श्री स्वामी समर्थ,
मित्रानो आज आपण स्वामी समर्थ महाराज यांची अशी एक लीला एकणार आहोत. ज्यामध्ये स्वामी आपल्या भक्ताला म्हणतात की अरे तुला पशाताप झालाना मग बस झाल. सगळे पाप जळाले आहे ही कथा एकण्यापूर्वी एकदा बोला श्री स्वामी समर्थ. श्रीमंत मालोजीराजे हे स्वामी भक्त होते भरपूर दिवस झाले त्यांनी स्वामीयांचे दर्शन घेतलं नव्हत.
म्हणुन मालोजीराजांनी स्वामींना सोलापूरात आणण्यासाठी एकदा मेना पाठवला. सर्व सेवेकरी लोक कुं भारी तेथे आले. स्वामींना सोलापुरात येण्याबाबत अंतकरणापासून विनंती करू लागले. सर्वांचा शुद्ध भाव बघून स्वामी महाराज सोलापूरला येण्यासाठी तयार झाले. आणि मेंन्या मध्ये बसून सोलापूरला आले.
सोलापूर येथे आल्यानंतर श्रीमंत मालोजीराजे तात्काळ स्वामींच्या दर्शनासाठी गेले त्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी सोलापूर वाशीयांची झुंबड उडाली होती. गावामध्ये जत्रेचे स्वरूप झाले होते. गर्दी इतकी होती की श्रीमालोजीराजेंना इंग्रज सरकारची फलटण बोलवावी लागली. त्याच वेळेला सोलापूर मधील चंनबसप्पा नावाचा धनाठयवाणी हा प्रकार बघत होता.
त्यावेळी त्यांच्यासोबत गुरुसिद्धपाक कारांजे नावाचा सावकार मित्र देखील उभा होता. त्याच्याकडे बघत तो उपहासाने बोलू लागला की काय हा मूर्खपणा आहे. सिद्धेश्वराचे दर्शन घेण्याचे सोडून हे सर्व व्यापारी दुकानदार लोक एका संन्यासाला बघायला जात आहेत. हा कसला शहाणपणा किंबहुना असे वाटते की हे लोक अक्कलकोटच्या राजेसाहेबांना बघायला जात असावेत.
त्यावर गुरुसिद्धप्पा बोलला की कोणा देवांची गुरूंचे साधूची निंदा करण्याचे आपल्याला पातक करायची नाही. चल आपण प्रत्यक्ष जाऊनच बघूया. त्यानंतर दोघेही स्वामींच्या दर्शनासाठी धर्मराव बागेत आले. तेथील जनसमुदाय बघून त्यांना आश्चर्य वाटले.
स्वामींच्या जवळ दर्शनासाठी गेले असता श्रीगुरुसिद्धपाने स्वामींचे दर्शन घेतले.तर चनबसप्पाच्या बाबतीत एक आश्चर्य घडले. चन बसप्पा जेव्हांस्वामींच्या दर्शनासाठी तिथे गेला. तेंव्हा स्वामींच्या ठिकाणी पंचमुखी सिद्धेश्वराचे दर्शन झाले.थोडावेळ त्याची मतीभंगच झाली.
स्वामी महाराज प्रत्यक्ष सिद्धेश्वर आहेत ही खूण त्याला पटली. आणि तो पश्चाताप पुर्वक दोन्ही हाताने स्वतःच्या तोंडावर मारून घेऊ लागला. आपली चीपस कापून टाकावी असे त्याला वाटू लागले. आणि या भयाने थरथर कापत तो बोलू लागला की श्री सिद्धेश्वरा मी महापातकी आहे.
मी श्र्वानशुक्राहुन सुद्धा नीच आहे मी आपले भगवत स्वरूप न ओळखल्याने आपली व येथे दर्शनाला येणाऱ्या भक्तांची धर्मदाने नको नको ते वाईट शब्द बोललो आहे. स्वामी या अपराधाची मला क्षमा करा मला या प्रकारची शिक्षा द्या.
<
चंनबसप्पाने असे बोलताचं स्वामीना हसू आले. आणि स्वामी त्यांना म्हणालेकी अरे तुला पश्चाताप झाला आहे ना मगबस झाले. आता तुझे पाप जळाले आहे पश्चाताप हे प्रायश्चित्त आहे. याने आपले चित्त शुद्ध होते दूर व्यसनांचा त्याग होतो मित्रांनो स्वामी असे बोलताच चंनबसप्पाचा विश्वास वाढला.
स्वामिनी आपल्याला माफ केल. स्वामी महाराज आपली आई आहेत.हा दृढ विश्वास त्यांच्या मनात जागृत झाला. आणि तो स्वामींचा अनन्य भक्त बनला. पुढे तो स्वामीची सेवा करू लागला आणि स्वामी कृपेने त्याची भरपूर भरभराट झाली. त्याला राज दरबारात सुद्धा भरपूर मान मिळाला.
इकडे श्रीमंत मालोजीराजे ज्या कामासाठी सोलापूर मध्ये आले होते. ते काम सुद्धा सिद्धीस गेले. स्वामी कृपेने इंग्रजसरकारने अक्कलकोट संस्थानावर आलेली जप्ती उट वली. आणि मालोजीराजे सुद्धा आनंदी स्वगृही परतले. श्री स्वामी समर्थ मित्रांनो या कथेमधून स्वामी आपल्याला अनेक बोध देत आहेत.
स्वामिनी आपल्याला जे काही शिकवले त्याचे रुपांतर विकासाच्या शिडीत कशे करायचे आहे हे स्वामींनी सांगितले आहे. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या चुकांचा पश्चाताप झाल्यास आपण आपल्या तंबूत मनात ठेवून स्वताला त्रास करून घ्यायचा नाही.
कारण हे कृत्य स्वामींना अजिबात आवडत नाही. त्याऐवजी स्वामी आपल्याला जी काही शिकवण देत आहे ती समजून घ्यायची आहे. आणि कोणताही अपराध बोध मनात न ठेवता स्वतःला माफ करत स्वामिनी ची काही आपल्याला शिकवले आहे त्याचे रुपांतर विकासात सुरळीत करायचे आहे.
श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.