श्रावण महिन्यात या 10 चुका चुकूनही करू नका.

नमस्कार मित्रांनो,

हिंदू पंचांगातील बारा महिन्यांपैकी श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यात भगवान शंकराची भक्ती केली जाते. या महिन्यात शंकराची भक्ती केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या दूर होतात.

त्यामुळेच या महिन्यात देशभरातील सर्व शंकराच्या मंदिरात भक्तांची गर्दी आपण पाहात असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक शंकराची भक्ती करतात. पण आपण जी भक्ती करतो त्यामध्ये काहीही चूक व्हायला नको याकरीता शास्त्रामध्ये काही नियम व अटी सांगितलेले आहेत.

या अटींचे आपण व्यवस्थित पालन करणे गरजेचे आहे. तरच आपल्याला आपल्या भक्तीचे योग्य फळ मिळू शकते. तर आज आपण अशा 10 गोष्टी पाहणार आहोत ज्या पण श्रावण महिन्यात चुकूनही करू नये.

पहिले काम ते म्हणजे शिवलिंगावर कधीही हळद वाहू नये. हळद एक स्त्रीलिंगी वस्तू आहे त्यामुळे हळद कधीही शिवलिंगावर वाहू नये. हळद कधीही जलधारी वर वाहावी. जल धारी हे स्त्रीलिंगी आहे. माता पार्वती चे प्रतीक आहे. त्यामुळे हळद कधीही शिवलिंगावर न वाहता जल धारी वर वहावी.

दुसरे काम म्हणजे दूध पिणे टाळावे. श्रावण महिन्यात दूध पिणे टाळावे आणि ही गोष्ट सांगण्यासाठी श्रावणात शिवलिंगावर दुधाने अभिषेक करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर श्रावण महिन्यात दूध वात वाढविण्याचे काम करते.

त्यामुळे या महिन्यात दूध पिणे टाळावे. पण जर तुम्हाला दूध आहे तर दूध खूप उकळवावे आणि नंतर ते प्यावे. कच्चे दूध कधी ही पिऊ नये. श्रावण महिन्यात तुम्ही दही खाऊ शकता पण भाद्रपद महिन्यात दही खाणे टाळावे. कारण भाद्रपद महिन्यात दही आरोग्यासाठी हानिकारक असते.

तिसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या खाणे वर्जित आहे. श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या खाण्यास सक्त मनाई आहे. त्यात पहिली भाजी आहे मोहरीच्या पानांची भाजी. खरंतर ही भाजी शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. मात्र श्रावण महिन्यात ही भाजी खाण्यास सक्त मनाई आहे.

श्रावण महिन्यात या भाजीमध्ये वात वाढविण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात भाज्यांवर कीटकांचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. तसेच या भाजीसोबत गवत, वनस्पती वाढण्याचे प्रमाण जास्त असते.

चौथी गोष्ट आहे श्रावण महिन्यात वांगी खाऊ नयेत. श्रावण महिन्यात मोहरीच्या भाजीसोबत वांगी सुद्धा खाणे टाळावे. याचे धार्मिक कारण आहे की शास्त्रामध्ये वांग्याला अशुद्ध मानले जाते. आणि याच मुळे कार्तिक महिन्यात उपवास करणारे देखील वांगी खाणे टाळतात.

यामागील वैज्ञानिक कारण हे आहे की श्रावणामध्ये वांग्यांना कीड लागण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणून श्रावण महिन्यात वांगी खाणे टाळावे.

पाचवी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात वाईट विचार करू नये. श्रावण महिन्यात कोणत्याही वाईट विचार आपल्या मनात आणू नयेत. म्हणजेच कोणाबद्दल वाईट विचार करू नये. कामवासनेचा विचार करू नये. त्याच बरोबर दुसऱ्याचे वाईट करण्या हेतू षडयंत्र करू नये.

त्याचबरोबर अधार्मिक काम करणे, स्त्रियांबद्दल वाईट विचार करणे यासारख्या विचारांपासून लांब रहावे. नाही तर शिवशंकरांच्या भक्तीत आपले मन लागणार नाही. मन कोणत्या दुसऱ्या गोष्टीत रमून जाईल आणि मग पूजेमध्ये व्यत्यय येईल.

सहावी गोष्ट म्हणजे या लोकांचा अपमान करू नये. श्रावण महिन्यात लक्ष ठेवा की वृद्ध व्यक्ती, भाऊ बहीण, आई वडील आणि जीवनसाथी या लोकांचा कधीच अपमान करू नये. असे तर कधीच करू नये मात्र श्रावण महिन्यात या गोष्टीचा जास्त विचार करावा.

नाहीतर भगवान शंकराची कृपा तुमच्यावर होणार नाही. कारण भगवान शंकर जे लोक वृद्ध व्यक्ती, आई वडील, भाऊ बहीण आणि जीवन साथी यांचा अपमान करतात अश्या लोकांवर कधीच प्रसन्न होत नाहीत. त्यामुळे श्रावणाच नाही तर कधीच या लोकांचा अपमान करू नये.

सातवी गोष्ट म्हणजे सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. मित्रांनो पूजेसाठी ब्रह्म मुहूर्त म्हणजेच सकाळची वेळ योग्य असते. म्हणूनच जर तुम्हाला शिव शंकराची कृपा दृष्टी हवी असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून शंकराची पूजा करावी.

जर तुम्ही उशिरा पर्यंत झोपून राहिलात तर त्याने आळस वाढतो. सकाळी लवकर उठल्याने सकाळचे फ्रेश वातावरण तुम्हाला मिळेल आणि याचं तुम्हाला, तुमच्या आरोग्याला फायदा होईल. सकाळी वातावरण ताजं असल्याने पूजेत सुद्धा तुमचे मन लागेल. तुम्ही एकाग्र होता आणि एकाग्रतेने केलेल्या पूजेचे फळ लवकर मिळते.

आठवी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात मांसाहार करू नये. श्रावण महिन्यात मांसाहार म्हणजेच नॉनव्हेज खाणे टाळले पाहिजे. मांसाहारासाठी मुक्या प्राण्यांची हत्या करावी लागते आणि हे करणे महापाप असते. त्यामुळेच श्रावण महिन्यात मांसाहार सोडल्याने तुम्ही या पापा पासून लांब राहाल.

नववी गोष्ट म्हणजे नवरा-बायकोनी हे लक्षात ठेवा. खूप घरांमध्ये नवरा-बायकोमध्ये छोटी भांडणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र जेव्हा ही छोटी भांडणं जास्त प्रमाणात होऊ लागतात तेव्हा घरात अशांतता वाढू लागते आणि ज्या घरात शांतता नसते अशा घरात देवी-देवता राहत नाहीत.

त्यामुळेच श्रावण महिन्यात देवी-देवतांची कृपा हवी असल्यास घरात आनंददायी, प्रेमळ वातावरण ठेवावे. घरात आनंददायी वातावरण असेल तर मन प्रसन्न राहील आणि प्रसन्न मनाने केलेल्या पूजेचा फायदा अधिक होतो.

10 वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे राग करू नका. रागात माणसाची एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता नष्ट होते. रागामध्ये घेतलेले निर्णय देखील नेहमी चुकीचेच असतात. नुकसानदायक असतात. राग करणे ही एक वाईट सवय आहे आणि यापासून आपण वाचले पाहिजे.

जर तुम्हाला राग करण्याची सवय लागली तर तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीत राग करू लागता आणि नेहमी दुसऱ्याला दुखवू लागता. शिवशंकराची कृपादृष्टी मिळविण्यासाठी राग करण्यापासून आपण वाचले पाहिजे.

अशाप्रकारे या दहा गोष्टींचे पालन करून श्रावण महिन्यात भगवान शंकराचे मनोभावे पूजा करून त्यांची कृपादृष्टी, आशीर्वाद मिळवा.

धन्यवाद.


माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *