नमस्कार मित्रांनो,
आपल्या जीवनामध्ये लहान-सहान गोष्टी घडत असतात. स्वामींनी आपल्याला त्यांच्या जीवनातील अनुभवांवरून काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचे अनुकरण करून आपण किती तरी अडचणी व संकटांपासून दूर राहू शकतो.
स्वामींनी आपल्याला उपदेश देताना काही अशा गोष्टी व घटनांबद्दल सांगितला आहे की ज्यांना आपण कधीही इतरांसमोर सांगू नये. गुप्त ठेवावेत.
चला तर पाहुयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपला अपमान. आपल्या जीवनात कधी कधी अशा गोष्टी घडतात की आपण इतरांचा चेष्टेचा विषय बनतो. इतर आपली चेष्टा करतात. आपल्याला अपमानित करतात.
स्वामी म्हणतात अश्या अपमानाच्या गोष्टी इतर लोकांना कधीच सांगू नये. आपण आपला अपमान इतरांना सांगून आपण पुन्हा आपल्याला अपमानच मिळतो. इतरांना आपल्या अपमानाशी काहीही देणे घेणे नसते.
बहुतेक व्यक्ती आपले सांत्वन करण्याऐवजी आपली ईर्षा व आपल्याबद्दल दुजाभाव ठेवतात. म्हणून आपण आपल्या अपमानाचे प्रदर्शन अश्या व्यक्तींसमोर केल्यास समोरची व्यक्ती ही इतरांसमोर आपला अपमानच करू शकते.
तसेही आपल्या जीवनातील चांगल्या चांगल्या व सकारात्मक गोष्टी इतरांशी शेअर कराव्यात. आपल्या जीवनातील वाईट व अपमानित गोष्टी कधीही कोणालाही सांगू नयेत. तसेच आपल्या कुटुंबातील वैयक्तिक व गुप्त गोष्टी कधीच इतरांना सांगू नयेत.
आपल्या घरातील, कुटुंबातील, कुटुंबातील सदस्यांच्या कोणत्याही वैयक्तिक, गुप्त गोष्टी व त्यांचा स्वभाव आणि गुणधर्म याबद्दल कधीही बाहेरच्या व्यक्तींबरोबर चर्चा करू नये. कारण घरातील वाद विवाद, आपापसातील मतभेद असतात ते बाहेरील लोकांनी चुगली चहाडी केलेले असतात.
जर घरातील लहान-सहान गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना माहीत असतील तर ती व्यक्ती आपल्या घरामध्ये फूट पाडू शकते. आपल्या घरामध्ये भांडणे लावू शकते. आपल्या कुटुंबातील सर्व बाबी चव्हाट्यावर आणू शकते. त्यामुळे आपल्या घरातील गोष्टी बाहेर कोणालाही सांगू नये.
आपण असे म्हणतो की इतरांना आपले दुःख सांगितले तर आपले मन हलके होते. म्हणून आपण आपले दुःख, त्रास, अडचणी इतरांना सांगत सुटतो. स्वामी सांगतात आपले दुःख, त्रास आणि अडचणी कधीही आपले मित्र, नातेवाईक व समाज यांच्यासमोर मांडू नयेत.
कारण यामुळे आपला त्रास कमी होण्याऐवजी वाढतो. आपण इतरांना विश्वासाने सर्व बाबी सांगतो परंतु बहुतेक व्यक्तींना सवय असते ते रडून ऐकतातआणि हसून बोलतात.
म्हणजेच आपल्यासमोर आपल्या दुःखात सामील होतात आणि इतरांना तेच दुःख आणि त्रास हसून हसून सांगतात. आपले दुःख व त्रास आपल्या अगदी जवळच्या विश्वासू व्यक्तीलाच सांगावे. विशेष करून आपल्या पत्नीला ते जरुर सांगावे.
दुसरी गोष्ट म्हणजे धनसंपत्तीतील नुकसानीबाबत कधीही कोणालाही सांगू नये. कधी आपल्या जीवनात नोकरी-व्यवसायात धनहानीला सामोरे जावे लागते. आपले नुकसान होते व आपल्याकडील सर्व पैसा निघून जातो.
अशा परिस्थितीमध्ये आपण मानसिक संतुलन बिघडवून बसतो. धैर्य गमावून बसतो. अशी स्थिती आली तरीही बाहेरील व्यक्तीला कधीही काहीही सांगू नये. कारण आपली गरिबी, दारिद्र्य आपण इतरांना सांगितले तर आपल्याला तेवढ्यापुरते ते धीर देतात.
कोणीही आपल्याला मदत करत नाही. परंतु आपल्यापासून दूर नक्कीच जातील कारण आजच्या काळात फक्त पैशांचा आवाज सगळीकडे असतो. आपल्याकडे पैसा नसेल तर आपल्याला कोणीही ओळखत नाही. मांडून आपण गरीब, दुःखी कष्टी आहोत हे इतरांना दाखवण्यापेक्षा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काय करावे याचा विचार करा.
स्वामी म्हणतात की जर आपल्या मनात आत्मविश्वास असेल तर आपण आपल्या जीवनात आलेली ही धन हानीची लवकरच भरून काढू शकतो. जीवनामध्ये अशा घडामोडी होत असतात. जीवनामध्ये चढ-उतार येतच असतात.
परंतु या सर्वांना चर्चेचा विषय न बनवता त्यातून चांगला व हिताचा मार्ग काढणे गरजेचे आहे आणि हेच आपल्याला करायचे आहे आणि हेच स्वामींनी आपल्याला सांगितले आहे.
तर स्वामिनी सांगितलेल्या या दोन गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.