फक्त एकदा वाचा श्रावण महिन्याची कथा… तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण…

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत पवित्र श्रावण महिन्याची कथा. 9 ऑगस्ट 2021पासून श्रावण सुरू होणार आहे. श्रावण महिना हा देवाधिदेव महादेवांचा प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात शिव उपासनेला फार महत्त्व दिले गेलेले आहे.

श्रावण महिन्यात कोणी श्रावणातील सोमवारी उपवास करतात तर कोणी गुरुवार आणि शुक्रवारी उपवास करतात. खास करून सोमवार हा शंकरांचा वार मानला जातो. त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक महिला व अविवाहित मुली सोमवारी उपवास करतात.

श्रावणामध्ये शिव व पार्वती यांच्या पूजेचे महत्व ग्रंथामध्ये अधिक प्रमाणात वर्णन केलेले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. आज आपण याच श्रावण महिन्याची पौराणिक कथा काय आहे हे पाहणार आहोत.

यातील एक कथा अशी आहे की देवी सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योग शक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूप मिळविण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैनावती यांच्या घरात मुलीच्या रूपाने जन्म घेतला.

पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत केले आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले. त्यांच्या सोबत विवाह केला. त्यानंतर महादेवांना श्रावण महिना विशेष झाला. त्यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

श्रावण महिन्याबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्या नगरामध्ये त्याला धन, मान-सन्मान सर्व काही मिळत होतं. तरीही तो दुःखी असायचा कारण त्याला संतान नव्हती.

त्याला नेहमी चिंता वाटायची की हा व्यापार, धनसंपत्ती पुढे जाऊन कोण सांभाळणार? म्हणून आपली पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचे व्रत आणि पूजा करत असे. तसेच सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवा समोर तुपाचा दिवा लावत असे.

त्यावर व्यापाऱ्याची भक्ती पाहून देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणाली, ‘हे प्राणनाथ हा व्यापारी तुमचा भक्त आहे. खूप वर्ष याने सोमवार व्रत व पूजा नियमितपणे केलेली आहे. तुम्ही यांची मनोकामना पूर्ण करा.’

तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला मंद हास्य करत उत्तर दिले की,’ हे पार्वती, या संसारात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळते.’ पण पार्वती मातेने हट्ट धरला की तुम्ही त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे. शिव शंकर पार्वती ला म्हणाले की तुझ्या आग्रहाखातर त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देत आहे.पण त्याचा पुत्र सोळा वर्षच जिवंत राहील.

त्याच रात्री भगवान शंकर व्यापार्‍याच्या स्वप्नात जातात आणि त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतात व सांगतात की तुझा पुत्र सोळा वर्षेच जिवंत राहील. देवाच्या वरदानामुळे तो व्यापारी खूप खुश होतो पण मुलाच्या अल्प आयुष्याची चिंता त्याला सतावू लागते.

तो पहिल्या प्रमाणेच सोमवारी विधिवत व्रत आणि पूजन करत राहतो. काही दिवसांनी त्याच्या घरी एका सुंदर पुत्राचा जन्म होतो. ब्राह्मणांना बोलावून त्या बालकाचे नामकरण केले जाते. त्याचे नाव अमर ठेवले जाते.

जेव्हा अमर बारा वर्षांचा होतो तेव्हा त्याला विद्याभ्यासासाठी वाराणसीला पाठवण्याचा निश्चय होतो. त्यासाठी आमचे मामा दिपचंद यांना बोलावले जाते. अमर आणि दिपचंद वाराणसीला जाण्यासाठी निघतात. वाटेत जिथे ते विश्राम करण्यासाठी थांबतील तेथे अमर यज्ञ करत असे.

ब्राह्मणांना भोजन देत असे. असे करत करत ते एका नगरात जातात. त्या नगरातील राजकन्याचा विवाह होणार असतो. ठरल्याप्रमाणे वरात आलेली असते मात्र वर पित्याला एक चिंता सतावत असते. मुलाचा एक डोळा काणा असतो.

जर हे सत्य राजाला समजले तर तो लग्नाला नकार देईल. या चिंतेत असतानाच मुलाच्या पित्याची नजर अमरवर पडते आणि त्याला एक कल्पना सुचते की जर नवऱ्या मुलाच्या जागी अमरला उभे केले तर लग्न होऊन जाईल आणि लग्नानंतर अमरला भरपूर धन देऊन राजकुमारीला आपल्या घरी जाऊन जावे.

ही गोष्ट त्याने अमर आणि दिपचंद याला बोलून दाखवले. धनाच्या लालसेने दिपचंद ने देखील होकार दिला आणि अमर चा विवाह राजकुमारी चंद्री कशी पार पडला. मात्र तेथून निघताना अमरला राजकुमारी हिच्याशी खोटं बोलणे योग्य वाटले नाही आणि त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिले की राजकुमारी चंद्रिका तुझा विवाह तर माझ्याशी झाला आहे आणि मी विद्याभ्यासासाठी वाराणसीला जात आहे.

तू ज्या नवयुवकाची पत्नी होणार आहेस तो डोळ्याने काणा आहे. राजकुमारीला हे सर्व समजते तेव्हा ती त्या मुलासोबत जायला नकार देते आणि जेव्हा हे सर्व सत्य राजाला समजते तेव्हा राजा राजकुमारीला आपल्या राजवाड्यात ठेवून घेतो.

अमर आपला मामा दिपचंद सोबत वाराणसीला पोहोचतो आणि गुरुकुलमध्ये विद्याभ्यास सुरू करतो. पाहता पाहता अमरला सोळा वर्ष पूर्ण होतात. सोळा वर्ष पूर्ण होताच अमर एका यज्ञाचा आयोजन करतो. यज्ञ समाप्त होताच तो ब्राह्मणांना भोजन देतो व अन्न, वस्त्र यांचे खूप मोठ्या प्रमाणात दान करतो.

सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अमर आपल्या शयनकक्षात आराम करण्यासाठी जातो आणि भगवान शंकरांच्या आशिर्वादानुसार अमरची प्राणज्योत शयन अवस्थेतच मावळते. सूर्योदय होताच जेव्हा दिपचंद अमरला मृतावस्थेत पाहतो तेव्हा त्याला खूप दुःख होते व तो जोरजोराने रडू लागतो.

दिपचंदचा रडण्याचा आवाज जवळून जाणाऱ्या शिवपार्वतीच्या कानावर पडतो आणि पार्वती माता भगवान शंकराला प्रार्थना करते की, हे प्राणनाथ मला हे रडण्याचे स्वर सहन होत नाही आहेत. तुम्ही या व्यक्तीचे कष्ट दूर करा.

तेव्हा शिव पार्वतीला सांगतात की, हा मृत मुलगा त्याच व्यापाऱ्याचा पुत्र आहे ज्याला मी सोळा वर्षे आयुचे वरदान दिले होते. तेव्हा पार्वती माता भगवान शंकरांना पुन्हा विनंती करते की तुम्ही या मुलाला पुन्हा जिवंत करा. नाहीतर याचे माता पिता पुत्राचा मृत्यू झाल्यामुळे स्वतःच्याही प्राणांचा त्याग करतील.

आणि मुलाचे पिता तर तुमचे भक्त आहेत. तेव्हा भगवान शंकर त्या मुलाला जीवित होण्याचे वरदान देतात आणि काही क्षणातच तो मुलगा जिवंत होतो. विद्याभ्यास पूर्ण करून अमर त्याच्या मामासोबत आपल्या नगराकडे जायला निघतो.

जाता जाता ते दोघं त्या नगरात थांबतात येथे अमरचा विवाह झालेला असतो. नेहमीप्रमाणे त्या नगरात ही अमर यज्ञाचे आयोजन करतो. तेथून प्रवास करत असताना राजा त्या यज्ञाचे आयोजन पाहतो आणि त्याच क्षणी राजा अमरला ओळखतो व त्या दोघांना आपल्या राजवाड्यात घेऊन जातो.

काही दिवस आपल्या राजवाड्यात ठेवून त्यांना वस्त्र आणि काही सैनिक देऊन राजा राजकुमारीला विदा करतो. इकडे व्यापाऱ्याने व त्याच्या पत्नीने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले असते आणि अन्नपाण्याचा त्याग करून ते आपला मुलगा व त्याच्या पत्नीची प्रतीक्षा करत असतात.

जेव्हा व्यापारी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाला व सुनेला पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. त्या रात्री भगवान शंकर त्या व्यापार्‍याच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगतात की तु जे भक्तिभावाने सोमवारचे व्रत आणि पूजन करत आहेस व व्रत कथा श्रवण करत आहेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या मुलाला आयुष्य प्रदान केले आहे.

शास्त्रात लिहिलेले आहे की जे स्त्री-पुरुष सोमवारचे विधीवत व्रत करतात आणि व्रत कथा ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *