नमस्कार मित्रांनो,
वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. आपल्या घरातील सर्व वस्तू व वास्तूची रचना वास्तूशास्त्राप्रमाणे असेल तर आपल्या जीवनावर या सर्वांचा शुभ प्रभाव पडतो. वास्तूशास्त्रानुसार केलेले कोणतेही काम शुभ मंगलकारी असते. श्री कृष्ण भगवंत वास्तुशास्त्राचे खूप मोठे जाणकार होते.
ज्यावेळी महाराज युधिष्ठिर यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता त्यावेळी श्री कृष्णा भगवंतांनी महाराज युधिष्ठिराना घर व राजांच्या समृद्धीसाठी काही वास्तूचे उपाय सांगितले होते. श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेल्या या वास्तू नियमांचे पालन करून आपणही आपले जीवन सुखी संपन्न व समृद्ध करू शकतो.
महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिरांशी वार्तालाभ करताना काही अशा गोष्टींबद्दल माहिती सांगितलेली आहे ज्या वस्तू जर आपण आपल्या घरात ठेवल्या तर आपल्या घरात कधीही दारिद्र्य प्रवेश करू शकत नाही. या 3 वस्तू घरात असल्यास घरात सुख व समृद्धी येते.
त्याबरोबर घरात स का रा त्म क ऊर्जाही बनलेली राहते. तसेच श्रीकृष्ण भगवंत असेही म्हणतात की, मनुष्याचे शरीर हे मातीपासून बनलेले आहे. म्हणून जर घरात मातीपासून बनलेल्या या वस्तू असतील तर अशा घरात कधीही पैशांची कमतरता राहात नाही.
अशा घरावर देवी लक्ष्मीची कायम कृपा राहते. अशा घरात साक्षात देवी लक्ष्मी वास्तव्य करते आणि अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना कधीही दुःख, दारिद्र्य व त्रासाचा सामना करावा लागत नाही. चला तर जाणून घेऊयात की, श्रीकृष्ण भगवंतांनी अशा कोणत्या वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या घरात ठेवल्यास घरात सुख संपन्नता, ऐश्वर्या व वैभव येते.
श्रीकृष्ण भगवंतांनी महाराज युधिष्ठिराना सांगितले होते की, राज्यात कधीही पाण्याची कमतरता भासू नये यासाठी राज्याच्या उत्तर-पूर्व कोनात म्हणजे ईशान्य कोनात जमिनीवर पाण्याची व्यवस्था करावी. त्याप्रमाणे आपल्या घरातही उत्तर-पूर्व कोणात पाण्याने भरलेला मातीचा एक घडा जरूर ठेवावा.
म्हणजे आपल्या घरात नेहमी सुख संपन्नता, ऐश्वर्य व वैभव राहिल. तसेच घराच्या बाहेरही ईशान्य दिशेला पक्ष्यांसाठी पाण्याने भरलेले मातीचे भांडे जरूर ठेवावे. तसेच घराच्या उत्तर-पूर्व दिशेला मातीपासून बनवलेला एक पक्षी जरूर ठेवावा.
मातीपासून बनवलेल्या पक्षी घरात ठेवल्यास याच्या प्रभावाने आपल्या घरातील वातावरण नेहमीच शुभ व स का रा त्म क बनलेले राहते. आपल्या देवघरात सोने, चांदी, पितळ इत्यादी भरपूर धातूंच्या देवी-देवतांच्या मूर्ती असतात. परंतु या सर्व मूर्ती सोबतच देवघरात कोणत्याही देवी देवतेची मातीपासुन बनवलेली एक मूर्ती अ व श्य ठेवावी.
यामुळे देवघर पूर्ण होते आणि आपल्या पूजनाचे पूर्ण फळही आपल्याला मिळते. तसेच दिवेही विविध प्रकारच्या धांतूचे आणि विविध आकार व प्रकारांमध्ये मिळतात. परंतु मातीच्या दिव्यांचे जे महत्व आहे ते तर कोणतेही दिव्यांची नाही. म्हणून दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर 2 मातीचे दिवे प्रज्वलित करावेत.
त्या दिव्यांमध्ये गायीच्या साजुक तुपाचा वापर करावा. घरात गाईचे साजूक तूपही नेहमी ठेवावे. यामुळेही घरात लक्ष्मी येते. तसेच जर कापूर लावला असेल तर त्यात दोन लवंगा जरूर टाकाव्यात. यामुळे आपल्या घरातील न का रा त्म क ऊर्जा नष्ट होते आणि घरात स का रा त्म क ऊर्जेचा संचार होतो.
दररोज संध्याकाळी तुळशीजवळही गाईच्या शुद्ध तुपाचा मातीचा दिवा जरूर लावावा. यामुळे आपल्या घरात कधीही पैशांची व धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की, घरात मातीपासून बनवलेल्या कोणकोणत्या वस्तू ठेवल्याने त्याचे काय काय परिणाम होतात ते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.