नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणाय तुलासीची पान कधी तोडावी आणि कधी तोडू नये. तुळसी प्रमाणेच बेलपत्र म्हणजे बेलाची पानं आणि दुर्वा कधी तोडावी आणि कधी तोडू नये.
यासंदर्भात हिंदुधर्म शास्त्रात सखोल माहिती दिली आहे. अनेक नियम दिलेले आहेत. आजच्या आधुनिक काळात या सर्व नियमांचे पालन करणं कठीण असतं.
मात्र हे सर्व नियम सोपे करुन आपल्या जीवनात ते आपण आमलात आणले तर आपले जीवन आनंदमय होईल.
मित्रांनो काही अशा तिथी आहेत त्या तिथींना चुकूनही पानं तोडू नयेत. अशा प्रकारे आपल्या हातून होणाऱ्या चुका आपल्या जीवनात दोष उत्पन्न करतात.
आपल्याला पापाच भागीदार बनवतात. जाणून घेऊया तुळसी पत्र, बेलपत्र, दुर्वा कोणत्या दिवशी चुकूनही तोडू नयेत.
मित्रांनो दुर्वा गणपती बाप्पांना खूप प्रिय असतात. तुळस श्री हरी विष्णू ची प्रिय म्हणून ओळखली जाते. आणि जर बेलपत्र असतात. ते भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत.
अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा या तिथीला चुकूनही या झाडाची पाने तोडू नका. अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा या तिथीला. आता हे हिंदुधर्म शास्त्र अजून पुढे सांगत. की त्या त्या देवतेची जी तिथी असेल वर असेल त्या वारी आपण त्या झाडाची पाने तोडू नये.
जस की सोमवार हा महादेवाचं वर आहे. त्यादिवशी बेलपत्र तोडण्यास हिंदुधर्म शास्त्र मनाई करत. पण अनेकदा आपल्याला या नियमांचे पालन करणं शक्य नसतं. म्हणून अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी या तीन तिथी कमीत कमी लक्षात ठेवाव्यात.
<
तुळशीच्या बाबतीत तर खूप अडचणीचे असे नियम दिसतात. वैधृती आणि व्यातीपत हे योग जेव्हा असतील तेव्हा या योगांमध्ये तुलासिपत्र तोडू नये. सोबतच वारांचा विचार केला तर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या तीन वारी तुळसी पत्र तोडण्यास हिंदू धर्म शास्त्रात मनाई आहे.
तिथीच्या बाबतीत अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा या तिथीला तुळसी पत्र तोडू नये. सोबतच संक्रांती, बारा राशींच्या बारा संक्रांती असतात. कोणत्याही संक्रांतीच्या दिवशी तुळसी पत्र तोडू नये.
तुम्हाला सुतक असेल म्हणजे ज्याला मृता शौच असे म्हणतात. किंवा सोहेल वृद्धी असेल म्हणजे जनना शौह असेल तरतुळसी काढू नयेत. असं सांगितलेलं आहे.
जेच तुम्हाला खरोखर त्या पानांची गरज असेल निकड असेल तेव्हा त्या वृक्ष देवतेची क्षमा मागून त्याची पानं तोडू शकता. शास्त्रामध्ये तसा उल्लेख आहे. तीन तिथीला अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा यादिवशी तोडू नये.