नमस्कार मित्रांनो,
ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र यामध्ये आपल्या प्रत्येक अडचणींवर उपाय सांगितलेला आहे. घरात काही संकट आले, काही अडचण आली तर त्याचे समाधान ही घरातच असते.
आपल्या घरात काही वस्तू अशा ठेवलेल्या असतात किंवा केल्या जातात त्यामध्ये थेट भगवंताचा आशीर्वाद तर असतो. परंतु त्यात त्यांचा निरादर ही होतो. यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.
तसेच कामात अडथळे, सततचे आजारपण, अशांतता, अस्थिरता या सर्व संकटांचा सामना करावा लागतो. आज आपण काही अशा गोष्टी जाणून घेऊया ज्यांना घरातील सगळ्या सदस्यांनी लक्षात ठेवावे.
विशेष करून घरातील स्त्रियांनी याकडे लक्ष द्यावे. कारण घरात जास्तीत जास्त वावर स्त्रियांचा असतो. स्त्रियांनी फक्त ही चार कार्य केली तरीही घरात कधीही अडचण, कटकटी व बाधा प्रवेश करू शकणार नाही.
सकाळी उठल्याबरोबर लगेचच सर्वात आधी घराची स्वच्छता करावी आणि मग स्नान करून त्यानंतरच किचनमध्ये प्रवेश करावा. स्नान न करता किचनमध्ये प्रवेश केल्यास देवी अन्नपूर्णेचा निरादर केल्यासारखे होते व अन्नाला बरकत राहत नाही.
घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवावा जेथे कोणाची नजर पडणार नाही. म्हणजे झाडू कधी कोणाला दिसणार नाही अश्याठिकाणी लपवून ठेवावा. तसेच झाडू कधीही उभा ठेवू नये.
झाडू ला कधीही पायही लावू नये आणि चुकून पाय लागला तर आधी नमस्कार करावा. झाडूला पाय लागणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा.
आपले दागिने, पैसे, धन ठेवण्याची जी जागा असते म्हणजेच तिजोरी. या तिजोरीत एक लाल कपडा अंथरून त्यावर आपले दागिने आणि पैसे ठेवावेत. असे मानले जाते की तिजोरीत लाल कापड अंथरल्यास घरातील धनात नेहमी वृद्धी होत राहते.
सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर आपण जे काही भोजन बनवले असेल त्यातील भगवंताला नैवेद्य दाखवावा व त्यानंतर अस आपण व आपल्या परिवाराला भोजन द्यावे. यामुळे देवी अन्नपूर्णा आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते. अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.