हॉटेल, लॉज, ट्रायल रुममध्ये लपवलेला छुपा कॅमेरा असा ओळखा.

नमस्कार मित्रांनो,

आजकाल हिडन कॅमेरा म्हणजेच छुपा कॅमेरा लावून महिलांचे व मुलींचे नको असलेल्या अवस्थेत फोटो काढले जातात, व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते आणि मग अनेक वेबसाईट वर हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले जातात.

जर तुम्हीसुद्धा प्रवासामुळे एखाद्या हॉटेल किंवा लॉज मध्ये थांबणार असाल किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात चेंजिंग रूम म्हणजेच ट्रायल रूम चा वापर करणार असाल तर या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत की ज्याद्वारे तुम्ही ओळखू शकाल त्या रूम मध्ये किंवा ट्रायल रूम मध्ये छुपा कॅमेरा नाही ना. अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत ज्या फॉलो करा आणि तुमचे व तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करा.

पहिली टीप- तुम्ही ज्या रूममध्ये थांबलेले आहात त्या रूम मध्ये गेल्याबरोबर तेथील सर्व लाईट्स ऑफ करा आणि मग त्या खोलीमध्ये रेड किंवा ग्रीन लाईट दिसते का ते बघा. जर त्या रूममध्ये लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची लाईट चमकत असेल तर लक्षात ठेवा की ती जी लाईट आहे, जो छोटासा दिवा आहे तो कॅमेरा असू शकतो.

टीप नंबर 2, तुम्ही ज्या रूम मध्ये गेलेला आहात त्या रूमच्या दरवाज्याला असलेले हँडल एकदा चेक करा. जवळजवळ 50% केसेसमध्ये या हँडलला किंवा जे दरवाजाला हुक असते त्याला हे छुपे कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे दरवाज्याचे बारकाईने निरीक्षण करा.

तिसरी टीप, मित्रांनो हे जे हिडन कॅमेरे असतात त्यांना त्यासोबत एक मायक्रोफोनसुद्धा अटॅच केलेला असतो आणि या मायक्रोफोनचा अगदी बारीकसा आवाज सारखा येत राहतो.

म्हणून रूममध्ये गेल्याबरोबर सर्व लाईट ऑफ करण्याबरोबरच अगदी बारकाईने कान लावून एखादा आवाज येतोय का हे पहा. जर असा आवाज येत असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या.

चौथी टीप.. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला आरसा हा सापडेलच आणि विशेष करून ज्या ट्रायल रूम असतात जेथे आपण कपडे चेंज करतो त्या ठिकाणी तर आरसा लावलेला असतोच. कधीकधी हे आरसे फसवे असतात.

कारण हे आरसे आरपार असतात. या आरशाच्या पाठीमागे कॅमेरे लपवलेले असतात. तर हे कसे ओळखणार की हा आरसा आरपार आहे की नाही? तर त्या साठीची टेस्ट म्हणजे त्या आरशाला आपले एक बोट चिटकवा.

एक बोट त्या आरश्यावरती ठेवा. आपलं बोट आणि त्या आरशात दिसणारे बोटाचे चित्र यामध्ये जर गॅप दिसला, यामध्ये जर अंतर दिसले तरच हा आरसा व्यवस्थित आहे. मात्र जर हे अंतर दिसले नाही, आरशातले बोट आणि तुमच्या स्वतःचे बोट चिटकलेल दिसले तर हा आरसा आरपार आहे.

याचा अर्थ आरशाच्या पलीकडून एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय करत आहात हे दिसते. तर हि एक टेस्ट अतिशय महत्त्वाची आहे ट्रायल रूमच्या बाबतीत.

पाचवी टिप.. आपल्या रूमचे सर्व कोपरे चेक करा. बरेचसे छुपे कॅमेरे हे कोपऱ्यावर लावलेले असतात. त्यामुळे कोपरे अगदी बारकाईने पहा.

आणि मित्रांनो शेवटची टीप म्हणजे, आपल्या रूमचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या खाली कुठेही फट नाही ना, स्पेस नाही ना हे चेक करून पहा. आजकाल अगदी लहान लहान कॅमेरा मिळतात.

तुम्ही रूम मध्ये गेल्यानंतर या दरवाजाच्या फटीतून हे कॅमेरे अलगद पुढे सरकवले जातात आणि आतील सर्व घडामोडी रेकॉर्ड केल्या जातात. फोटो काढले जातात. तर अश्या प्रकारे दरवाज्याच्या खाली फट नाही ना याचीसुद्धा काळजी घ्या.

मित्रांनो, हे सर्व झालं मात्र काही उपाय उपलब्ध आहेत ज्यामुळे आपण हे छुपे कॅमेरे सहज शोधू शकतो. हे थोडे महागडे आहेत. हिडन कॅम डिटेक्टर म्हणून एक डिव्हाईस मिळत. हे तुम्ही विकत घेऊ शकता आणि यामुळे तुम्हाला रूम मध्ये कुठेही छुपा कॅमेरा असल्यास तो शोधण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे काही मोबाईल ॲप्स आहेत उदाहरणार्थ बॉडीगार्ड या नावाचे एक ॲप आहे. हे ॲप सुद्धा तुम्ही वापरू शकता मात्र ते इतके विश्वासनीय नाही.

मित्रांनो, एक अतिशय चांगला उपाय यावरती असा आहे की तुम्ही रूम मध्ये गेल्यानंतर तुमच्या मोबाईलच नेटवर्क गायब झालं तर लक्षात ठेवा त्या रूममध्ये 100% हिडन कॅमेरा आहे. रूमच्या बाहेर गेल्यानंतर रेंज येते मात्र रूममध्ये गेल्यानंतर रेंज गायब होत असेल तर रूममध्ये हिडन कॅमेरा आहे.

किंवा रूम मध्ये गेल्यानंतर कॉल लागत नसेल. रेंज दिसते मात्र कॉल लागत नाहीये तर अशावेळी समजून जा या रूममध्ये छुपा कॅमेरा लावलेला आहे.

तर मित्रांनो या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करा. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *