स्त्रियांनी या वेळी चुकून सुद्धा धुवु नयेत केस… होईल मोठा अनर्थ…

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत स्त्रियांनी केस कधी धुवावे आणि त्यामागची खरी कारणे कोणती. आपण अनेकदा ऐकले असेल की गुरुवारी केस धुऊ नयेत. तर मग कधी धुवावेत? शुभ व अशुभ वेळ याबद्दल आज जाणून घेऊया.

आपल्या वयस्कर व्यक्तींनी सांगितले आहे की गुरुवारी केस धुऊ नये. सूर्य, गुरु, चंद्र, शनि, मंगळ हे केस आणि डोक्याशी निगडित असे ग्रह आहेत आणि आपण वेळी-अवेळी केस धुतल्याने ते ग्रह आपले बिघडू शकतात. म्हणून आम्ही सांगत असलेल्या वारी तुम्ही केस धुण्याचा प्रयत्न करा.

एकादशीला केस चुकूनही धुऊ नयेत. आदल्या दिवशी धुवावे. एकादशीला केस धुण्याने आपल्या व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही. ज्यास अमावस्या पाळली जाते, पितरांना नैवेद्य दाखवला जातो त्या घरातील स्त्रियांनी अमावस्येला चुकूनही केस धुऊ नयेत. पुरुषांनी सुद्धा अमावस्येला दाढी, केस चुकूनही करू नयेत.

दाढी करणे, केस धुणे अमावास्येला कटाक्षाने टाळायचे आहे कारण हे अशुभ मानले जाते. असे करण्यास टाळल्यास आपल्या घरात बरकत येते, संकटांचा व अडचणींचा नाश होतो.

रविवार असेल आणि एखादा उपवास असेल तर केस धुऊ नयेत. मात्र रविवारी कोणताही उपवास नसेल तर तुम्ही केस धुऊ शकता. रविवारी जर तुमचा एखादा बोलत असेल आणि तुम्ही केस धुतले तर दरिद्रता येऊ शकते.

जर तुम्ही सोमवारचे व्रत करत असाल तर केस धुवावेत कारण ते खूप शुभ मानले जाते. केस धुतल्यावर ते सुकवून आणि बांधून नंतर शंकराची किंवा इतर देवांची पूजा करावी. कधीही केस ओले असताना किंवा मोकळे सोडून देव पूजेला बसू नये.

मंगळवारी केस अजिबात धुऊ नये कारण यामुळे घरात भांडणे वाढतात. मुलांची प्रगती थांबते आणि पतीच्या आरोग्यावर परिणाम होतो.

बुधवारी जर तुमचा एखादा व्रत, उपवास असेल तर केस धुवावेत आणि जर उपवास, व्रत नसेल तर केस धुऊ नका. कारण बुधवारी केस धुणे हे भावा साठी चांगले नसते. जर तुम्हाला एखादा भाऊ असेल तर शक्यतो उपवास किंवा करत नसताना बुधवारी केस धुऊ नका.

गुरुवारी मात्र कोणीही कधीही केस चुकूनही धुऊ नये. यामुळे जीवनात अनेक संकटे येतात. गुरु ग्रहाची दृष्टी बदलते. पती-पत्नीत कलह निर्माण होतो. धनहानी ची खूप शक्यता असते. म्हणून गुरुवारी केस ही धुऊ नये आणि फरशी पुसू नये.

शुक्रवारी जर तुमच्या घरात असेल तर केस धुवावेत अन्यथा धुऊ नये. जर तुमच्या घरात असेल तर शुक्रवारी केस धुतलेले खूपच चांगले आहे आणि विवाहित स्त्रियांनी कुंकू मध्य भांगेत लावावे. हे खूपच शुभ असते. कुंकू कधीही कडेच्या भांगेत कुठेही लावू नये. फक्त मध्यभांगेत लावावे. हे सौभाग्याच्या दृष्टीने खूप फलदायी ठरते.

शनिवारी कुमारिकेने केस धुतलेले चालतात. सौभाग्यवती स्त्रियांनी केस धुऊ नयेत. पुरुषांनी दाढी, केस शनिवारी अजिबात करू नयेत. याचा तुमच्या ग्रहांवर आणि तुमच्या आयुष्यावर अत्यंत वाईट परिणाम होतात.

आणि अशी काही अडचण आली की तुम्हाला शनिवारी केस धुवावे लागले तर किंचितसे जिरे पाण्यात घालावे आणि मग त्या पाण्याने केस धुवावेत. त्याचप्रमाणे जर गुरुवारी केस धुवायचे असेल तर पाण्यात किंचित हळद आणि मंगळवारी धुवायचे असेल तर किंचित लाल मसूर ची डाळ आणि तुळस पाण्यात घालून मग केस धुवावेत.

मात्र हे जर अडचण असेल आणि केस धुवावे लागले तरच करावे. वारंवार करू नये. या सर्व गोष्टी तुमचे कुटुंब, तुमची मुले, पती सर्वांशी निगडीत असतात. त्यामुळे या गोष्टी अवश्य पाळा.

देवा पुढे कधीच केस मोकळे सोडू नका. झोपताना केस मोकळे ठेवू नका आणि स्वयंपाक करताना केस कधीच मोकळे ठेवू नका. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले नाही.

म्हणून काही शास्त्र आहेत, नियम आहेत जुन्या बायकांचे जे जरूर पाळावेत. जेणेकरून आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची आपल्याला काळजी घेता येईल. स्वतःहून कुठले संकट आपण आपल्यावर ओढवून घेणार नाही.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *