शुक्रवारच्या दिवशी पाकिटात ठेवा ही 1 वस्तू पैसा खेचला जाईल.

नमस्कार मित्रांनो,

आपण ज्या घरात राहतो ती वास्तू नेहमी चांगली असावी त्याच्या मधल्या सर्व गोष्टी नीट नेटक्या त्याच्या जागेवर लावलेल्या असाव्यात. जर वास्तू चांगली असेल तर तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडत राहतात. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कधीच कमीपणा जाणवत नाही.

आर्थिक समस्या किंवा कौटुंबिक समस्या कधीच उद्भवत नाहीत. कुटुंबात सुख शांती आणि सगळ्याच्या क्षेत्रामध्ये घरातील सदस्यांची प्रगती होत जाते. आयुष्य हे खूप सुंदर व सोपे होऊन जाते. मात्र जर आपली वास्तू आपल्यावर रागवली असेल तर मात्र तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येवू शकतात.

तुम्हाला अनेक प्रकारची आर्थिक संकटे येवू शकतात. तुमच्या आयुष्यातील सुख निघून जाईल व तुम्ही नेहमीच दु:खी बनून रहाल. कुटुंबात सतत मतभेद वाढतील, सतत भांडणे होत राहतील. मात्र जर आपल्या वास्तूचे आपल्याला आशिर्वाद मिळत असेल तर तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच.

आज आपण वास्तुशा्त्रातील असाच एक वास्तू संबंधी उपाय सांगणार आहोत जो अत्यंत गुणकारी आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व तुमचे दु:खातले दिवस निघून जातील. तुमच्या पाकीटात काही वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल हो. हा उपाय नक्की वाचा या उपयामुळे तुमचे जीवन बदलू शकते म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो माणसाची किंमत ही त्याच्या खिशातल्या पाकीटातल्या पैश्यांमुळे कळत असते. कटू असले तरी हे सत्य आहे. म्हणून आपल्या वर माता लक्ष्मीची कृपा होणे खूप गरजेचे आहे. माता लक्ष्मी जर तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कोणत्याच संकटाची भीती वाटत नाही. पाकीटामध्ये काही वस्तू ठेवल्याने तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते असे वास्तुशास्त्र सांगत.

तुमच्या पाकीटाला कधीच रिकामे ठेवू नका. तुम्ही ते जरी वापरत नसाल तरी निदान त्यामध्ये एक रुपया तरी ठेवावा. जर तुम्ही असे रिकामे पाकीट ठेवले तर त्यामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करेल आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या निर्माण होतील अशी मान्यता आहे. म्हणून आपले पाकीट कधीही रिकामे ठेवू नये.

त्याच बरोबर शुक्रवारच्या दिवशी तांदुळाने माता लक्ष्मीची ओटी भरा. त्यातील 5 दाणे एका कागदात बांधा व तो कागद तुमच्या पाकिटात ठेवल्याने त्यामुळे तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. त्याबरोबर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो तुमच्या पाकिटात ठेवा त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीच पैशाची कमतरता कधीच भासणार नाही.

तसेच कुबेर यंत्र सुद्धा तुमच्या पाकिटात ठेवला तर त्यामुळे देखील तुम्हाला चांगला धन लाभ होण्याची शक्यता असते म्हणून हे यंत्र देखील तुम्ही तुमच्या पाकिटात नक्की ठेवा. शुक्रवारच्या दिवशी तूळशीच्या पानावर जर माता लक्ष्मीचे नाव लिहून तिच्या मंत्राचा जप करुन तुम्ही हे तुळसीचे पान आपल्या पाकिटात ठेवाला तर याने माता लक्ष्मीची कृपा आणि प्रसन्न होते व डोक्यावरचे सर्व कर्ज निघून जाण्यास मदत होते.

तसेच घरात देवाला अर्पण केलेली फुले ही देखील अत्यंत पवित्र असतात. त्यातील एखादे फुल तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवू शकता. सोबतच गोमती यंत्र सुद्धा पाकिटात ठेवून तुम्ही याच्या मदतीने तुमचे धन दुप्पट पटीने वाढवू शकता.

सोबतच काही वस्तू अश्या आहेत की, तुमच्या पाकिटात कधीही ठेवू नये. जसे की, तुटलेल्या काचेचे तुकडे, सुई, नेल-कटर इत्यादी अश्या वस्तू आपण आपल्या पाकीटात ठेवल्यास पैशाची हानि होते. त्याचबरोबर कचरा पाकिटमध्ये असू नये.

आपल्या पाकिटात न लागणारी कागद, त्याचबरोबर वापरात नसलेले एटीम कार्ड की, क्रेडीट कार्ड असा कचरा कधीही पाकिटात ठेवू नये. त्यामुळे आर्थिक संकट आपल्यावर येऊ शकते. म्हणून अशा या गोष्टी पाकीटापासून नेहमी लांब ठेवाव्यात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *