अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त: श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी. भक्त हो नमस्कार,
स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी रामेश्वरम येथे होते. रामेश्वरम येथे ते शिवकांची विष्णुकांची अशी दोन क्षेत्र आहेत, ही दोन्ही गावे येथील वैष्णवांना इनाम म्हणून दिलेली होती. त्यावेळी तिथल्या राजाने इनाम पत्राचे पुरावें कागदपत्रे सादर करण्याचा हुकुम दिला, आणि त्यानंतर लोकांनी बरेचसे कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु याने राजांच्या अधिकाऱ्यांचे समाधान काही झाले नाही आणि त्यांनी ती गावे जप्त केली, सरकार जमा केली.
आता त्यातून मिळणारे उत्पन्न सरकारी खात्यामध्ये जमा होऊ लागले. तेथील वैष्णवांच्या उत्पन्नाचे सर्वच मार्ग बंद झाले,आणि व्यवहार पूर्ण सरकार कडे जाऊ लागला. आता पुढे कसे होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आणि त्याचवेळी शिवकांचीमध्ये एक स्वामी महाराज आलेले आहेत.ही बातमी त्या वैष्णवांना समजते, आणि ते स्वामीच्या दर्शनासाठी येतात. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आपली सर्व व्य धा स्वामींना सांगतात.
तेव्हा स्वामी राजाच्या अधिकाऱ्यांना बोलावून आणण्यास सांगतात अणि हा स्वामीं हुकुम होताच ते वैष्णव महत्प्रयासाने अधिकार्यांना स्वामींकडे घेऊन येतात, स्वामींनी त्यांना विचारना केली असता अधिकारी स्वामींना बोलले की यांनी जहागिरीचे कागदपत्रे पुरावे दिले तर आमची काही तक्रार नाही यांना त्यांचे अधिकार आणि उत्पन्न पुन्हा देऊ पण आम्हाला काहीतरी ठोस पुरावे हवे आहेत.
अधिकारी यांनी असे बोलताच स्वामीनी त्यांच्याकडे बघितले ते बोलले तुम्हाला पुरवाच पाहिजे असेल तर. या नदीपात्रात नक्षीदार कोरीव काम केलेला एक पाहिजे असेल तर या नदीपात्रात नक्षीदार कोरीव काम केलेला एक पाषाण आहे. त्यावर जे लिहिले आहे ते नक्कीच पहा! स्वामींची आज्ञा होताच अधिकाऱ्यांनी काही लोकांच्या सहकार्याने नदीपात्रातिल पाषाण बाहेर काढला आणि आश्र्चर्य झाले.
त्यावर प्राचीन लिपीत लिहिलेला एक शिलालेख होता, आणि त्या शिलालेखा मध्ये पूर्वजांच्या नावासह शक, संवत, मास, तिथि आणि वार यानसह सर्व गोष्टी स्पष्ट लीहलेल्या होत्या, त्यांनतर राजांच्या अधिकाऱ्यांनी सर्व जाहागिरी आणि अधिकार पुन्हा वैशंवाना परत दिले. स्वामी भक्त हो आता त्या वैष्णवांचा आनंद गगनात मावत नव्हता.
स्वामीच्या दरबारात गारणे घेऊन गेलो असता, स्वामींच्या दरबारात न्याय होतोच सत्याचा विजय होतच असतो, असतो हा अनुभव त्यांना आला. आणि सर्वांनी आनंद भक्तीच्या भावनेत एक घोषात स्वामींचा जयजयकार केला बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजची लीला म्हणजे स्वामी कृपेची समज आहे. आजच्या लीलेत आपण बघितले वैशवांची सत्य बाजू होती परंतु कागदोपत्री पुराव्याच्या अभावामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता.
कदाचित इतक्या पिड्याची जहागीरी त्यांना मिळालेली होती. आणि या धुंदीत कागदपत्र वैगेरे पुरावे जपून ठेवन्याची त्यांना गरज भासली नसावी, त्यामुळे त्यांना मनस्ताप सुद्धा सोसावा लागला. असो परंतु ते काहीही असले तरी त्यांची बाजू सत्याची होती. आणि स्वामींनी सत्याला न्याय दिला. स्वामींच्या दरबारात सत्याचा न्याय-निवाडा होतोच, सत्याचाच विजय होतो, थोडक्यात आज आपल्या आजच्या पिढीसाठी या लिलेतून बोध घेता, सतत लक्षात ठेवायचे आहे.
की स्वामींची सृष्टी विशिष्ट कायद्याने कार्यकरत असते आणि प्रत्येकाचे जीवन या कायद्याने घडत असते, यात आपण जे बीज पेरतो तेच उगवते, म्हणजेच आपण जसे विचार करतो, ज्या भावना मनात ठेवतो आपल्या अंतर्मनात जी विश्वास कोरलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्या जीवनात घटना घडत असतात. तशी माणसं आकर्षित होत असतात. स्वामीभक्त हो हे स्वामींचे कायदे सर्वांना सारखेच आहेत.
<
मग कोणी ज्ञानी असो किंवा अज्ञानी, एखादा राजा असो किंवा एखादा भिकारी, किंवा एखादा संत असू दे वा समाजात उपद्रवी असणारे लोक असुदे, स्वामींचा कायदा सर्वांना सारखाच आहे. म्हणून आपण जर काही स्वामींना प्रार्थना केली असेल, तर स्वामींच्या साम्राज्यात न्याय मिळतोच. ही समज दृढ करा, अगदी आपल्या कर्माचे प्रार्थनेचे फळ येणारच आहे.
इतकेच नव्हे तर हजारो पटीने वाढवून येणार आपल्याला यश मिळणारच हा अतूट विश्वास ठेवा. आपले ध्यान अतिशय प्रामाणिक पणे कर्मावर एकाग्र करून कर्माचा दर्जा उचावण्याचा प्रयत्न करा. त्यात सकारात्मक भाव आणा, भक्तिभाव आना. लक्षात ठेवा, एकवेळ मानवाच्या न्यायालयात अन्याय होऊ शकतो. परंतु स्वामींच्या न्यायालयात कधीच अन्याय होत नाही.
आपल्या जीवनात जे काही घडते आहे, ते स्वामींच्या कायद्यांनी आपल्या जीवनात आकर्षित होत आहे, म्हणून आपल्याला आपल्या कर्मावर कार्य करायचे आहे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया; हे गुरुराया!! या अनंतकोटी ब्रम्हांडाचा न्यायाधीश तुम्ही आहात. तुम्हाला प्रार्थना करताच. तुमच्या कायद्याप्रमाणे संबंधित गोष्टी आकर्षित व्हायला सुरुवात होते.
म्हणून हे आई सर्वप्रथम मला विवेक द्या. या तुमच्या खेळात मला तरबेज करा. सृष्टीच्या कायद्याची समज द्या. आणि तुम्हाला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करा! शेवटी जी तुमची इच्छा आता तीच माझी इच्छा ! बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरु अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्तभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.