शिवामूठ कशी अर्पण करावी? संकल्प – फळ, शिवामूठ व्रत.

नमस्कार मित्रांनो,

श्रावणाच्या सोमवारी आपण शिवाची पूजा आनंदाने करत असतो. शिवपूजन यासाठी हा श्रावण मास अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे. या श्रावण मासामध्ये आपण जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भगवंतांच्या कथांचे श्रवण करू जे आपल्यासाठी उत्तम असतं.

म्हणूनच श्रवण महिमा वर्णन करणारा असा हा श्रावण महिना आहे आणि यामध्ये शिवाचे पूजन म्हणजे साक्षात दुग्धशर्करा योग म्हणता येईल. याचे वर्णन करताना ऋषीमुनींनी सांगितले आहे की शिवाला अत्यंत प्रिय काय आहे? तर जल आणि अभिषेक. या दोन गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत.

त्यामुळेच शिवपूजन करताना शिवामूठीचे व्रतसुद्धा अत्यंत आनंदाने केले जाते. हे व्रत कसे करावे? कोणी करावे? कशा पद्धतीने शिवमुष्टी अर्पण करावी? शिवाला प्रिय असणारे धान्य कुठले आहे? हे अर्पण केल्यावर त्याचे फळ काय मिळते? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शिवामूठीचे जे व्रत आणि पूजन करणार आहोत हे श्रावणातील प्रत्येक सोमवारी करावे. अनेकदा चंद्र-सूर्याच्या भ्रमणामुळे हिंदू पंचांग पद्धतीमध्ये श्रावण मासामध्ये सोमवार कधी चार येतात तर कधी पाचही येत असतात.

तर अशा प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करावे आणि शिवाला शिवामूठ अर्पण करावी. हे कार्य शक्यतो मंदिरामध्ये करावे. मात्र काही कारणाने आपल्याला मंदिरात जाता येत नसेल किंवा सध्याच्या स्थितीमध्ये मंदिरे बंद असतील तर घरामध्ये सुद्धा शिवलिंगावर हे पूजा करू शकतो.

जर आपल्या घरांमध्ये शिवलिंग नसेल तर शिवामूठ कशी अर्पण करावी? तर आपण माती द्वारे पार्थिव शिवलिंग तयार करू शकतो आणि त्यावर सुद्धा ही शिवामूठ अर्पण करू शकतो. अशा पद्धतीने शिवामूठीचे पूजन नक्की करावे. फुलांच्या द्वारे सुद्धा आपण शिवलिंग तयार करू शकतो. तर श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करावी.

पहिल्या सोमवारी तांदूळ आपण घ्यावेत. दुसऱ्या सोमवारी तीळ घ्यावेत. तिसरा सोमवार असेल त्यावेळी आपण मूग घ्यावेत. चौथ्या सोमवारी जवस घ्यावेत. काही काही ठिकाणी उत्तर भारतामध्ये विशेषकरून चौथ्या सोमवारी जवसच्या ऐवजी जव अर्पण केले जातात.

शिवाला जवसुद्धा प्रिय आहेत. त्यामुळे जवस किंवा जव जे काही आपल्याला प्राप्त होईल ते आपण अर्पण करू शकता आणि जर एखाद्या महिन्यामध्ये पाचवा सोमवार आला तर अशावेळी सातू आपण अर्पण करावे.

शिवामूठ कशी अर्पण करावी? तर मंदिरात जाऊन शिवाचे षोडोपचार पूजन करावं. ओम नमः शिवाय या मंत्राचे प्रेम करत राहावे आणि शिवाची पूजा करावी. गंध, पुष्प, अक्षता, धूप आणि नैवेद्य अर्पण करावे आणि पूजा झाल्यावर देवाला शिवामूठ अर्पण करावी.

शिवामृत किती वेळा अर्पण करावी? तर एकावेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्याव. शक्य असेल तर त्यावर पाणी घ्याव. धान्य ओलं करून घ्याव आणि ओम नमः शिवाय म्हणत देवाला अर्पण कराव. धान्य अर्पण करताना मूठीवर हळुवार पाणी सोडावे. असे क्रमाने तीन वेळा शिवामुठ अर्पण करावी.

मग पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मुग, चौथ्या सोमवारी जवस किंवा जव आणि जर पाचवा सोमवार आला तर सातू अशाप्रकारे धान्य प्रत्येक सोमवारी क्रमाक्रमाने अर्पण करावे आणि हे ओले करून अर्पण करत असताना आपण एक मंत्र प्रेमाने बोलावा.

शिवा शिवा महादेवा |
माझी शिवामूठ ईश्वरा देवा |

असे बोलून आपण शिवाला शिवामूठ अर्पण करावी. वेगवेगळ्या संकल्पासाठी सुद्धा आपण शिवाची पूजा करू शकतो. विवाहाचा संकल्प घेऊन ज्या कुमारी कन्या आहेत त्यांनी शिवामूठ अर्पण करावे. सौभाग्याचा संकल्प घेऊन सौभाग्यवती स्त्रियासुद्धा हे अर्पण करू शकतात.

संतती लाभ, प्राप्तीसाठी आपण शिवाला शिवामूठ अर्पण करू शकता. ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा आपण शिवमूठ अर्पण करू शकतो.

हे व्रत आपण कधी करावे? तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी करावे आणि अशा पद्धतीने किमान पाच वर्षे या व्रताचे आचरण करावे. जर आपल्याला शक्य असेल तर प्रत्येक वर्षी आपण आपल्याला शिवामूठ वाहता येत असेल तर प्रत्येक वर्षी सुद्धा आपण शिवामूठ वाहू शकतो.

या शिवामूठीची कथा आहे. ही कथा पण देवालयात बसून वाचन करू शकता किंवा तेथे गर्दीमुळे, श्रावण सोमवार असल्यामुळे वेळ किंवा जागा उपलब्ध नसेल तर शांतपणे घरी येऊन सुद्धा आपल्या देवासमोर कथा पठण आणि श्रवण करू शकता.

शिवामूठीच्या सोमवारी उपवास जरूर करावा. तसेही प्रत्येक व्यक्तीने किमान श्रावणी सोमवारचे चार सोमवार किंवा पाच सोमवार ते व्रत आणि पूजन जरुर करावे.

मित्रांनो, अशाप्रकारे पूजन करत असताना जे काही आपल्या संकल्प आहेत ते शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती या शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावीत.

कारण हा शिव अर्थात शिवाचा अर्थच कल्याणकारी आहे. हा सर्वांचा कल्याण करणारा आहे. देव, दानव, दैत्य यां सर्वांना आणि मानवांना सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे. त्यामुळे यांना भोलेनाथ म्हटले जाते.

या भोलेनाथ यांचा असा पवित्र सोमवार आणि विशेषतः श्रावणातला सोमवार यावेळी केलेलं हे शिवामूठीचे व्रत अत्यंत सफल आणि शीघ्रतेने इच्छित फळ प्रदान करणारे असते.

आपण जरूर या व्रताचे पूजन करावे आणि त्यातून आपले मानसिक, लौकिक आणि पारलौकिक इच्छांची पूर्तता व्हावी अशी प्रार्थना करावी.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *