जीव गेला तरी श्रावण महिन्यात ही वस्तू कोणालाही देऊ नका, लक्ष्मी कायमची निघून जाईल.

नमस्कार मित्रांनो,

सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यांमध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रतवैकल्ये, उपवास केले जातात. भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात.

एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो. तर दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुखसमाधान निघून जातं आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ शकते.

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कितीही गरज असली आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे यापैकी एखादी वस्तू उधार मागितली श्रावण महिन्यात चुकून ही या वस्तू कोणालाही देऊ नका नाहीतर तुमच्या घरात गरिबी, दारिद्र्य येऊ शकतं.

काही वस्तू आहेत ज्यांचा दान किंवा या वस्तू उधार आपण श्रावण महिन्यात कोणालाही देऊ नयेत. या वस्तू कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत.

सध्याच्या काळात उधार देणं घेणं हे गरजेचं झालं आहे. एखादी व्यक्ती दुसऱ्याला यासाठी उधार येते की त्याला चांगल्या फळांची प्राप्ती व्हावी किंवा काही व्यक्ती समाजात मान वाढावा म्हणून म्हणून सुद्धा उधार देतात.

परंतु जर श्रावण महिन्यात या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उधार दिल्या तर तुम्ही कंगाल बनू शकता. काही वस्तू श्रावण महिन्यात उधार किंवा दान देणं या गोष्टीला सक्त मनाई आहे.

यातील पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथांशी संबंधित कोणती ही वस्तू. तुम्ही ही वस्तू कोणालाही उधार देऊ नका. जसे की भोलेनाथांशी संबंधित कोणतेही फळ असेल, पूजेचे सामान असेल ते उधार किंवा दान देऊ नये. असे केल्याने तुमच्या घरातून भोलेनाथ निघून जातात. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.

याच प्रमाणे श्रावण महिना हा धनप्राप्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी येतात. अशावेळी जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर चुकूनही देऊ नका. तसेच कोणाकडून उधार पैसे घेऊ ही नका.

असे मानले जाते की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाही आणि तुम्ही जर दुसऱ्याकडून या महिन्यात पैसे उधार घेतले तर ते कर्जत चढत जातं. ते कमी होत नाही. त्यामुळे असे करण्यास मनाई केली आहे.

तसेच श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ यांना दूध, दही याने अभिषेक केला जातो. पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात. परंतु लक्षात ठेवा श्रावण महिन्यात कोणी सकाळच्यावेळी जर तुम्हाला दूध, दही, ताक किंवा तांदूळ मागत असेल तर देऊ नका. यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी निघून जाते.

त्याचप्रमाणे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेला घड्याळ किंवा नवीन घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडून घड्याळ भेट म्हणून घेऊ नका.

कारण प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते आणि असे घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा चांगली वेळ त्याच्याकडे निघून जाते. त्यामुळे या श्रावण महिन्यात कोणालाही घड्याळ दान म्हणून किंवा उधार म्हणून किंवा भेट म्हणून देखील देऊ नका.

त्याचप्रमाणे या महिन्यात संध्याकाळनंतर कोणालाही लसूण, कांदा, दूध किंवा दही या वस्तू देऊ नका. श्रावण महिन्यात सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल कोणत्याही वेळी या वस्तू कोणालाही देऊ नका. यामुळे आपल्या घरातील सुख-समृद्धी निघून जाते व तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

मित्रांनो या श्रावण महिन्यात दान करणे हे खूप पुण्यदायी मानले जाते. परंतु काळा किंवा पांढरा रंगाचे वस्त्र उधार किंवा दान म्हणून कोणालाही देऊ नका. यामुळे त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात दुःख येतं. देणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू दोष निर्माण होतो आणि घेणाऱ्या व्यक्ती कंगाल होतो.

जर तुम्हाला दान करायचंच असेल तर काळा आणि पांढरा रंग सोडून इतर कोणताही रंगाचे वस्त्र तुम्ही दान करू शकता पण ते नवीन वस्त्र असाव. अनेक लोक जुने कपडे दान करतात. असे करू नका. जर तुम्हाला दान करायचं असेल तर काळ्‍या आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र सोडून इतर कोणत्याही रंगाचे नवीन वस्त्र तुम्ही दान करू शकता.

पुढची वस्तू म्हणजे अनेक स्त्रियांना ही सवय असते की स्वयंपाक घरात एखादी वस्तू कमी पडली तर शेजार्‍यांकडे मागायला जातात. तरी या श्रावण महिन्यात असे केल्याने आपल्या घरातील समृद्धी दुसऱ्याच्या घरात निघून जाते.

यामध्ये विशेष करून तेल किंवा हळद असेल. या तीनही वस्तू कुणालाही देऊ नका किंवा कोणाकडूनही या वस्तू घेऊ नका. यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर क्रोधित होतात. त्यांचा कृपाशिर्वाद आपल्याला मिळत नाही.

मित्रांनो या होत्या काही वस्तू ज्या श्रावणात आपण कोणालाही देऊ नयेत किंवा कोणाकडून या वस्तू घेऊ नयेत.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.