श्री स्वामी समर्थ” ।। स्वप्नामध्ये एखाद्याचा मृत्यू, आत्महत्या, भांडणे या गोष्टी दिसणे चांगले कि वाईट? ।। जाणून घेऊया या लेखात !

नमस्कार मित्रांनो,

“श्री स्वामी समर्थ” आपण झोपल्यानंतर स्वप्न पडणे हे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला वेगवेगळे स्वप्ने पडत असतात, स्वप्नांचे जग देखील खूप विचित्र आहेत. वेगवेगळ्या गोष्टी स्वप्नात येत असतात. एखादे चांगले स्वप्न आले कि आनंद होतो, तर वाईट स्वप्नामुळे मनात भीती निर्माण होते.

उदाहरणार्थ. स्वप्नात एखाद्याचा मृत्यू पाहून किंवा एखादा भयानक प्रकार घडल्याचे पाहून आपल्याला वारंवार भीती वाटते. आपण ते भविष्याशी संबंधित काहीतरी आहे असे मानतो. आपल्याला वाटते की आपण जर आपल्या स्वप्नांमध्ये काहीतरी वाईट पाहिले असेल तर वास्तविक जीवनातही असेच घडेल.

परंतु स्वप्न शास्त्रामध्ये त्याचे इतरही काही अर्थ सांगितले आहेत. तर भक्त हो चला जाणून घेऊ या स्वप्न शास्त्रांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही स्वतःशी वाईट घडल्याचे किंवा तुमच्या स्वप्नात तुमचे काही मोठे नुकसान झाले असल्याचे पाहिले असेल तर मग घाबरून जाण्याची गरज नाही.

अशी स्वप्ने फायदेशीर असतात ते आपल्याला पैशाचे फायदे देखील देतात तर या वाईट स्वप्नांपासून घाबरू नका आज मी तुम्हाला काही भयानक स्वप्न आणि त्यामागील अर्थ सांगणार आहे तर भक्त हो हे माहित असणे फार गरजेचे आहे.

१.एखाद्याचा मृत्यू किंवा आत्महत्या करताना पाहणे – जर आपल्याला आपल्या स्वप्नात एखाद्या जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू किंवा आत्महत्या दिसले तर घाबरू नका. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले असेल. जर ती व्यक्ती एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर लवकरच त्यापासून तो बरा होऊ शकतो. अशा स्वप्नांचा अर्थ असा नाही की भविष्यात ती व्यक्ती मरेल.

२.स्वप्नात भांडणे पाहणे – जर आपण स्वतःला किंवा इतरांना स्वप्नात लढाई करताना पाहिले तर ते चांगले संकेत आहेत याचा अर्थ असा की आपल्याला पैसे मिळणार आहेत. जर आपल्याला स्वप्नामध्ये भांडताना स्वतःला दुखापत झालेले पाहिले तर ते देखील शुभ आहे याचा अर्थ असा की तुम्हाला संपत्ती बरोबर यश देखील मिळणार आहे. हे स्वप्न तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकते.

३. स्वप्नात ज्वलंत घर पाहणे- जर स्वप्नात आपले घर जळत असेल तर घाबरू नका. असे स्वप्न पाहिल्या नंतर तुमच्या मनात भीती निर्माण होईल, परंतु स्वप्न शास्त्रानुसार अशी स्वप्ने शुभ संकेत देतात. याचा अर्थ असा आहे की आपल्याला लवकरच सर्व काही मिळेल. हे स्वप्न तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करते.

४.स्वप्नात अंत्ययात्रा पाहणे – आपल्या स्वप्नात जर एखाद्याची अंत्ययात्रा निघत असताना पाहिले, तर घाबरू नका. हे स्वप्न आपले नशीब बदलू शकते याचा अर्थ असा आहे की आपल्या नशिबाची कुलूप उघडणार आहेत. तसेच आपणास काही मोठे यश मिळू शकते.

५.एखाद्याला जळत असताना पाहणे – जर एखाद्याला आपल्या स्वप्नात जळत असल्याचे दिसले, तर ते पैसे मिळण्याचे चिन्ह आहे.

६.स्वप्नात एखाद्या व्यक्तीला केस कापताना पाहणे – एखाद्या व्यक्तीला स्वप्नात एखाद्या स्त्रीचे केस कापताना पाहणे म्हणजे आपल्याला सोने,चांदी आणि पैसा मिळणार आहे.

दुसरीकडे एखाद्या माणसाचे केस कापलेली दिसणे म्हणजे आपण नोकरी मालमत्ता मिळवणार आहात. तर असे स्वप्न पडल्यावर घाबरून जाऊ नका. हे तुमच्या फायद्याचे संकेत देत असतात.

संकट ही वेळ काळ कधी सांगून किंवा बघून नाही येत. माणसाला माहीत नाही की, उद्या काय वाढून ठेवलं आहे आपल्या नशिबात. पण हा मनात स्वामींचे विचार असताना चिंता करावी ती कशाची आणि का? मनात असलेले तीन शब्द पुरे आहे सगळ्या गोष्टींसाठी आणि ते म्हणजे “श्री स्वामी समर्थ”.

सौजन्य – महाराष्ट्र news

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *