नमस्कार मित्रांनो,
आठवड्यात एकूण सात वार आहेत आणि प्रत्येक वाराचे आपले एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. त्याशिवाय प्रत्येक वाराला वेगवेगळ्या देवी-देवतांची उपासना केली जाते.
प्रत्येक वाराचे काही नियम आहेत. त्या नियमांप्रमाणे आपण जर वर्तन केले आपल्याला त्यातून खूप शुभ फळे मिळत राहतात. आज आपण सोमवार ची माहिती पाहणार आहोत.
सोमवार हा चंद्र ग्रहाशी निगडित वार आहे. या दिवशी महादेवांचे पूजन केले जाते. महादेवांची उपासना केली जाते. सोमवार हा महादेवांचा अत्यंत आवडता दिवस म्हणून जर आपण महादेवांच्या नियमांचे पालन केले तर महादेवांची कृपा आपल्यावर लवकर होते.
महादेव आपल्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर करतात. सोमवार चे काही नियम आहेत आणि आपण हे नियम जर पालन केले तर आपण आपल्या जीवनात खूप आनंद व सुखाची प्राप्ती करू शकतो.
आज आपण पाहणार आहोत की सोमवारी कोणत्या गोष्टी करू नयेत. कोणत्या वस्तूंचे सेवन करु नये. कोणत्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत. म्हणजेच थोडक्यात आज आपण हे जाणून घेणार आहोत सोमवारी कोणती कामे निषिद्ध सांगितलेली आहेत.
आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार. हा दिवस महादेवाला समर्पित केलेला आहे. तसेच या दिवसावर चंद्रदेवांचाही प्रभाव असतो. म्हणून या दिवशी महादेव व चंद्रदेव या दोघांची उपासना केली जाते.
आपल्याला सुख समृद्धी व संपन्नता मिळावे यासाठी सोमवारी व्रत ठेवले जाते. उपवास केला जातो. सोमवारी उपवास केल्याने आपल्यावर महादेव व त्याबरोबरच चंद्रदेव यांचीही कृपा होते आणि आपल्याला जीवनात सुख व सौभाग्याची प्राप्ती होते.
आपल्या वैवाहिक जीवन सुखमय असावे तसेच आपल्याला चांगला जोडीदार मिळावा यासाठी अविवाहित मुली सोमवारचे व्रत खूप उत्साहाने करतात. या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांना गंगेचे पाणी अर्पण करावे.
तसेच दोन बेलाचे पान अर्पण करावे. महादेवाच्या पिंडीला चंदनाचा लेप लावावा आणि नैवेद्य म्हणून दुध, फळे अर्पण करावीत. सोमवारी रात्री चंद्र देवांना अर्घ्य जरुर द्यावे. यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येते.
महादेवांना पांढरा रंग अतिप्रिय आहे म्हणून महादेवांना दूध, दही, साखर, पांढरी मिठाई या वस्तूंचा नैवेद्य अर्पण करावा आणि शक्य असेल तर आपणही सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे सेवन करावे. यामुळे महादेवाची कृपा आपल्यावर नक्कीच होते.
तसेच सोमवारी पांढऱ्या रंगाची वस्त्रे धारण करणेही शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार जर काही महत्त्वाच्या कामानिमित्त आपण घराबाहेर पडणार असाल तर घराबाहेर पडण्यापूर्वी आपला चेहरा आरशात पहावा व मगच घराबाहेर पडावे.
या उपायामुळे आपल्या कार्यात येणारे अडथळे दूर होतील आपल्याला या कामामध्ये यश मिळेल. ही आहेत कामे जी सोमवारी नक्की करावीत. परंतु काही कामे अशी आहेत जी सोमवारी अजिबात करू नयेत.
सोमवारी मांसाहार करू नये. सोमवारी व्रत करावे आणि शुद्ध व सात्विक आहार म्हणजेच दूध, दही, फळे यांचे सेवन करावे. सोमवारी काळया रंगाची वस्त्रे परिधान करू नयेत. जर महादेवाच्या मंदिरात जायचे असेल तर काळया रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत.
सोमवारी स्त्रियांनी केस धुऊ नयेत. कोणाशी खोटे बोलू नये. कोणाचा अपमान करू नये. तसे तर नेहमीच चांगले व गोड बोलावे. परंतु महादेवांच्या प्रकोपापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सोमवारी खूप जपून व्यवहार करावा.
कोणतेही वाईट व चुकीची गोष्ट आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यावी. महादेवांच्या पूजना बरोबरच नंदि चेही पूजन जरूर करावे. महादेवांना पशु प्रिय मानले जाते. या दिवशी कोणत्याही प्राण्याबरोबर दुर्व्यवहार करू नये. गाय व बैलांची सेवा करावी.
भगवंतांचे पूजन करताना लक्षात ठेवावे की महादेवांना केतकीचे फुल, कुंकू, तुटलेल्या अक्षता, तुटलेले बेलाचे पान व तुळशीचे पान अर्पण करू नयेत. तसेच महादेवांना शंखाने पाणी अर्पण करू नये. सोमवारी महादेवांचे व चंद्र देवांचे पूजन करावे.
व्रत, उपवास करावा. महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन करावे. शुद्ध मनाने महादेवांचा प्रिय मंत्र ‘ ओम नमः शिवाय ‘ याचा जास्तीत जास्त जप करावा. महादेवी यामुळे आपलं नक्कीच प्रसन्न होतील व आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करतील.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.