्छा पूर्ण करायची असेल तर भक्तीचा श्रद्धेच्या शक्तीने स्वतः ची पात्रता तयार करायला हवी. आणि पत्रात ही बाह्य भाग नसून पात्रता ही आंतरिक बाब आहे.

स्वामी साठी कोणी मोठा नाही की छोटा नाही. किंवा आज आपली परिस्थिती कशीही असो याच्याशी सुध्दा स्वामीना काहीही देणे घेणं नाही. या भूतलावर प्रत्येक मानवाची इच्छा पूर्ण होत आहेत. कृपेचा पाऊस सतत पडतं आहे. आपल्याला फक्त शरीराला कृपा ग्रहण करायच्या पात्रतेचे बनवायचे आहे.

चल तर मग आज आपण स्वामी ना प्रार्थना करूया. आम्हाला तुमच्या सेवेचे पात्र बनवा. या जीवनात स्वामिमय बनवा. जीवनातील प्रत्येक कर्माला सेवा बनवा. कोणी माझ्या जीवनाकडे बघितले तर बघणाऱ्या व्यक्तीला तुमचीच आठवण येऊ द्या. कारण तुमचा सेवेकरी बनण्यासाठी पुण्य लागते. तुमच्या सेवेच्या पात्रतेचे बनवा. श्री स्वामी समर्थ.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *