अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
स्वामी भक्त हो नमस्कार,
अक्कलकोट मध्ये रंगपंचमीचा उत्सव सुरू होता. त्या दिवशी स्वामी महाराज चिंतोपंत यांच्याकडे होते. रंगपंचमीचा उत्सव असल्याने राजे साहेबांच्या वाड्यात दरबार भरलेला होता. स्वामींची स्वारी चिंतोपंतांच्या घरी असल्याने चिंतोपंतना जाण्यास उशीर झाला. आणि त्यामुळे राजाकडून एक चौकदार आला. आणि राजे साहेबांनी तुम्हाला लवकर बोलावले आहे असे सांगितले.
परंतु स्वामींनी इकडे चिंतोपंत यांना कचेरीत जाऊ नकोस असे स्पष्ट सांगितले. आता स्वामींचा हुकूम मोडून चिंतोपंत यांना जाता येईना. आणि ते गेले सुद्धा नाही परंतु एकडे राजसाहेबांचा अवमान होईल आणि दुसरीकडे स्वामींचा हुकूम. या द्विधा अवस्थेत चिंतोपंतांची चांगलीच पंचाईत झाली. आणि पुन्हा दुसऱ्यांदा बोलावणे आले. परंतु स्वामींनी काही जाण्याचा हुकूम दिला नाही. चिंतोपंत खूपच अस्वस्थ झाले.
आता तिसऱ्यांदा बोलावणे आले. तरीही स्वामींनी जाण्याची परवानगी दिली नाही. स्वामी भक्त हो चिंतोपंतांची काय अवस्था झाली असेल याची आपणा सर्वांना कल्पना आलीच असेल. आणि ही त्यांची अवस्था बघून स्वामींनी चिंतोपंतांकडे बघितले आणि बोलले अरे… तुझा गळा कापला तर ती काय करशील? आणि तो दरवाजाबाहेर बसून लवकर या.. मोठ्या दिमाख्याने हुकूम करतो!! स्वामी असे खूप रागावून बोलले.
त्यावेळेला श्री गोपाळ जोशी हिररीकर तिथेच होते. त्यांनी आलेल्या चौकदारास राजे साहेब कुठे बसलेले आहेत. असे विचारले तर राजे साहेब थोरल्या दरवाजाच्या बाहेर चौथऱ्यावर बसलेले आहेत असे त्यांनी सांगितले. यावर दरवाजावर बसून मोठ्या दिमाखाने हुकूम करतो या स्वामी वाणीचा मोठा अनुभव आला. स्वामी भक्त हो चिंतोपंत स्वामींचे अनन्य भक्त होते.
ही स्वामी वाणी ऐकताच नक्कीच दरबारात काहीतरी विपरीत घडणार आहे हा अंदाज चिंतोपंत यांना आला. आणि राजाची गैरमर्जी होण्याची भीती न बाळगता स्वामींच्या आज्ञेत राहून दरबारात न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि बघा पुढे स्वामींच्या संकेत प्रमाणेच घडले. ते असे की त्या दिवशी राजे साहेबांचा दरबार भरलेला असताना सर्व मानकरी दुतर्फा बसलेले होते.
त्यावेळी गणपतराव खंडागळे यांच्या कंबरेत असलेल्या तलवारीचे टोक गणपतराव बस्ते यांच्या पागोट्याला लागले. आणि ते पागोटे भर दरबारात खाली पडले. भर दरबारात झालेला अपमान बस्ते यांना सहन न झाल्याने ते खंडागळे यांच्या अंगावर धाऊन आले. आणि यातच दोघांनीही तलवार उपसून एकमेकांचे प्राण घेण्यापर्यंत गोंधळ घातला. इतर मानकरी मंडळींनी मोठ्या प्रयासाने मध्यस्थी करून तंटा मिटवला.
आणि याप्रकारे रंगपंचमीचा बेरंग झाला. बस्ते यांनी विनाकारण दंगा केल्याने राजे साहेबांनी त्यांना अक्कलकोट मधून हद्दपार केले. थोडक्यात घडणारा प्रकार स्वामीना ठाऊक होता. आणि चितोपंत तेथे उपस्थित असते तर मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याही बाबतीत कदाचित अनुचित प्रकार घडू शकला असता. आणि म्हणूनच त्यांना स्वामींनी जाण्याची आज्ञा दिली नाही.
हा स्वामींचा संकेत सर्वांना समजला आणि सर्वांनी एकघोशात स्वामी नामाचा जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या स्वामी लिलेत स्वामी आपल्याला अनेक बोध देत आहेत. पैकी स्वामींचे स्वामी कवच सतत आपल्या भोवती आहे. पदोपदी स्वामी आपले संरक्षण करत आहेत. जीवनात घडणाऱ्या घटना दिसताना कितीही नकारात्मक असू द्या.
<
पण सर्वांचा शेवट हा मंगलकारी, कल्याणकारी, सकारात्मक होतो. हा खूप छान बोध स्वामी आपल्याला देत आहेत. चिंतोपंत हे स्वामींचे अनन्य भक्त होते. अक्कलकोट मध्ये असताना त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी स्वामींच्या असंख्य लीला बघितल्या. आणि यातूनच त्यांचा स्वामींच्या शक्तीवर त्यांचा संपूर्ण विश्वास बसलेला होता. स्वामी भक्तांच्या सतत पाठीशी आहेत. स्वामींचे संरक्षण कवच सतत त्यांच्या भोवती आहे.
हा विश्वास त्यांना होता. आणि हा विश्वासाचं त्यांची प्रार्थना होती. आणि आजच्या लिलेत वर्णन केल्या प्रकारे चिंतोपंत यांना त्यांच्या प्रार्थनेनुसार त्यांच्या स्वामी विश्वास नुसार त्यांना अनुभव आला. आजच्या लिलेत जसे चिंतोपांतांच्या बाबतीत घडले अगदी तसेच तुम्हा आम्हा सर्वांच्या बाबतीत घडतं असते. जसे चिंतोपंत यांना अनुभव आले तसे अनुभव आजही आपल्याला येत आहेत.
जेव्हा आपण आपले जीवन स्वामीना समर्पित करून, स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवून, समर्पित भावनेने आपण आपले कर्म करत असतो. तेव्हा आपल्यात एक आत्मविश्वास येतो की स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहेत. स्वामी माझा पदोपदी विकास करत आहेत. स्वामींचे संरक्षण कवच सतत आमचे रक्षण करत आहे. आणि आपल्या त्या विश्वासाचे रुपांतर अनुभवात होते.
आणि जसे चिंतोपंत यांच्या बाबतीत घडले अगदी तसेच अनुभव आपल्याला येत असतात. उदरणार्थ जसे आपण कामासाठी निघालो. आणि अचानक आपली गाडी पंक्चर होते. तेव्हा घाईघाईने आपण बस, ट्रेन, रिक्षाने आपण वाहनाने जातो. नंतर आपल्याला समजते की आपण नेहमी ज्या रस्त्याने जातो. त्या रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे. तेव्हा गाडी पंक्चर होणे ही स्वामींची इच्छा होती.
असे अनेक अनुभव आपल्याला येतात. जेव्हा आपण जमीन व प्रॉपर्टी व्यवहार अमुक अमुक किमतीत नक्की करण्याचे ठरवतो. आणि यासाठी आपण आपल्या मित्रांकडून नातेवाईकांकडून मदत घेतो. त्यांच्याकडून उसने स्वरूपात पैशांचा बंदोबस्त करतो.नेमके त्याचं वेळी एखादी व्यक्ती ऐन वेळी आपल्याला मदत करण्यास नकार देते. आणि आपला ठरवलेला व्यवहार फिसकटतो.
आपल्याला त्याचे दुःख सुद्धा होते. भविष्यात जेव्हा आपल्याला समजते की आपण जी जमीन किंवा प्रॉपर्टी घेणार होतो. त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते. ते बेकायदेशीर होते. व आपली मोठी फसवणूक टळली. त्यानंतर स्वामींनी आपल्याला फसवणुकीतून वाचवले. म्हणून स्वामीना आपण धन्यवाद देतो. स्वामी भक्त हो असे अनेक अनुभव आपल्याला येत असतात.
आजच्या स्वामी लीलेतून बोध घेता जसे चित्रपटाचे दोन भाग असतात. एक मध्यंतरापूर्वी चा आणि एक मध्यंतरानंतर चा. अगदी तसेच आपल्या जीवनात एखादी नकारात्मक घटना घडली. तर हा चित्रपटाचा मध्यंतरापूर्वी चा भाग आहे. असे समजून सकारात्मक राहून स्वामी चरणी विश्वास ठेवून चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे या संकटाचा शेवट मंगलकरी, कल्याणकारी आणि सकारात्मक असणार हा विश्वास दृढ करायचा आहे. आणि स्वामींच्या इच्छेनुसार आनंदी राहायचे आहे. चला तर मग आज आपण स्वामीना प्रार्थना करुया.
हे समर्था आमच्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक घटना म्हणजे चित्रपटांमधील मध्यंतरापूर्वी चा असलेल्या भागासारखे आहेत. आता आम्हाला कोणतीच फिकीर नाही. घटना जरीही दिसताना नकारात्मक वाटत असेल पण ह्याचा शेवट मंगलकारी, कल्याणकारी आहे. कारण आमच्या ह्या जीवनरुपी चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्हीच आहात. सर्व सूत्र तुमच्याच हातात आहेत. इथे तुमचीच सत्ता आहे. आणि तुम्ही आमचे कल्याण करत आहात!!!
बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सदच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.