सीतेच्या श्रापामुळे आज सर्व असे काही झाले आहे.


नमस्कार मित्रांनो,

आपण रामायणाची कथा तर ऐकलेली असेल. परंतु आजच्या माहितीत अशी कथा सांगणार आहे. जी रामायणातील असूनही या कथेपासून आपण सर्व वंचित आहोत.

वाल्मिकी रामायणात सीता माता द्वारे पिंडदान करून राजा दशरथाचा आत्म्याला शांती मिळण्यास तसेच मोक्ष मिळण्याचा संदर्भ येतो. 

वनवास काळात प्रभुराम, लक्ष्मण आणि माता सीता पित्रू पक्षा दरम्यान श्राद्ध करण्यासाठी गया तीर्थावर पोहोचले. तेथे श्राद्ध करण्यासाठी आवश्यक सामग्री गोळा करण्यासाठी प्रभू श्री राम व लक्ष्मण नगरामध्ये गेले.

तिथे देवी सिता श्राद्ध कर्म करण्यासाठी त्यांची वाट पाहत होती. दुपार झाली आणि श्राद्धकर्म कर्म करण्याची वेळ निघून जाऊ लागली.

तसेच सीता मातेची चलबिचल चालु झाली. माता भगवंतांच्या वाटेकडे डोळे लावून बसली. तोच राजा दशरथाच्या आत्म्याने पिंड दानाची मागणी केली.

गया तीर्थावर फाल्गुनी नदीतीरी सीतादेवी विवंचनेत पडली. आता देवीला काय करावे हेच समजेना. परंतु आता विचार करायला वेळ नव्हता,

म्हणून जवळच असलेले वटवृक्ष, ब्राह्मण, तुळस आणि गाय व फाल्गुनी नदी या सर्वांना साक्षी मानून राजा दशरथाच्या नावाने पिंडदान केले.

थोड्याच वेळात तिथे श्रीराम व लक्ष्मण आले. तर देवी सीतेने वेळ निघून जात असल्याकारणाने आपण स्वतः राजाचे पिंडदान केले. असे भगवंतांना सांगितले परंतु पिंडदानकरण्यासाठी तेथेसामग्री नसल्याकारणाने सीतेने पिंडदान कसे काय केले.

हे जाणून घेण्यासाठी भगवंतांनी सितेकडे प्रमाण मागितले तेव्हा सीतामातेने सांगितले. फाल्गुनीनदी, तुळस, वटवृक्ष, ब्राह्मण व गाय यांच्या साक्षीने मी पिंडदान केले असल्याने आपण त्यांना विचारू शकता.

परंतु भगवंतांनी विचारल्यानंतर फाल्गुनी नदी, गाय,
तुळस व ब्राम्हण या सर्वांनी ही गोष्ट नाकारली.
फक्त वडाच्या झाडाने प्रभू श्रीरामांना सांगितले.

की सीता मातेने राजा दशरथ यांचे पिंडदान केलेले आहे. सर्वांनी खोटे बोललेले पाहून देवी सीता खूप क्रोधित झाली. त्यांनी स्वतः राजा दशरथ त्यांचे ध्यान केले व त्यांनाच विचारले कि मी पिंडदान केले असेल
तर तुम्ही त्याचे प्रमाण द्यावे.

त्यावेळी राजा दशरथ यांनी देवीची प्रार्थना ऐकून अशी
वाणी केली की एनवेळी सीतेने मला पिंडदान करून
मोक्षाची प्राप्ती करून दिली आहे. तेव्हा भगवंतांनी सीतादेवीचे म्हणणे मान्य केले.

परंतु सर्वजण खोटे बोलून सीता मातेला खोटे पाडल्यामुळे देवी सीतेने वटवृक्ष सोडून त्या चौघांनाही शाप दिला. फाल्गुनी नदीला देवी सीतेने शाप दिला.

की तुझे पाणी आटून जाईल. आजही या नदीला खूप कमी पाणी असते. किंवा कधीकधी अजिबात नसते. तुळशीला शाप दिला कि तू गया तीर्थात कधीच उगवणार नाही.

गाईला शाप दिला की तू तोंडाने खोटे बोलली म्हणून तुझे पूजन कोणीही पुढून करणार नाही. ब्राम्हणाला शाप दिला की कितीही मिळाले तरी तुमची हाव पूर्ण होणार नाही. 

तुम्ही नेहमी अतृप्त राहणार. त्यानंतर सीता मातेने वटवृक्षाला आशीर्वाद दिला. दीर्घायुष्य मिळेल व सर्व  सुहासिनी तुझी पूजा करतील. सर्व सुहासिनी तुझी पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतील.

देवी सीतेच्या अशा या शापामुळे आजही फालगुनी  नदीच्या काठी पाणी नसल्यामुळे वाळु द्वारे पिंडदान केले जाते. गयामध्ये तुळस उगवत नाही, व गाईचे पूजन तिच्या शेपटीच्या बाजू कडूनच केले जाते.

तर ब्राह्मण कधीच संतुष्ट राहत नाही. धन्यवाद!

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.