श्रावण संकष्टी चतुर्थी 25 ऑगस्ट 2021, 2 सुपारी आणि 2 वेलदोडे करतील सर्व मनोकामना पूर्ण.

नमस्कार मित्रांनो,

आज आपण श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला 2 सुपारी आणि 2 वेलदोडे यांच्या खास विधीने करायचा एक असा उपाय पाहणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व विघ्न सर्व संकटे गणपती बाप्पा नष्ट करून टाकतील.

आपल्या शत्रूचा सफाया होऊन जाईल. आपल्या जीवनातील शत्रु बाधा नष्ट होऊन जाईल व आपले मनोरथ सर्व पूर्ण होईल. आज आपण संकष्टी व्रताची माहिती जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्थी चा पूजन विधि, शुभ मुहूर्त आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत का केले जाते या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत.

तसेच काही उत्कृष्ट आणि चमत्कारिक असे उपाय जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत त्या उपायांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. ही तिथी गणपतीबाप्पांना समर्पित असते. या वर्षी ही तिथी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येत आहे. त्यामुळे या तिथीला अधिक महत्त्व आहे.

या दिवशी येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला हेरंब संकष्टी चतुर्थी किंवा बहुला संकष्ट चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी केल्या जाणार्‍या पूजनाचे, व्रताचे कैक पटीने फळ मिळते.

या महिन्याची संकष्टी चतुर्थी 25 ऑगस्ट 2021 बुधवार या दिवशी येत आहे. संकष्टी प्रारंभ तिथी 25 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 04:18 मिनिटांनी सुरू होऊन 26 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 05:13 मिनिटांनी समाप्त होते.

25 ऑगस्ट 2021 रोजी गणेश पूजनाचा मुहूर्त सकाळी ब्रह्म मुहूर्तावर 04:38 मिनिटांनी सुरू होऊन 05:28 पर्यंतचा आहे व दुपारी 03:15 मिनिटांनी सुरू होऊन 05:35 मिनिटं पर्यंतचा मुहूर्त पूजनाचा आहे. पण गणेश चतुर्थीचे व्रत 25 ऑगस्ट 2021 रोजीच करायचे आहे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश यांची पूजन केल्याने जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते. माता, भगिनी त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये दीर्घायुष्यासाठी तसेच त्यांच्या सौभाग्य मध्ये वृद्धी होण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या व्रत करतात.

शास्त्रांमध्ये भगवान श्रीगणेशांना प्रथम देवता मानले गेले आहे आणि त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशांची स्तुति व स्मरण केले जाते. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाचे पूजन केल्याने केतू ग्रह व बुध ग्रह यांचे अशुभ परिणाम नष्ट होतात.

त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये श्रीगणेशांना विघ्नहर्ता असे देखील म्हटले जाते. अनेक मान्यता नुसार संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाचे पूजन केल्याने जीवनातील जे काही विघ्न, संकटे असतील ते संपून जातात. यादिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी व व्रत न करणाऱ्यांनी देखील चंद्राचे दर्शन आवश्य घेतले पाहिजे.

या दिवशी चंद्र दर्शन रात्री 8 वाजून 59 मिनिटांनी होईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यक्रम आटपून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे.

त्यानंतर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर श्री गणेशांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करावा. हा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करताना अशा पद्धतीने करावी की पूजन करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला येईल.

यानंतर श्रीगणेशांना धूप-दीप दाखवावा. बाप्पांना सिंदूर, हळद, कुंकू, अक्षत, पिवळी फुले, लाल फुले अर्पण करावीत. थोड्या दुर्वा अर्पण करून बाप्पांचे विधीवत पूजन करावे व पूजेच्या दरम्यान आपण ओम गणेशाय नमः किंवा ओम गं गणपतये नमः या मंत्राचे उच्चारण करायचे आहे.

कमीत कमी 108 वेळा या मंत्रांचे उच्चारण करावे. यानंतर श्रीगणेशाची आरती करून बाप्पांना मोदक, लाडू किंवा तिळापासून बनविलेले गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी संकष्टी चतुर्थी व्रताचे पठण करून चंद्राला अर्घ्य देऊन व्रताचे पारण करावे. उपवास सोडावा.

या दिवशी आपल्याला सुपारीचा एक असा उत्कृष्ट, अद्भुत आणि चमत्कारिक उपाय करायचा आहे की ज्या उपायांमुळे निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन दिसायला लागेल.

या उपायासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळी एका लाल कपड्यावर आपण श्रीयंत्र स्थापित करावे व या श्री यंत्राजवळ एक सुपारी ठेवावी. गणेश पूजनामध्ये सुपारी ठेवल्याने गणपतीबाप्पा फारच प्रसन्न होतात. धनप्राप्तीसाठी श्री गणेशा यांच्या सोबत सुपारीचे पूजन करणे अत्यंत आवश्यक असते.

यानंतर श्री गणेश यांचे व श्री यंत्राचे पूजन करून आपण या सुपारीला हळद-कुंकू वहावे. थोडेसे अक्षता वाहावेत. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या व श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करायचा आहे. जे मंत्र आपल्याला येत असतील त्या मंत्रांचा जप आपल्याला यथाशक्ती करायचा आहे.

त्यानंतर ती सुपारी एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटांमध्ये किंवा जिथे देखील आपण धन ठेवता त्या जागी ही सुपारी ठेवायची आहे. या उपायांमुळे आपल्या जीवनातील पैशांची कमतरता कधीही भासणार नाही. आपले घर धनधान्याने नेहमी भरून राहील.

हा अगदी अद्भुत आणि चमत्कारिक उपाय आहे. जर आपल्या जीवनामध्ये वारंवार अडथळे निर्माण होत आहेत तर अशावेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पुर्व बाजूला किंवा उत्तर बाजूला एक पिवळे कापड अंथरावे व त्या कापडावर आपण एक चांदीचे नाणे ठेवावे.

यानंतर चांदीच्या नाण्यावर पण एक सुपारी ठेवावी. या सुपारीला श्रीगणेश मानून आपण त्या सुपारीची विधिवत पूजा करावी. धूप-दीप दाखवून हळद कुंकू, अक्षता, फुल, दुर्वा व्हायच्या आहेत. त्यानंतर आपण हे कापड दुसऱ्या दिवशी काढून त्यामध्ये ठेवलेली सुपारी घेऊन एका गणेश मंदिरात गणपती बाप्पांना ती सुपारी अर्पण करायची आहे आणि जे चांदीचे नाणे आपण त्यात ठेवले होते ते नाणे आपण आपल्या तिजोरी किंवा कपाटामध्ये ठेवावे.

या उपायांमुळे आपल्या जीवनातील दरिद्रता, दुर्भाग्य कायमची निघून जाते. आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळायला लागेल. आपल्या घरामध्ये धनधान्याची, संपत्तीची भरभराट होईल.

जर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळी आपण गणपती बाप्पांच्या समोर दोन सुपारी आणि दोन वेलदोडे ठेवावेत. या नंतर या दोन्ही सुपारीवर व दोन्ही वेलदोडे यांना हळद-कुंकू लावा. अक्षता, पुष्प अर्पण करावे व धूप दीप दाखवावा.

यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा ओम गं गणपतये नमः या मंत्राचा कमीतकमी 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर आपण जीवनामध्ये कधीही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल, एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी जात असाल तेव्हा या गणपतीबाप्पांना अर्पित केलेल्या दोन सुपार्‍या आणि दोन वेलदोडे आपल्या खिशामध्ये ठेवून जावेत.

आपल्या कार्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल. आपले कार्य अगदी सहज पणे पूर्ण होईल. तर हे होते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे काही अत्यंत अद्भुत आणि चमत्कारिक उपाय.

या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या सर्व संपून जातील व आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी यांची भरभराट होईल. त्यामुळे हे उपाय एकदा नक्की करून पहा. गणपती बाप्पा आपले आशीर्वाद नेहमी तुम्हाला देतील.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *