जो माझे सतत नामस्मरण करतो, माझ्या चिंतनात राहतो त्याचा मी पूर्णपणे भार वाहतो…स्वामींचे महत्वाचे उपदेश…

नमस्कार मित्रांनो,

जो माझे सतत नामस्मरण करतो, माझ्या चिंतनात राहतो त्याचा मी पूर्णपणे भार वाहतो. जाणून घ्या स्वामींचे महत्वाचे उपदेश…

श्री स्वामी समर्थाचा उपदेश

» सर्व धर्माचे सार हेच की, परोपकारार्थ
अनिवार्य श्रम करावेत.

» प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये.

» विनाकारण दुस-यास पीडा देऊ नये.

» मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा
मानू नये.

» पक्षापक्ष भेद टाकून सत्य, न्याय, धर्म या
मार्गाने असावे.

» परमेश्वर भजनी रत असावे.

<
» कोणतेही र्दुव्‍यसन नसावे.

» योग्यायोग्य विचार असावा.

» अतिथी, अभ्यागतांस अन्न-पाणी द्यावे.

» न्यायाने, कष्टाने मिळविलेल्या पैशाने स्वहीत करावे, तसेच दुस-याचे हीत देखील करावे.

» परोपकारार्थ पाणपोई, विहीर, तलाव बांधावेत.

» प्रवाशांस उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात.

» दया-क्षमा-शांतीयुक्त चित्त असावे.

» ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.

» आपले भोग हे चुकत नाहीत. ते भोगावेच लागतात. त्यातून दु:ख विशाद वाटय़ाला येतो. म्हणून नेमून दिलेले तुमचे काम करताना, ते हसत हसत करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.