नमस्कार मित्रांनो,
आपण म्हणतो प्रपंच आणि परमार्थ यांची सागंड कशी घालवी.पण प्रपंच आणि परमार्थ एकत्र सादता येतो का,आपण म्हणतो की शेवटी मनाला स्थिर करणे, एखाद्या घटनेमध्ये बरोबर आहे की चूक आहे.
हे ठरवण्याआधी किंवा निर्णय घेण्याआधी, त्या घटनेला जज करण्याआधी निर्णय घेताना त्या घटनेला एखाद्या त्रयस्थ भूमिकेतून बघता यावं हे त्या भूमिकेसाठी खूप महत्त्वाचं आहे.
ती सहज मिळत नाही, त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. अहंकारासाठी आपण म्हणतो की मी बरोबर आहे आणि तू वाईट आहे.
अस वाटतं की मी हिरो आहे तो विलन आहे. तो जो काही विषय आहे तो आपण शोधायला लागू ना, तेव्हा आपल्याला कळेल,की प्रपंच महणजे काय, तर मला या जगात वावरायचा आहे.
मला या जगामध्ये सर्व गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. या जगाचा अर्थ शोधायचं, कुटुंब काय म्हणजे बाघायचं, मला मैत्री म्हणजे काय, हे प्रेम म्हणजे काय हे शोधायचं आहे.
मला आपुलकी हे म्हणजे काय हे जाणून घ्यायचे आहे. आपण मुलांना प्रेम देतो याचा अर्थ काय हे अनुभव घ्यायचा आहे. हे सगळे जे काही भाव आहेत ते शेवटी आपल्या अस्तित्वाला पूर्ण करणारे भाव आहेत.
हा जो काही आपला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आहे आपला आणि ह्याच जर चित्र काढायचे झाल. आणि आपण जर फक्त एकच रंग वापरला लाल रंग वापरला, पिवळा रंग वापरला,तर ते चित्र अधुर वाटेल.
जेव्हा ते सप्तरंगी होतं तेव्हा ते सुंदर दिसायला लागते. जीवनामध्ये हा एवढा वायरल एक्सपिरीयन्स, एवढा प्रचंड असा अनुभव मिळावा.
नोकरी करता यावी, व्यवसाय करता याव, जग फिरता याव, लोकांना भेटता यावे, वेगवेगळे अनुभव घेता यावे. जागा बघता यावी. हा जो सगळा काही लार्ज आणि लाईफ अनुभव जीवनात पाहिजे.
त्यालाच प्रपंच म्हणावं असं मला वाटत, आज आपण प्रपंच कशाला म्हणतो, की नवरा बायकोने घर चालवणे इथपर्यंत तर आणून ठेवले आपण, पण इतकं संक्षिप्त कसं असू शकेलं.
माझ अस्तित्व कसं असू शकेल, माझं अस्तित्व चार भिंतींच्या बाहेर नाही का, माझा अस्तित्व लाजीर होतं. माझं अस्तित्व नव्हतं तेव्हा हे कुटुंब पण होतं.
मी शाळेत असेन कॉलेजमध्ये असेल तेव्हा हा प्रपंच नव्हता. तेव्हाही माझं अस्तित्व होतं, चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेत होतो, बोध घेत होतो.
त्यामुळे प्रपंच आणि अध्यात्म, प्रपंच आणि परमार्थ, हे वेगळे कसे करता येतील, आणि शेवटी जीवनाचा बोध कसा घेता येईल. वेगवेगळ्या अनुभवांमधून जाणे आणि हे आपल्याला हवय.
आपल्याला त्या वेगवेगळ्या घटनांमधन जायचंय, एवढंच म्हटलं तर आपल्याला सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे. उदाहरणार्थ आपण एखाद्याला पोहे आवडतात.
म्हणून वर्षभर प पोहे खायला लावले तर त्याचा कंटाळा येईल, अशाप्रकारे प्रपंच करणे, हे काही सर्व घटनांची महान गोष्ट आहे. आणि परमार्थ म्हणजे त्याहीपेक्षा काहीतरी क्रिस्टल गोष्ट आहे.
ही जी काही व्याख्या केली आहे. जीवनामध्ये आनंद शोधणे प्रेम शोधणे आणि स्वच्छंदी जीवन जगणे हा प्रपंच आहे. आणि तोच परमार्थ आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे.
त्यामुळे आपल्याला विविध घटनांमधून बघता येणे हे महत्वाचा आहे. आणि त्या दोन गोष्टी वेगळ्या समजणे चूक आहे. अर्थातच या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच म्हणजे नामिक क्रिया करणे, आणि परमार्थ म्हणजे किराण्याचे बिल भरणे. असं जेव्हा करतो तेव्हा त्या गोष्टी भिन्न वाटायला लागतात.
हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की परिवार योग्य रीतीने चालणे, प्रेमाने आनंदाने राहणे. प्रत्येकाला आपापलं अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळणे. आणि सर्वांचे जीवन पूर्णत्वाकडे जाणे.
हाच प्रपंच, आणि हाच परमार्थ हे जर समजलं तर सांगड कशी घालता येईल. हे सांगायची आवश्यकता राहणार नाही. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.