स्वामी म्हणतात सकाळी उठल्यावर जर या 3 गोष्टी दिसल्या तर माझा शुभ संकेत आहे.

नमस्कार मित्रांनो,

सकाळी उठल्यावर या गोष्टी व वस्तू दिसल्या तर हा स्वामींचा संकेत आहे. व त्या गोष्टी व वस्तू शुभ मानल्या गेल्या आहेत. आपल्यासाठी दररोजची नवीन सकाळ, नवा आनंद, नवा उत्साह नवी स्वप्न घेऊन येते. आपण सकाळी उठल्यावर आपल्याला काहीतरी नवीन करण्याची आशा असते. असे म्हटले जाते की, दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो.

दिवसभरात काही तरी चांगल्या गोष्टी घडतात. कधी कधी नैसर्गिक काही अशा गोष्टी दिसतात ज्या आपल्याला संपूर्ण दिवसाशी निगडित असतात. आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी शुभ मानले जाते. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत शुभ गोष्टी व वस्तू त्याचे दर्शन झाल्यावर आपल्याला दिवस चांगला जातो.

नंबर एक भिंतीवर सरपटणारा कोळी. सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्याला भिंतीवर जर कोळी दिसला तर हे आपल्यासाठी बढतीचा शुभ संकेत आहे. सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नंबर 2 गाय आपल्या दारी येणे सकाळच्या वेळेस गाय आपल्या दारी येऊन हंबरत असल्यास ते शुभ सूचक आहे.

त्याचा अर्थ असा आहे की देवी महालक्ष्मी स्वतः आपल्या दारी चालत आलेले आहे अशा वेळी त्या गाईची पूजा करा. तिला खाण्यासाठी पोळी द्या. नंबर 3 कानात काहीतरी स्वर घुमत असल्यास, सकाळी उठल्यावर कोणत्या देवळातील घंटीचा आवाज आल्यास ते फार शुभ मानले गेले आहे.

याचा अर्थ असा की, देवाची कृपा आपल्यावर अनंत आहे व त्याचा शुभारंभ झाला आहे. आपल्या कामामध्ये सगळे येणारे अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे. आपल्याला घरातून कामानिमित्त बाहेर पडताना जर का आपल्या घरात पूजा करण्याचा आवाज आला व जर आरतीचा आवाज झाला तर ते फार शुभ सूचक आहे.

नंबर 4 पक्ष्यांचा आवाज सकाळी उठल्या उठल्या आपल्या गॅलरीत किंवा खिडकीत किंवा गच्चीवर कबूतर, पोपट, चिमणी यांसारखे पक्षी चिवचिवत असतील तर हे शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की, आता आपले चांगले दिवस सुरू होऊ पाहताहेत. आपल्यावर देवाची कृपा दृष्टी आहे. देवाचे धुत पक्षी बनून आपल्याला तो शुभ संकेत द्यायला आले आहेत.

आपल्या घरात पक्ष्यांना खाण्यासाठी दाणे व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. नंबर 5 सकाळी शेण, सोन, हिरवे गवत दिसल्यास शुभ संकेत आहेत. या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपल्याला दिवस चांगला जातो. या सर्व वस्तूंचे दिसणे आपल्यासाठी शुभ सूचक आहे. खर तर सकाळी ही एक वेळ खूप शुभ आहे.

सकाळी 4 ते 6 ही वेळ ब्रह्म मुहूर्ताची आहे. असे म्हटले जाते की देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात. सप्ताहात या वेळेतच गुरुचरित्राचे पारायण ठेवले जाते. सकाळी 4 ते 6 या वेळेत केलेला अभ्यासही मुलाच्या लक्षात राहतो. असं म्हटलं जातं की, या वेळेस खूप कमी लोक जागे असल्यामुळे देवाची जी ऊर्जा असते ती थेट आपल्यापर्यंत पोहोचते.

त्यामुळे या वेळेत केलेले कोणतेही काम चांगल्या एकाग्रतेने होते. अशी एक म्हण आहे लवकर निजे लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे. तर मित्रांनो हे होते काही स्वामींचे संकेत..

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *