नमस्कार मित्रांनो,
श्रीयंत्र जस की, आपल्याला नावावरूनच कळते की, हे धन प्रधायनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे. ज्या घरामध्ये श्री यंत्र स्थापित केले जाते तेथे देवी लक्ष्मी जी आहे ती नेहमी निवास करत असते. देवी लक्ष्मी त्या घरावर नेहमी प्रसन्न असते. अशीच एक कथा आपण पाहणार आहोत. एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठात निघून जाते. त्यांची सर्वत्र शोधाशोध होते. त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरु बृहस्पतीनी या श्रीयंत्राची स्थापना केली आणि पूजा करण्याचे सांगितले.
त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वीलोक येण्यास भाग पाडले. अशी या श्रीयंत्राच्या मागची छोटीशी कथा आपण पहिली आहे. अति प्राचीन काळापासून हिंदूंना श्रीयंत्राची उपासना माहीतच होती. हे यंत्र प्राचीन हिंदू राजे आपल्या देवपूजेस नित्यनियमाने ठेवत असे. आजही कोट्यधीशांच्या देवपूजेत हे यंत्र जे आहे ते असतेच. संसारी माणसांनी या यंत्राची दररोज उपासना केल्यास त्यांना सांसारिक सुख तर मिळतेच पण त्याचे आ ध्या त्मि क प्रगती देखील होत असते.
आता हे श्रीयंत्र म्हणजे नक्की काय आहे ते आपण आज पाहूया. हे यंत्र म्हणजे एक विशेष प्रकारची भौमितिक आकृती असते. विशेष मंत्र व विशेष शक्तीचे रूप म्हणजे यंत्र होय. यंत्रामध्ये आकार, रेखा आणि टिपक्यांचा प्रयोग केला जातो. यंत्रात कोणतीही रेखा, आकार आणि टिपक्या चुकीचे पडल्याने यंत्राचे अर्थ बदलू शकतात. यंत्राचे 2 प्रकार आहेत. एक रेखा आणि आकारांचे आणि दुसरे म्हणजे अंकांचे.
अंकांच्या यंत्रापेक्षा आकाराचे जे यंत्र असते ते चांगली फळश्रुती देणारी असते. तसेच देवी लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर नेहमी असावा यासाठी काही टोटके आहेत. ते कोणते टोटके आहेत ते आपण पाहूया. श्रीयंत्र आहे जे धनाचे प्रतीक असते. श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचे देवता आहेत. श्रीयंत्राची स्थापना केल्याने घरात संपन्नता समृद्धी आणि एकाग्रता येते. श्रीयंत्राने त्या दारिद्रयाचा नायनाट होतो.
श्रीयंत्र सपाट उठावदार आणि पिरॅमिड आकाराचे असते. प्रत्येक यंत्राचा आगळा वेगळा प्रभाव असू शकतो आणि ते आगळे वेगळे लाभ देणारे देखील असतात. यंत्रांचा वापर करण्यापूर्वी आपल्या काही गोष्टींची खबरदारी ही घ्यायलाच हवी. तर त्या काय गोष्टी आहेत हे ही आपण जाणून घेऊया. हे जे श्रीयंत्र आहे ते ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी असावे. श्रीयंत्र स्थापनेपूर्वी बघून घ्यावे की, हे यंत्र व्यवस्थित आहे का नाही.
त्याचा आकार त्याची रेखा ही प्रॉपर व्यवस्थित आहे का नाही हे पहावे. श्रीयंत्र स्थापनेत पावित्र्य ठेवावे. नियमित मंत्र जाप करावे. हे श्रीयंत्र जे आहे ते आपणाला देवघरामध्ये, आपल्या कुठल्या कार्यस्थळी, बिझनेसच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी तसेच आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये देखील ठेवता येते. एकाग्रतेसाठी श्रीयंत्राचा कसा वापर करावा हे मी तुम्हाला सांगते.
ऊर्ध्वमुखी यंत्राची तस्वीर आपल्या कार्यस्थळी, आपल्या काम करण्याच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या खोलीत ही ठेवायची असते. नेहमी श्रीयंत्राचे रंगीत चित्र असावे. श्रीयंत्र नेहमी दृष्टिक्षेप असावे. श्रीयंत्राचे पावित्र्य नेहमी राखलेच गेले पाहिजे. त्यात आपल्याकडून कुठल्या चुका होता कामा नये. धन प्राप्तीसाठी श्रीयंत्राचे कसे स्थापन करावे? कसा त्याचा उपयोग करून घ्यावा हे आपण पाहूया.
वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी श्रीयंत्र हे वापरले जाते. आयुष्यभरासाठी धन वैभव मिळण्यासाठी श्रीयंत्र आहे जे स्थापित करायचे असते. पिरॅमिड स्थापन करत असताना पुज्यस्थळी स्थापन करायचे असते. श्रीयंत्र हे नेहमी स्वच्छ गुलाबी कापडावर ठेवावे. दररोज या यंत्राला स्नान घालून फुले ही वाहिली गेली पाहिजे. साजूक तुपाचा दिवा लावून श्रीयंत्र मंत्राचा जप करणे हे देखील आवश्यक आहे.
दररोज श्रीयंत्राची पूजा करणाऱ्यांनी श्रीयंत्राला इतर देवांप्रमाणेच पूजा ही करायची असते. म्हणजे काय करायचे? दिवा ओवाळून श्रीयंत्राचा मंत्र आणि श्लोक हा देखील म्हणायचं असतो. अशा या श्रीयंत्राचे खूप सारे फायदे आहेत. तर आपल्या घरात हे श्रीयंत्र स्थापन केल्याने त्याचे अजून काय लाभ आणि फायदे आहेत हे आपण पाहुयात.
घरातील अलक्ष्मीचा नाश होऊन शुभ लक्ष्मीचा निवास होतो. श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर घरातील ताण-तणाव दूर होऊन घरात मंगलमय आनंदी वातावरण हे तयार होते. श्रीयंत्राच्या स्थापणेने आपल्या वास्तूतील सर्व दोष जे आहेत ती नाहीशी होतात. श्रीयंत्राच्या सानिध्याने मन शांतेफल लाभत असते. घरातील बाह्य शक्तींचा त्रास जो आहे तो आपल्यापासून दूर होत असतो.
श्रीयंत्राच्याद्वारे आरोग्य लक्ष्मी ही घरात निवास करत असते. त्यामुळे घरातील व्यक्तींच्या आरोग्यविषयक ज्या तक्रारी आहेत त्या नेहमी दूर होत असतात. श्रीयंत्राच्या स्थापणेने सर्व प्रकारच्या ग्रह बाधा आणि दोष हे दूर होत असतात. लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज आपल्याला उपलब्ध होत असतात आपल्या व्यवसायाच्या जागेवर, बिझनेसच्या ठिकाणी श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे आपल्या बिजनेसमध्ये भरभराटी होत असते.
त्यानंतर घरात श्रीयंत्र स्थापन केल्यामुळे घरातील मुलांची स्मरणशक्ती वाढत असते आणि अर्थातच त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये फायदा होत असतो. श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आ शी र्वा द प्राप्त होत असतात आणि आपली आ ध्या त्मि क प्रगती ही होत असते. त्यामुळे अशा श्रीयंत्राची आपल्या घरात प्रत्येकाने स्थापना करावी ही मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.