अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, भक्त हो नमस्कार,
आपण मागील स्वामी वाणीमध्ये बघितले की स्वामी महाराज स्वामी सुताना आत्मलिंग पादुका देऊन कसे कृपा करतात. त्यानंतर पुढे त्याच रात्री स्वामींनी त्यांच्यावर पूर्ण अनुग्रह केला. या रात्री स्वामी महाराज गावाबाहेरील बस्ती पिंपळाच्या झाडाखाली होते. तेव्हा हरिभाऊ आणि सोबतची मंडळी स्वामींच्या सोबतच जाऊन राहिले तेथे सर्व झोपलेले होते भक्ती स्वामी महाराज जागे होते.
हे बघून स्वामिसुत स्वामींच्या जवळ येतात स्वामींच्या चरणाशी बसून, स्वामींचे पाय कुरवाळायला सुरुवात करतात त्यावेळी स्वामी महाराजांच्या आणि स्वामी सुतांमध्ये गुप्त चर्चा सुरू होती. ती बरीच वेळ सुरू होती तेव्हा स्वामींनी आपल्या उशाशी असलेली छाठी आणि कंफनी हरिभाऊच्या अंगावर फेकून दिली आणि त्यांना सांगितले की आता आपला संसार लुटवून टाक.
स्वामिसुत हे अनन्य भक्तीचे अवतार होते आणि श्री गुरूंचा हुकूम मानने त्याच्या हुकुमाचे पालन करणे हा अनन्य भक्तीचा दिव्य गुण आहे आणि त्याच प्रमाणे घडले. दुसऱ्या दिवशी स्वामी हुकूम प्रमाण मानून स्वामींनी दिलेल्या आत्मलिंग पादुका आणि कपडे परिधान करून मुंबईला आले. घरी आल्यानंतर त्यांनी ब्राह्मणास बोलावून दागदागिने गाई म्हशी वगैरे संकल्प करून लुटून टाकले.
त्यांची पत्नी तारा बाई हिच्या अंगावर असलेले साठ तोळ्याचे सोन्याचे तोडे 24 तोळ्याच्या बांगड्या 18 पुतळ्यांचे काठळे ठूशी असे दागिने लुटवले आणि हे सर्व दान एकाच व्यक्तीकडे जाऊ नये म्हणून स्वामी सुतां च्या मित्रांनी हे सर्व विकून त्याचे पैसे ब्राह्मणांना दिले. स्वामीभक्त हो विचार करा हा प्रकार सुरू असताना स्वामी सुतांच्या पत्नीच्या मनाची काय अवस्था झाली असेल?
अहो त्या माऊलीचे डोळे रडून रडून सुजले होते. आपल्याकडे थोडेतरी दागिने असावे अशी ती विनवणी करत होती. परंतु स्वामीसुतांची वैराग्य इतके कडकडीत होते की त्यांना सर्व सोने लोखंडा प्रमाणे वाटू लागले. अहो स्वामि सुतानी त्यांच्या पत्नीच्या अंगावर असलेली मनी मंगळसूत्र सुद्धा दान केले आणि तिला शुद्ध पांढरं पातळ परिधान करण्यास दिले खरोखर श्री गुरूच्या हुकूम पालन करणारे स्वामीसुत अनन्य भक्त आहेत.
पुढें स्वामी सुतानी गळ्यात जो वीना घातला तो पुढे तीन वर्ष काढलाच नाही त्यानंतर त्यांनी प्रथम कामठी पुरात मठ स्थापन केला ते प्रेमळ भजन करत स्वामींच्या लीलांचे गुणगान गात, स्वामींच्या लीलांचा बोध सर्वांना सांगत त्यांची भक्ती शुद्ध होती म्हणून अनेक लोक त्यांच्याकडे येऊ लागले पारशी, प्रभू, सोनार, पंच कळशी, वानी असे सगळे लोक स्वामींची भक्ती करू लागले.
अशा पद्धतीने स्वामी हुकूम शिरसावंत मानून तंतोतंत पालन करणारे हरिभाऊ स्वामिसुत झाले. स्वामी समर्थांच्या आनंद भक्तीची प्रेरणा देणारे रसाळ चरित्र आपण पुढेही करणारच आहोत!! तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय: स्वामीभक्त हो स्वामी महाराज यांनी अक्कलकोट नगरीत केलेल्या लीला खरोखर लाखो पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
यामध्ये स्वामींनी अनेक पात्र घडवून आणले. सुंदराबाई चोळप्पा यांसह अनेक पडद्यामागील पात्र जे आपल्या मनातील विविध अवस्थाचे दर्शन घडवतात. त्यातील एक सर्वोत्तम पात्र म्हणजे स्वामिसुत स्वामीभक्तहो अनन्य भक्ती ईश्वराचा स्वच्छ सुंदर आरसा असतो. ईश्वराला जेव्हा त्याचे स्वतःमध्ये आनंद घेण्याची इच्छा जागृत होते तेव्हा तो अनन्य भक्तांची निर्मिती करतो.
<
यातील लेख अनन्य फक्त म्हणजे स्वामी सुत म्हणूनच अनेक संत मंडळींनी त्यांच्या अभंगात पांडुरंगाला सांगितले की हे पांडुरंगा तू भक्तां शिवाय अपूर्ण आहे. असो अक्कलकोट नगरी स्वामी माऊलींचा अनन्य भक्ती अवतार म्हणजे स्वामीसुत आजच्या लीलेत आपण बघितले की स्वामी हूकूम शिरसावंद्य मानून स्वामी सुतानी आपला सर्व संसार लुटून टाकला.
यातूनच स्वामी महाराज आपल्याला आजच्या पिढीला संसार लुटवण्याची आज्ञा देत नाही. तर या लिलेतून आपल्या अनन्य भक्ती चा श्री गुरु नावाचा गुण धारण करण्याची प्रेरणा देतात. आणि स्वामी हुकुमाची सर्वोच्च संभावना काय असू शकते. त्याची काय अभिव्यतीं असू शकते. याची समज देत आहेत. आणि जेव्हा आम्ही स्वामी हुकूम चे पालन करतो.
तेव्हा आपोआप नको असलेल्या गोष्टी सुटून जातात. आज आपल्याला या लीलेतून प्रेरणा घेता आपल्याला आपली भक्ती अजून बळकट करायची आहे. आपली इच्छा शक्ती अजून बळकट करायची आहे. स्वामींनी तुम्हा आम्हा सर्वांना पृथ्वीवरील जीवनात एक पात्र दिलेले आहे. स्वामी सुतांच्या अनन्य भक्तीच्या रूपातून स्वामी हुकूम या दिव्य गुणाची प्रेरणा घेऊन आपल्याला आपले पात्र उत्कृष्ट निभवायाचे आहे.
जीवनात उच्चतम ध्येय ठेवून त्यासाठी आपल्याला मिळणाऱ्या स्वामी हुकूम चे पालन करायचे आहे. आपले कर्म म्हणजे स्वामी सेवा. हा विश्वास दृढ करायचा आहे. हे करत असताना कदाचित आपले मन अहंकारी बनले, मी खूप स्वामींची सेवा करत आहे. असे बडबड करू लागले तर आजच्या स्वामी वाणीची आठवण करून द्यायची आहे.
आणि स्वामी सुतंच्या त्यागासमोर खरोखर आपली सेवा किती सामान्य आहे याची समज द्यायची आहे. चला तर आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था !! अक्कलकोट नगरीत तुम्ही असंख्य लीला केल्यात…स्वामी सुतांसारखे अनन्य भक्तीचे पात्र तुम्ही घडवले. लाखो पिढ्यांसाठी आम्हाला अनन्य भक्तीचे प्रेरणास्रोत दिले. आणि या प्रेरणास्रोततून आम्हाला अनन्य भक्तीची प्रेरणा देत आहात. आमचे जीवन आनंदी करत आहात. तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.