मी सगळ्यांसोबत चांगलं वागतो… तरी मीच वाईट का होतो?

नमस्कार मित्रांनो,

आपण सर्वाचे चांगले चिंततो, पण आपल्याबरोबरच का वाईट घडते. असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. देव आपलीच परीक्षा का घेत असेल बरे असा प्रश्न बऱ्याच जणांना भेडसावत असतो. आता सांगा परीक्षा कोणाची घेतात. जो मुलगा गल्लीत काहीतरी विटीदांडू खेळत बसलाय, त्याची परीक्षा घेणार का? की जो मुलगा आयुष्यात आपले काहीतरी चांगले घडावे, म्हणून शाळेत जात आहे, अशा विद्यार्थ्याची घेणार.

शिक्षक परीक्षा त्याचीच घेतात, जे उज्वल भविष्यासाठी शाळेत जातात आणि शिक्षकांनादेखील वाटते की, त्याने चांगले मार्क्स काढावेत आणि पुढच्या वर्गात जावे. म्हणजेच भगवंतानादेखील आपल्या भक्तांनी आयुष्याच्या परीक्षेत पास व्हावे. त्यांची प्रगती व्हावी असे वाटत असते आणि म्हणून कधीकधी आपल्याबरोबर काही वाईट प्रसंग घडत असतील. तर ती आपली एक सत्वपरीक्षा असते. आणि त्यात आपल्याला 100 पैकी 100 गुण पडायचे असतात.

भगवंत परीक्षा घेत असताना तुम्ही सत्याचा मार्ग सोडला, तर तुम्ही आयुष्याच्या परीक्षेत नापास व्हाल. राजा हरिश चंद्रालादेखील खूप मोठ्या परीक्षेमधून जावे लागले होते. आणि म्हणूनच पूर्ण जग त्यांना आजदेखील ओळखते. प्रभू रामचंद्रानादेखील वनवास भोगावा लागला. पण त्यामुळे त्यांनी सत्याची वाट ही कधीही सोडली नाही. म्हणून आजही त्यांना सर्वत्र जगात रामचंद्रप्रभू मानले जाते, त्यांची रामनवमी दिन साजरा केला जातो.

तुमच्या जीवनात येणाऱ्या वाईट प्रसंग, अडचणी हया तुमच्या परीक्षा घेत असतात. म्हणून तुम्ही या वाईट परिस्थितीमध्ये मूळ जो मार्ग आहे तो कधीच सोडायचा नसतो. तुमच्यातला तो आपला चांगुलपणा हया वाईट प्रसंगात, परिस्थितीमध्येदेखील कायम राहायला पाहिजे. त्यातलेच एक उदाहरण देत आहे.

हे जग अगदी गुलाबाच्या झाडासारखे आहे. गुलाबाच्या झाडाला काटे जास्त असतात आणि फुले कमी असतात. त्याचप्रमाणे या जगात काट्यांसारखी म्हणजेच वाईट चिंतनारी लोक खूप जास्त आहेत. आणि चांगले चिंतन करणारी लोक या गुलाबाच्या फुलाप्रमाणे अगदी मोजकीच आहेत. पण या गुलाबाने त्याचा मूळ गुणधर्म हा कधीच सोडायचा नसतो.

आपण पाहतो कितीही जास्त काटे असणाऱ्या गुलाबाला अगदी एक फूल आले, दोन फुले आली तरी ते त्याचा मूळ गुणधर्म सोडत नाही. ती गुलाबे आपल्या सुगंध वासाने दरवळत राहतात. एके दिवशी काटे सहज गुलाबाला म्हटले, तू तर चार दिवसांचा पाहुणा आहे. तू उमलल्यानंतर तुला कोणीही तोडून नेतो, आणि चुरगळतोदेखील. पण मी बघ जसा आहे तसा कायम टिकून आहे. काट्याला स्वतःबद्दल गर्व होता म्हणून तो फुशारकीने गुलाबाला सांगत होता.

मला पहा कोणालाही हात लावायची हिमंत होत नाही. आणि माझे आयुष्य हे तुझ्यापेक्षा जास्त आहे. आणि म्हणूनच मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ व उत्तम आहे. असे काटा एक दिवस गुलाबाला म्हणत होता. मग गुलाब नम्रपणे म्हटला की, तू उत्तम तर आहेसच. तुला जर कोणी हात लावला तर तू त्यांना दुःख देतोस आणि टोचतोस. याउलट आम्हाला जर कोणी हात लावला तर आम्ही त्यांना प्रसन्नता देतो, सुख, सुगंध देतो.

म्हणून लोकांनी आम्हाला चिरडले काय आणि चुरगरळले काय त्यात काही हरकत नाही. कारण आम्ही नष्ट तर होतो, परंतु नष्ट होता होता त्यांच्या हातानादेखील सुगंधित नक्कीच करून जातो. जेव्हा लोक मला तुझ्याबरोबर म्हणजे कांट्याबरोबर पाहतात आणि म्हणतात हया कांट्यामध्ये या छानश्या गुलाबच काय काम आहे. याला तर भगवंताच्या चरणी ठेवायला हवे. म्हणून माझे आयुष्य जरी चार दिवसांचे असले तरी मला भगवंताच्या चरणाशी जाण्याचं पुण्य मिळत.

तुझे आयुष्य माझ्यापेक्षाही कित्येक कितीतरीपटीने जास्त आहे, परंतु, हे पुण्यमात्र तुला कधीच मिळत नाही. हे छोटेसे उदाहरण आहे. म्हणजेच गुलाबाप्रमाणे जे थोडके चांगले लोकदेखील आहे, त्यांना कोणीही चुरगळुन, चिरडून टाकायचा प्रयत्न करते. म्हणून त्यांनी हा आपला चांगुलपणा सोडून न देता हया गुलाबाप्रमाणे दरवळत राहायचे असते.आणि ज्याचे आयुष्य जास्त म्हणून काटे बनून राहण्यापेक्षा गुलाबासारखे चार दिवस राहून आपण आपले आयुष्य सार्थकी लावायला हवे.

आपल्यालादेखील हया गुलाबाप्रमाणे आपल्या बाबतीतही काही वाईट प्रसंग घडतात, काही वाईट अनुभव येतात. आणि या वाईट प्रसंगांमध्येच भगवंत आपली खरी परीक्षा घेत असतात. आपण या वाईट प्रसंगांना कसे सामोरे जातो. आपली सत्यता, आपला चांगुलपणा या वाईट प्रसंगांमध्ये कुठे ढळत तर नाही ना हे भगवंताना पाहायचे असते. भगवंत आपली परीक्षा घेताना किंवा भक्तांची परीक्षा घेताना वारंवार इतके वाईट प्रसंग देतात की, काही प्रसंगांमध्ये आपण कोलमडून पडतो.

आपण आपला सत्याचा मार्ग विसरून जातो. आणि जो कोणी हया वाईट प्रसंगांमध्ये आपला सत्यपणा, आपला चांगुलपणा सोडत नाही त्यांच्या कार्याचे फळ त्याला भगवंत शेवटपर्यंत देतात. म्हणूनच आपल्या बरोबरच नेहमी वाईट का घडते? आपण सगळ्यांशी चांगले वागले तरी भगवंत आपली परीक्षा का घेतात? असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडत असेल तर प्रश्न अगदी साधासोपा आहे. आणि त्याचे उत्तर म्हणजे भगवंत आपल्या भल्यासाठी आपल्यावर हे वाईट प्रसंग मुद्दामून घडवून आणत असतात. आणि या वाईटामध्ये आपला चांगुलपणा टिकून राहणे हे फार महत्वाचे असते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *