आज आपण स्वामी समर्थांचा फोटो स्त्री रुपात का असतो? काय आहे यामागील रहस्य हे आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात आपल्यामधील बऱ्याच माणसांना प्रश्न पडला असेल श्री स्वामी समर्थांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो.
आपल्या स्वामींचा फोटो स्त्री रुपात का असतो? काय आहे यामागील सत्यता असे बरेच प्रश्न स्वामींच्या भक्तांना पडलेले असतात.
तुमच्या प्रश्नाचे निवारण करणार आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये एक कथा आहे. ती कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रहो खूप वर्षापूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचा एक भक्त होऊन गेला. तो स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त होता.
तो भक्त स्वामींचे मनोभावे दररोज सर्षण घेण्यासाठी यायचा. दिवसभर स्वामींचे नामस्मरण करायचा.याकरणाने तो स्वामींचा प्रिय भक्त होता. एके दिवशी त्याचा तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मीचा दर्शनाला गेले. कारण त्याच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते.तर भक्त म्हणाला आपण प्रथम स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ.
मग मित्र म्हणाला महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे. तिकडे जाण्यासाठी एकच बस आहे. आणि तीही चुकली तर तीही सुटेल तर आपण आधी तिकडे जाऊया.म्हणजे आपल्याला उशिरही होणार नाही. तो भक्त त्या मित्रास म्हणाला बस सुटली तर सुटु दे.
माझ्या स्वामिंमध्येच सर्व देव सामावले आहेत. त्यांचं दर्शन झाले म्हणजे आईचं दर्शन होईल. असं समाज असे म्हणत तो पुढे मित्रास म्हणाला, तू फक्त एक वेळेस माझ्या सोबत चल. माझा जसा स्वामिंवर विश्वास आहे तसा तुझाही बसेल. हे ऐकून त्याचा मित्र स्वामींच्या दर्शनाला गेला.
आता स्वामी तर साक्षात देवच रूप. त्यांना त्या दोघांच्या मनात काय चालू आहे हे समजले. जेव्हा ते दोघे दर्शन घेण्यासाठी जातात तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना साक्षात दर्शन देतात. आणि त्या भक्तांच्या मित्राला बोलतात की, का रे तुझा विश्वास बसत नाही का? सगळीकडे मीच आहे असे म्हणून स्वामींनी त्याचवेळी महालक्ष्मीचे रूप धारण केले.
आणि त्या भक्तास दर्शन दिले. तर अश्याप्रकरे आपल्या भक्तांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी प्रत्येकाला प्रचिती देत असतात.त्यामुळे सर्वांची स्वामी वर श्रद्धा असायला पाहिजे. तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तर स्वामींना विसरून जाऊ नका. फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत रहा. कारण भक्ती हीच खरी शक्ती आहे.
श्री स्वामी समर्थ..
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.