सुट्टे पैसे घरात इथे ठेवा, पैसा वाढतच जाईल.

नमस्कार मित्रानो,

दिवसाची सुरुवात शिक्के खर्च करून करू नये. तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करत असाल ती वस्तू खरेदी करत असताना कोणत्याही परिस्थितीत आपल्या खिशातून, पाकिटमधून, पर्स मधून किंवा आपल्या घरातून शिक्के खर्च होणार नाहीत.1 रुपया, 2, 5 रुपये खर्च ले जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपण नोटा खर्च करू शकता. पण शिक्के खर्च करू नका.

पहिला व्यवहार पार पडल्यानंतर आपण शिक्क्यांची देवाण घेवाण करू शकता. दुसरी गोष्ट नेहमी घराबाहेर पडताना 1 किंवा जास्त पैश्यांची नाणी नक्की ठेवा. आणि ही नाणी संपूर्ण दिवस भरात खर्च करू नका. जेव्हा दिवस संपेल तेव्हा ही नाणी पुन्हा एकदा त्या मूळ जागेवर ठेवून द्या. दररोज घराबाहेर पडताना आपल्या शर्ट किंवा पँट मध्ये आपण ही नाणी ठेवत चला.

शक्यतो आपल्या उजव्या बाजूचा जो खिसा आहे त्याठिकाणी हे शिक्के ठेवण्याचा प्रयत्न करा. हे उपाय आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहावी. त्यात सतत वाढ व्हावी. लक्ष्मी म्हणजे पैसा, धन. अनेक लोकांकडे पैसा टिकत नाही. किंवा पैसा येतच नाही. पैसा येता येता कुठल्याही अडचणीने तो थांबतो. यासाठी हे उपाय मी तुम्हाला सांगत आहे.

अनेकजण तक्रार करतात की, उपाय करून पाहिलेत फायदा झाला नाही. अनेकांना फायदा होतो. काहीना होत नाही. लक्षात घ्या कोणतेही उपाय करताना ते पूर्ण समर्पित होऊन करा. तन, मन, धन अर्पण करावे लागते तेव्हाच ते उपाय सफल होतात तर त्या उपयासोबत स्वतः ला जोडण्याचा प्रयत्न करा. की मी हा उपाय करत आहे आणि तो सफल होणारच आहे.

अशी भावना ठेवा. तिसरी गोष्ट आपण जेव्हा जेव्हा एखादा व्यवहार करतो. खरेदी करतो. वस्तू विकत घेतो. आपण पैसे देतो. त्यावेळी त्याबदल्यात सुट्टे पैसे मिळत असतात. या सुट्ट्या पैश्यात तुम्हाला जी नाणी मिळतील ही नाणी सतत स्वतः जवळ ठेवा. ही नाणी साठवत चला. ही नाणी साठवण्यासाठी आपण रेशमी पिशवी तयार करा.

किंवा रेशमी कापड असेल लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे पिशवी असेल, थैली असेल, पर्स असेल, पाकीट असेल काहीही चालेल. फक्त ते रेशमी असावं. लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या थैली मध्ये, पिशवी मध्ये, पॉकेट मध्ये, रुमाल मध्ये जे काही सुट्टे पैसे येतील रोज साठवत चला. रोज येतील असे नाही. जेव्हा जेव्हा येतील तेव्हा ते न मोजता, किती आहेत ते न पाहता त्यात ठेवून द्या.

काही दिवसानी मोठ्या प्रमाणात हे पैसे जमा होतील. हे पैसे जितके जास्त वाढतील तुमच्या घरात लक्ष्मीची तितकी जास्त वृद्धी होणार आहे. याठिकाणी पैसे ठेवताना मुद्दामहून आवाज होईल याची काळजी घ्या. पैसे टाकताना आवाज होऊ देत. घरामध्ये लक्ष्मी खणकु देत. अनेक जणांचे यावर विश्वास बसत नाही.

मित्रानो हा उपाय करताना लक्षात घ्या आपण या पैश्यासोबत एखादी कमल गट्ट्याचे बी आहे ते टाकू शकतात. एखादी लसूण पाकळी त्या ठिकाणी टाकू शकता. विशेष करून हे शिक्के गोळा करत असताना विशेष शिक्के जर दिसले वेगळ्या प्रकारचे हे शिक्के ठेवा. अनेक नेत्यांचे, पुढाऱ्यांचे, स्वतंत्र सेनानी होते भगत सिंग वैगरे त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहेच.

<
महात्मा गांधी, असतील, इंदिरा गांधी असतील. जर तुम्हाला दिसून आले तर ते शिक्के त्या आपल्या थैली मध्ये चुकूनही ठेवू नका. कारण अनेक लोकांना 99% टक्के लोकांना नकारात्मक प्रभाव दिसून आलेला आहे. पैसा तर येतो पण त्या पैश्या ला पाय फुटतात. विनाकारण वाद विवाद चालू होतात. भयंकर वाद विवाद.

तर असे जे शिक्के चुकूनही या थैली मध्ये ठेवू नका. हे पैसे लागलीच खर्चून टाका. हे पैसे खिशातही ठेवू नका. अत्यंत वाईट प्रभाव त्याचे दिसून आलेले आहेत. ही थैली आहे ती आपल्या तिजोरीत ठेवून द्या. लक्ष्मी आकर्षित होते. मोठ्या प्रमाणात धन आपल्याकडे येऊ लागते. नक्की करून पहा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.