नमस्कार मित्रांनो,
आज आपण स्वामींची अशी चमत्कारिक लीला ऐकणार आहोत ज्यात स्वामी म्हणतात की जा त्या दगडाच्या देवाकडे जा.
श्री स्वामी समर्थ.
पुण्यातील नंद राम गवंडी यांना एक शारीरिक व्याधी होती. त्यांनी पुष्कळ वैद्य केले पण काही फरक पडत नव्हता. एके दिवशी अक्कलकोट मधील बाळकृष्ण जोशी जेव्हा बदोद्या हुन परत येत होते.
ते हा ते पुण्यात उतरले तेव्हा नंद राम त्यांना भेटायला गेले. त्यांना असलेल्या व्याधी बद्दल जेव्हा समजले तेव्हा त्यांनी स्वामी बद्दल सांगितले.
स्वामींची महती ऐकून नंद राम यांना खात्री वाटू लागली की त्यांची व्याधी बरी होईल. जोशींना म्हणाले मला स्वामींच्या नावाने अंगारा लावा. आणि बरे वाटल्यास अक्कलकोटला स्वामींचे दर्शनाला जाऊ.
नंद राम यांना बरे वाटू लागले एका आठवड्यात त्यांना पूर्ण बरे वाटू लागले. झोप चांगली येऊ लागली. अक्कलकोट ला येऊ असा संकल्प केला होता.
त्याप्रमाणे ठाकूर दास बुवा ना सोबत घेऊन नंद राम स्वामींच्या दर्शनाला गेले. अक्कलकोट मध्ये स्वामींची अजानुबहू मूर्ती पाहून खूप आनंद झाला.
थोडे दिवस तिथेच राहायचे ठरवले. बाळकृष्ण जोशी यांच्या घरी राहिले. तिथे त्यांनी गरिबांना अन्न, वस्त्र, दक्षिणा दिल्या.
नंद राम यांचा सोमवार व्रत असे म्हणून ते बाळकृष्ण जोशी यांच्या सोबत तेथील मल्लिकार्जुन मंदिर मध्ये दोघे दर्शनाला गेले. मंदिराच्या बाहेर स्वामी बसले होते.
<
दोघांनी स्वामींचे दर्शन घेतले. तेव्हा स्वामी म्हणतात आम्ही शंकर नाही. जा ते दगडाच्या देवाकडे जा. त्यांना काही समजले नाही. ते गाभाऱ्यात गेले.
आत गेल्यावर नंद राम यांना शिवलिंग दिसत नव्हते. माझे काही चुकले का असा विचार करत असताना शिवलिंगाच्या जागी त्यांना स्वामी दिसले.
बाहेरही स्वामी तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्वामी साक्षात् शिव शंकर आहेत. त्यांनी स्वामी चरणी लोटांगण घातले. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अंगारे यांचा अर्थ असा आहे की आपला सुप्त असलेला विश्वास प्रकट व्हावा.
त्याचे रूपांतर चमत्कार होते. फक्त दगडाचे शिवलिंग म्हणजे शिवशंकर नव्हे. शिवलिंग तर माझ्या विराट स्वरूपाचे प्रतीकात्मक रूप आहे. असे स्वामी म्हणतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.