श्रावण महिन्यात अखंड दिवा कसा लावावा? का लावावा? नक्की वाचा इच्छापूर्ती उपाय.

नमस्कार मित्रांनो,

श्रावण महिन्यात अखंड दिवा कसा आणि का लावावा? हे नक्की बघा. हा एक इच्छापूर्ती उपाय आहे.

श्रावण महिना हा हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र, पावन महिना मानला जातो. यामध्ये भरपूर लोक महिनाभर उपवास करतात. काही लोक श्रावण सोमवार उपास करतात.

महादेवांचा हा पवित्र महिना इच्छापूर्ती करणारा महिना आहे . पूजा पाठ, सर्व गोष्टी ज्या दैवी गोष्टी आहेत, ज्या भक्तीभावाने भरलेल्या गोष्टी आहेत त्या या महिन्यात केल्या जातात.

श्रावण महिना हा ९ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. ९ ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार येत आहे. या श्रावण महिन्यात अखंड दिवा लावला जातो. काही लोक अखंड दिवा लावतात तर काही लोक नाही लावत. काहींना माहित असते तर काहींना माहीत नसते.

जसे आपण नवरात्रीला नऊ दिवसांचा अखंड दिवा लावतो. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात अखंड दिवा लावू शकतो. जो महिनाभर चालेल असा लावायचा असतो.

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरातल्या बाधा, दोष, संकटे, अडचणी, दुःख दूर होण्यासाठी किंवा आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा इच्छापूर्तीचा दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे.

तेलाचा दिवा आपण लावायचा. वात दोऱ्याची ठेवायची. कापसाची वात ही छोटी असते म्हणून शक्यतो ती वापरू नये. जो नाडा मिळतो त्याचा हा दिवा लावायचा असतो.

जसा आपण नऊ दिवसाचा नवरात्रीचा दिवा लावतो तसाच आपण हा दिवा लावायचा आहेत. फक्त हा दिवा विझला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची.

थोडा मोठा दिवा लावायचा. तेल त्यामध्ये संपू नये याची काळजी घ्यायची. ३० दिवस चालेल अशी मोठी वात त्यामध्ये तुम्हाला लावायची आहे.

तर हा दिवा तुम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी लावायचा म्हणजे ज्या दिवशी पहिला सोमवार येतो त्या दिवसापासून तुम्ही हा दिवा लावायचा. हा दिवा तुम्ही ९ ऑगस्ट पासून लावू शकता. तुमच्या देवघरात तुम्ही हा दिवा लावायचा.

दिवा लावल्यानंतर त्याची पूजा म्हणजेच हळदीकुंकू व अक्षता वाहून त्या दिव्याचे पूजन करावे. हात जोडून प्रार्थना करायची. तुमची जी इच्छा असेल ती बोलायची.

जे काही संकट, समस्या तुमच्यावर असतील ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि रोज या दिव्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची.

फक्त हा दिवा लावत असाल तर ३० दिवस चालेल असा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा उपाय नक्की करा. घरातील सर्व दोष, समस्या, सगळ्या बाधा दूर होतात. मात्र महिनाभर घरात कटकटी होऊ नयेत याची सुद्धा काळजी घ्यावी.

श्रावणात अखंड दिवा अवश्य लावा. स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.