उद्या सोमवारी करा महादेवाच्या पिंडीवर फक्त एक पान अर्पण… शत्रूच काय तर मृत्यु सुद्धा येणार नाही जवळ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो सोमवार हा शिवशंकराचा वार आहे. सोमवारच्या दिवशी प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर उपाय केले जातात.

जर सोमवारच्या दिवशी काही खास वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्या गेल्या तर आपल्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील.

असेच काही उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर यापैकी एकही वस्तू तुम्ही महादेवांना अर्पण केलीत तर तुमच्या इच्छा आणि मनोकामना लगेचच पूर्ण होतील.

बेलाचे पान हे महादेवांना किती प्रिय आहे हे तर सर्वांना माहीतच आहे. बेलपत्रा चा महिमा शिवपुराणात ही केलेला आढळतो.

हे बेलाचे पान जर महादेवाच्या पूजनात वापरले गेले नाही तर महादेवांचे पूजन अपूर्ण समजले जाते. हेच नाही तर बेलाचे पान अर्पण करण्यासोबतच त्यांना बेलाच्या झाडा ची मुळी नैवेद्यावर ठेवून तो अर्पण करावा.

यामुळे महादेव इतके प्रसन्न होतात की आपल्यावर कृपेचा वर्षाव होतो.

म्हणजेच या दोन वस्तू जर महादेवांना एकत्र अर्पण केल्या तर कितीतरी पटीने अधिक आपल्या पुण्यात वाढ होईल.

दुसरी वस्तू म्हणजे भांगा चे पान. महादेवांना भांग खूप प्रिय आहे आणि महादेवाच्या पूजनात याचे खूप महत्त्वही आहे.

म्हणूनच महादेवाच्या पूजनात याचा वापर अवश्य करावा. आपल्याला हे माहीतच आहे की ज्यावेळी समुद्रमंथनातून हलाहल हे विष उठले ते महादेवांनी प्राशन केले होते व त्याचा दाह होत होता आणि त्यावरील उपचार म्हणून भांगाच्या पानांचा वापर केला गेला होता.

म्हणून महादेवांच्या पूजनात भांगेच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते.

तसेच महादेवांच्या पूजनात मंदार म्हणजेच रुईच्या पानांना ही महत्त्व आहे. महादेवांना रुईच्या पानांचा सोबतच रुईची फुले हे खूप प्रिय आहेत.

सोमवारी महादेवांना मंदार ची पाने अर्पण करावीत. मंदार ची पाने आपले अकाली मृ त्यू पासून रक्षण करतात.

त्याबरोबरच महादेवांच्या पूजनात धोत्र्याचे फुल,फळ व पान यांचाही वापर जरूर करावा. यांचा वापर ही औषधी सामग्री रूपात केला जातो.

शिव पुराणात असा उल्लेख आढळतो की महादेवांना धोत्र्याचे फुल, फळ व पान अर्पण करणाऱ्यांचे घर महादेव धनधान्याने भरून टाकतात.

त्याच बरोबर महादेवांना आणि त्यांचे पुत्र गणपती यांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत. महादेवांना दुर्वा अर्पण केल्यास फार मृ त्यूपासून आपले रक्षण होते.

तर मित्रांनो सोमवारच्या दिवशी या वस्तू तुम्ही शिवलिंग रुपी महादेवांना नक्की अर्पण करा.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *