नमस्कार मित्रांनो,
मित्रानो या जगात एकही अशी व्यक्ती नसेल की जिला पैशांची इच्छा नसेल. आपल्याकडे भरपूर पैसा असावा. किमान आपल्या गरजा भागतील इतका तरी पैसा असावा. असे प्रत्येक व्यक्तीला वाटतेच. आणि मग हा पैसा कमावण्यासाठी कोणी चांगल्या मार्गाचा उपयोग करत तर कोणी वाईट मार्गाने झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करते.
मित्रानो लक्षात ठेवा जर तुम्ही वाईट मार्गाने पैसा कमावलात तर हा पैसा जास्त काळ टिकत नाही. बऱ्याचदा असही होत की तुम्ही चांगल्या मार्गाने पैसा कमवता मात्र हे पैसे विनाकारण खर्च होतात. सकाळी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा तुमचे पाकीट पैशाने भरलेले असते.
संध्याकाळी माघारी येताना मात्र काहीच पैसे शिल्लक राहत नाहीत. फार कमी पैसे शिल्लक राहतात. म्हणजेच तुमच्या हातात पैसा टिकत नाही आहे. काही उपाय असे आहेत की ज्यामुळे आपले पाकीट भरलेले राहील. पैसा टिकतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही.
घरामध्ये पैसा भरलेला राहतो. मित्रानो वास्तू शास्त्रानुसार काही उपाय असे आहेत की पाकिटात काही वस्तू ठेवल्या तर त्यामुळे आपल पाकीट हे नेहमी भरलेले राहते. पैसा हातात टिकतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही. घरामध्ये पैसा टिकून राहतो. चला तर मग पाहूया की या ११ वस्तू कोणत्या आहेत.
पहिली महत्वाची वस्तू ती म्हणजे माता लक्ष्मीची तस्वीर, माता लक्ष्मीचा फोटो. माता लक्ष्मीचा फोटो जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवलात तर तुम्हाला दिसेल की तुमचं पाकीट नेहमी भरलेल आहे. हा जो फोटो आहे यात माता लक्ष्मी बसलेल्या अवस्थेत असायला हव्यात.
उभी राहिलेली तस्वीर ही आपल्या पाकिटात ठेवू नका. मित्रानो दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचे पान आपल्या पाकिटात नक्की ठेवा. पिंपळाच्या पानाचा उपयोग करताना हे पण अभिमंत्रित करा आणि त्यानंतर ते पान आपल्या पाकिटात ठेवा. मित्रानो पिंपळाच्या वृक्षाचे मोठे महत्व आहे.
तसे तर असे अनेक झाड आहेत. अनेक वृक्ष आहेत. ज्यामध्ये देवीदेवतांचा वास मानला जातो. त्यापैकीच पिंपळ हा एक वृक्ष आहे. म्हणून पिंपळाचे पान तुमच्या पाकिटात नेहमी भरलेले ठेवील. तिसरी गोष्ट म्हणजे लाल रंगाचा कागद. हा एक टोटका एक उपाय आहे.
हा उपाय तुम्ही करू शकता. एक लाल रंगाचा कागद घ्या आणि त्या कागदावर तुमची इच्छा लिहा. त्यानंतर या कागदाची घडी घालून रेशमी दोऱ्याने बांधा. असा हा कागद तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा. असे केल्याने तुम्हाला दिसेल की तुमची जी काही इच्छा आहे.
<
ती लवकरच पूर्ण होणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे तांदूळ. तांदूळ म्हणजे अक्षद असही आपण म्हणतो. तर असे हे थोडेसे तांदूळ अगदी सात किंवा नऊ किंवा अकरा तांदूळ आपण आपल्या पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवू शकता. हे तांदूळ तुटलेले फुटलेले नसतील याची आपण काळजी घ्यायची आहे.
पुराण काळापासून धन आणि धान्य यांना समान दर्जा देण्यात आलेला आहे. धन म्हणजेच धान्य आणि धान्य म्हणजेच धन असे म्हंटले जाते. आणि म्हणून पैसा जर टिकून राहायचा असेल पैशात जर वाढ व्हायची असेल तर हे तांदूळ नक्की ठेवा. पाचवी गोष्ट म्हणजे छोटासा आरसा.
जर आपल्याकडे छोटासा आरसा असेल जर तो गोल आकाराचा असेल तर अतिउत्तम होईल. किंवा चौकोनी सुद्धा चालतो. असा आरसा सुद्धा तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवू शकता. त्याने सुद्धा पैसा टिकतो. तसेच चाकू सुद्धा तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवलात.
बाजारात छोटे छोटे चाकू आढळतात तो चाकू तुम्ही विकत घ्या. तुमच्या पर्स मध्ये ठेवा. गोमती चक्र गोमती चक्रचा महिमा खूप मोठा आहे. गोमती चक्र बाजारात सहज उपलब्ध होतात. तुम्ही कोणत्याही देवस्थानी गेल्या वर हे गोमती चक्र तुम्हाला दिसून येतील.
एक गोमती चक्र माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवून मग ते आपल्या पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवावे. त्यानंतर कवडी वेगवेगळ्या रंगाच्या कवडी मिळतात. कोणत्याही रंगाची कवडी पांढरी असेल तरी चालेल, पिवळी असेल तरी चालेल अशी एक कवडी माता लक्ष्मीच्या चरणी ठेवून आपल्या पाकिटात ठेवली.
तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप फायदे होतात. वास्तू शास्त्रानुसार जर तुम्ही चांदीचा शिक्का किंवा सोन्याचा शिक्का तुमच्या पाकिटात ठेवलात या ज्या वस्तु आम्ही सांगत आहोत त्या वस्तू पाकिटात ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायच्या आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा आहे.
त्यानंतरच आपण ती वस्तू आपल्या पाकिटात पर्स मध्ये ठेवायची आहे. तर असा हा चांदीचा शिक्का किंवा सोन्याचा शिक्का जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवलात तर त्यामुळे सुद्धा धनामध्ये वृध्दी होते. धन टिकून राहते. तुम्हाला तुमच्या आई वडील यांच्याकडून किंवा तुमच्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती असतात.
अशा लोकांनी तुम्हाला आशीर्वाद स्वरूप ज्या काही नोटा दिलेल्या असतील पैसे दिलेले असतील अशा नोटा खर्च करू नका. अशा नोटा लक्ष्मीच्या चरणाशी ठेवा. त्यानंतर त्याला थोडीशी हळद लावा. जरासे केशर लावा. आणि अशा या नोटा असे हे पैसे तुमच्या पाकिटात ठेवलात तर तुमच्या पाकिटातील पैसा कधी कमी पडणार नाही.
तो अक्षय टिकून राहतो. शेवटची गोष्ट म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाचे महत्व खूप मोठे आहे. हे जे रुद्राक्ष आहे तर कोणताही एखादा रुद्राक्ष भगवान शिव शंकरांच्या चरणाशी ठेवा आणि मग तो तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवलात तर तुमचं पाकीट कधीही रिकाम होत नाही. अशा या अकरा वस्तूंचा लाभ आपणही घ्यावा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.