उद्या सोमवारी चुकूनही करू नका ही पाच कामे… नाहीतर भोलेनाथ कधीही करणार नाही माफ…

नमस्कार मित्रांनो,

आज सोमवार महादेवाचा सर्वात आवडता वार. या दिवशी महादेवाची पुजा, आराधना केली तर ते खूप प्रसन्न होतात. थोड्याशा पूजेने ही ते प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना भोळा महादेव म्हटले जाते.

ते जितक्या लवकर प्रसन्न होतात तितक्या लवकर क्रोधीत ही होतात आणि एकदा का ते जर क्रोधीत झाले तर त्यांच्या क्रोधापासून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही.

म्हणून सोमवारी पूजा करताना चुकूनही हि कामे करू नका. नाहीतर तुम्हाला त्यांच्या क्रोधाचा सामना करावा लागेल.

सोमवारी काळे कपडे घालून महादेवांच्या मंदिरात जाऊ नये. कारण काळा रंग महादेवांना अजिबात आवडत नाही. म्हणून पांढरे, आकाशी, निळे, नारंगी अशा रंगाचे जे महादेवांना प्रिय आहेत असे कपडे घालावे.

काही व्यक्तींचा आहार मांसाहार असू शकतो. परंतु सोमवारी मांसाहार करून महादेवांच्या मंदिरात कधीही जाऊ नये. कारण महादेवांना जनावरे खूप आवडतात व आपण आपले पोट भरण्यासाठी जनावरांना मारून खातो हे महादेवांना कधीच आवडणार नाही.

म्हणून सोमवारी मांसाहार करू नये आणि जर केलेच असेल तर महादेवांच्या मंदिरात जाऊ नये. महादेव शक्तीला सर्वस्व मानतात आणि शक्ती म्हणजे स्त्री म्हणून स्त्रीचा अपमान महादेव कधी ही सहन करू शकत नाहीत.

तसे तर कधीही स्त्रीचा अपमान करू नये. परंतु जर सोमवारी तुमच्या हातून स्त्रीचा अपमान झाला किंवा भांडण झाले आणि ती स्त्री जर शिवभक्त असेल तर महादेवांच्या क्रोधापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.

सर्वांच्या घरात भांडण तंटे होतात परंतु जर सोमवारी घरात महादेवांचे पूजन करायचे असेल तर घरात शांतता ठेवावी. ज्या घरात भांडण तंटा, रुसवे फुगवे असतील अशा घरांमध्ये महादेव अजिबात थांबत नाहीत.

सोमवारी कोणाबद्दल वाईट बोलू नये. कोणाची चुगली करणे, कोणाला मारणे, कोणाबद्दल अपशब्द काढणे अशी कामे करू नयेत. काया, वाचा व मनाने शुद्ध राहून महादेवांचे स्मरण करावे.

महादेवांना जनावरे खूप आवडतात. म्हणून त्यांचे वाहन नंदी आहे व त्यांनी गळ्यात सापाच्या माळा धारण केल्या आहेत. म्हणून महादेवांच्या पूजेत त्यांनाही स्थान आहे. आपण मंदिरात गेलो व महादेवांची पूजा केली परंतु नंदीची केली नाही तर आपली पूजा वाया जाते.

म्हणून आधी नंदीची पूजा करावी व थोडासा गुळ नंदीला नैवेद्य म्हणून अर्पण करावा. सोमवारी साप दिसल्यास त्याला कधीही मारू नये. तसे तर सापाला कधीच मारु नये पण सोमवारी सापाला मारल्यास महादेवांच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो.

सोमवारी सज्जन व्यक्ती, साधू, संत यांचा अपमान करू नये व विशेषतः अघोरी साधु जे महादेवांचे भक्त असतात अशा साधूंचा तर चुकूनही अपमान करू नये. कारण भगवंत भक्तीचा भुकेला असतो आणि त्यांच्या भक्ताचा अपमान म्हणजेच त्यांचा अपमान. त्यामुळे ते क्रोधीत होतात.

या दिवशी घरी आलेला अतिथी किंवा भिकारी कोणालाही उपाशी जाऊ देऊ नये. त्यांना अन्नदान करावे. स्वयंपाक करून पोटभर खायला द्यावे आणि शक्य असेल तर एक मूठभर तांदूळ दर सोमवारी कोणा एका व्यक्तीला दान करावे.

महादेवाला पांढरा रंग आवडतो व सर्व पांढरी फुले महादेवांना वाहिली जातात. परंतु केतकीचे फुल पांढरे असूनही महादेवांना वाहिले जात नाही. त्याबरोबरच शंखाचा वापर महादेवांच्या पूजेत करू नये.

कारण महादेवांनी शंखासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि त्याचे प्रतीक म्हणून शंखाकडे बघितले जाते. म्हणून शंखात पाणी घेऊन महादेवांना अर्पण करू नये. तुम्ही शंखाचा वापर शंखनाद करण्यासाठी करू शकता. पण पूजेत वापरू नये.

महादेवाची पूजा करताना आपण तांदूळ वापरतो म्हणून लक्षात असू द्यावे की तांदूळ अखंड असावेत. तुटलेले तांदूळ पूजेत वापरू नयेत. हळद कुंकू या उत्पत्तीच्या वस्तू आहेत व त्या शक्तीशी म्हणजे स्त्रीशी संबंधित आहेत. म्हणून महादेवांना हळद व कुंकू कधीही वाहू नयेत.

महादेवांना नारळही वाहू नये. वाळलेली, खराब झालेली फुलेही वाहू नयेत. परंतु बेलाची पाने कधीही शीळी होत नाहीत. तुम्ही वाहिलेली बेलाची पाने पाण्याने धुऊन पुन्हा महादेवांना वाहू शकता. शिवलिंगावर तुळस वाहू नये किंवा शिवलिंगावरचे पाणी तुळशीला वाहू नये.

असे केल्याने तुमच्या चालू कामात अडथळा निर्माण होतो. कारण असे केल्याने तुम्ही दोघांनाही नाराज करता. तुळशीचे पाने महादेवांच्या परिवारात कोणालाही म्हणजे गणपती, पार्वती, महादेव, कार्तिक स्वामी यांना चुकूनही वाहू नये.

या चुका पूजेत कधीही करू नये आणि जर कधी आपल्या हातून अशा काही चुका झाल्या असतील तर त्यांची क्षमा मागा. ते जरूर क्षमा करतील कारण ते भोले भंडारी आहेत.

प्रदूष काळात महादेवांची पूजा करणे नेहमी चांगले व शुभ फलदायी असते. या दिवशी संध्याकाळी महादेवांची यथाशक्ती पूजा करावी. जे शक्य असेल ते महादेवांना अर्पण करावे व काहीच नसेल तर एक तांब्या महादेवांवर पाणी अर्पण करावे व महादेवांची प्रार्थना करावी.

एक तुपाचा दिवा महादेवांच्या मंदिरात दर सोमवारी सायंकाळी लावावा. याने महादेव प्रसन्न होतात. जर मंदिरात जाऊन दिवा लावणे शक्य नसेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता व महादेवांना प्रसन्न करू शकता.

याप्रमाणे सोमवारी काही गोष्टी लक्षपूर्वक टाळल्याने तुम्ही महादेवांच्या क्रोधापासून वाचू शकता आणि काही गोष्टी करून महादेवांना प्रसन्न करू शकता.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *