स्वामी आता तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील..!, स्वामींकडे आपली इच्छा सांगून थकले असाल तर लेख नक्की वाचा..

नमस्कार मंडळी,

मंडळी आपल्या इच्छे नुसार जगणं सगळ्यांनाच आवडतं. पण आपल्या इच्छे नुसार जगण्यासाठी आपली परिस्थिती असणे गरजेचे असते. अशी अनुकूल परिस्थिती येण्यासाठी आपण स्वामींकडे मागणे मागत असतो. शांतता, आरोग्य अशा आपल्या अमर्यादित मागण्या स्वामींकडे मागत असतो.

काही इच्छा पूर्ण होतात तेव्हा आपण आनंदित होतो. आपली एखादी अशी इच्छा असते जी आपण मागता मागता थकून जातो. पण स्वामी ती इच्छा पूर्ण करत नाही. अस का होत असा कोणता मार्ग आहे ज्याने आपली इच्छा पूर्ण होईल. हेच आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली इच्छा पूर्ण न करणे हा स्वामींचा उद्धेश कधीच नसतो. स्वामी तर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात. मग चूक कुठे होते. चूक आपल्याकडून होते. ही चूक आपण प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष रित्या करत असतो. स्वामीना तुम्ही तुमची इच्छा खूप दिवसापासून सांगत आला आहात.

त्यांना आपली इच्छा मागता मागता थकले आहेत पण स्वामींनी तुमची ती इच्छा अजूनही पूर्ण केलेली नाही. म्हणून तुम्हाला यावर उपाय पाहिजे आहे. म्हणजे मंडळी तुम्ही काय करत आहे तुमच्या मनाला सांगत आहे की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत नाही. म्हणून आपल्याला यावर काही तरी उपाय शोधावा लागेल.

म्हणजे एक प्रकारे नकारात्मक संदेश तुम्ही तुमच्या मनाला पाठवत आहे. आणि हीच ती चूक आहे आपण नेहमी करत असतो. आपण आपल्या मनाला positive ऐवजी negative संदेश देत असतो. ज्यामुळे आपले सर्व आयुष्य नकारात्मकता ने भरून जाते.

मानवा कडे असणारी सर्वात ताकदवर गोष्ट म्हणजे मन जो देवाने आपल्याला दिला आहे सत्कर्म, सकारात्मक विचार साठी पण आपण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो. मंडळी आपण जसा विचार करतो तसे वातावरण निर्माण होत जाते. आपल्याला आपले आयुष्य कसे जगायचे आहे हे ठरवण्यासाठी मन दिले आहे.

तुम्ही सकारात्मक विचार कराल तर सुखी जीवन जगाल. आणि नकारात्मक विचार कराल तर दुःखी जीवन जगणार हे अटळ सत्य आहे. त्यावर स्वामिही काही करू शकत नाही. काही करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. आता पासून सकारात्मक विचार करायला लागा.

तुमच्या मनात विचार आहे की स्वामी इच्छा पूर्ण करत नाही. हे मनातून काढून टाका. आणि असा विचार करा की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. मंडळी तुमची इच्छा आहे की स्वामी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी.

<
तुम्ही रोज स्वामीना हेच मागणं की रोज कर्म करत असाल आणि स्वामी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसतील तर यात स्वामींचा दोष नाही. दोष तुमच्या विचारांचा आहे. कारण तुम्ही मानून घेतले आहे की माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ही तुमची पहिली चूक आहे.

स्वामीना आपण आपली इच्छा मागतो आणि काही महिने वाट पाहतो की स्वामी इच्छा पूर्ण करणार. आपण म्हणतो की स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात. हे बरोबर ही आहे. ते योग्य वेळेचे वात पाहत असतात. आपण एक दोन दिवस किंवा काही महिने वाट पाहतो आणि स्वामी आपली इच्छा पूर्ण करतील.

अस नाही झालं तर आपण विचार करायला लागलो की स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाही. कारण स्वामी ज्या योग्य वेळेची वाट पाहत होते. ती आपल्या खूप जवळ आलेली असते. पण त्याच वेळी आपण असा विचार करतो की स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाही.

मग हे ऐकून स्वामी तरी तुमची इच्छा कशाला पूर्ण करतील. म्हणून मंडळी संयम आणि सकारात्मक विचार या दोन गोष्टी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात. तुम्ही संयम ठेवला तर स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. आणि यासोबतच तुम्ही सकारात्मक विचार ठेवले.

तर योग्य वेळेच्या आधीच स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कारण आपले विचारच आपल्या भोवती चांगले किंवा वाईट परिस्थिती निर्माण करत असतात. विचार करणे म्हणजे ती परिस्थिती निर्माण करणे आहे. म्हणून तुमची इच्छा असेल की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी तर अस विचार करा.

माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण अजून चांगली व्हावी. यासाठी मी स्वामीना मागणी घालत आहे. मंडळी अस म्हणायला नक्कीच आपल्याला काही दिवस कठीण जातील. कारण आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही ती चांगली आहे मनाने म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट नसतानाही ती आहे असं मान्य करणे हे जरा अवघडच आहे.

आपल्याला आपलं मन साथ देत नाही. पण मंडळी ते म्हणतात ना इफ यू टेल आ लाय ऑफ्टेन इन्फ देन इट बी कम्स तृथ म्हणजे आपण जर एकच खोटं बऱ्याच वेळा बोलत असेल तर ते सत्य होते. आपल्या मनाशी खोट बोलत रहा त्याला सकारात्मक सगळे सांगत रहा.

आपल्या कडे एखादी वस्तू नसेल तरी आपल्या मनाला सांगत रहा की ती वस्तू आपल्या कडे आहे. मी या वस्तू साठी खूप कृतज्ञ आहे. जेवढी जास्त कृतज्ञता आणि जेवढी जास्त सकारात्मकत तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ती साठी दर्शवला तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल. तुमची कोणतीही इच्छा या मार्गाने सहज पूर्ण होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *