श्रावण संकष्टी चतुर्थी 25 ऑगस्ट 2021, शत्रूचा नाश करण्यासाठी उपाय.

नमस्कार मित्रांनो,

आज आपण श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला करायचा हरिद्रा गणपतीचा एक असा उपाय पाहणार आहोत की जो केल्याने आपल्या शत्रुचा सफाया होऊन जाईल. आपल्या जीवनातील शत्रु बाधा नष्ट होऊन जाईल.

या उपायांमुळे आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल होऊन जाइल. आज आपण अशा एका खास उपायांविषयी माहिती घेणार आहोत. तसे तर श्रावण महिना हा फार महत्वपूर्ण आणि खास असतो व अशा या श्रावण महीन्यातील काही खास तिथींना काही विशेष असे उपाय करून आपण आपल्या शत्रूंना मित्र बनवू शकता.

श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला हरिद्रा गणेशाचा या खास उपायाने आपले शत्रू देखील आपले मित्र बनतील. श्रावण महिन्यामध्ये असे विशेष बरेच पर्व येतात. पण त्यांपैकी श्रावण संकष्टी चतुर्थी या दिवशी खास करून गणपती बाप्पांच्या विशेष रूपाच्या पूजनाचे विधान शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे.

शास्त्रानुसार श्रीगणेश हे चतुर्थीच्या स्वामी मानले जातात. भविष्यपुराण, कृत कल्पतरू, चतुर पूर्ग चिंतामणी अशा शास्त्रांमध्ये संकष्टी चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून संबोधले गेले आहे. संकष्टी चतुर्थीला गणेशांचे हरिद्रा रूपाच्या पूजनाचे विधान आहे. हरिद्रा म्हणजे काय तर हळद. जी हळद आपण जेवण बनविताना वापरतो.

पौराणिक मान्यता नुसार आता त्रीपूर्सुंदरीच्याद्वारे स्मरण केल्या नंतर हरिद्रा गणेशाने प्रकट होऊन भांडासुर दैत्या द्वारे केल्या गेलेल्या आधीच्या यंत्राला नष्ट केले होते. जितक्या देखील प्रकारचे तांत्रिक तोटके असतात ते हरिद्रा गणपती क्षणात नष्ट करून टाकतात.

मग आपला शत्रु आपल्यावर कोणत्याही प्रकारचा तांत्रिक प्रयोग करु देत. हरिद्रा गणेशा चा हा विशिष्ट उपाय त्या प्रयोगांना नष्ट करून टाकतो.

हरिद्रा म्हणजे हळद. तंत्र शास्त्रानुसार हरिद्रा गणपती माता बगलामुखी यांचे अंग देवता आहेत. माता बगलामुखी यांचे पूजन हरिद्रा गणेशा शिवाय होऊ शकत नाही.

आपण पाहिले असेल की विवाह सारख्या मंगल कार्यांमध्ये हळद खेळली जाते. त्याचे कारण असते की विवाहासारख्या कार्यामधून अमंगल दूर होऊ दे. हळद ही फारच शुभ, सौभाग्य वर्धक आणि विघ्ननाशक मानली जाते.

बरेच लोक एखाद्या कार्याला जाण्यापुर्वी खिशातून थोडी हळद घेऊन जातात. कारण त्यांचे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे.

मित्रांनो, हरिद्रा गणेशा ला फार महत्त्वाचे मानले जाते. हरिद्रा गणेशाचे स्वरूप फारच निराळे आहे. त्यांचा वर्णन पिवळा असून त्यांनी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र परिधान केले आहे.

सुवर्ण मुकुटाने सुसज्जित चतुर्भुज गणपती असे त्यांचे रूप असून यांच्या वरच्या डाव्या हातामध्ये अंकुश व खालचा डावा हात वर मुद्रेत असून वरच्या उजव्या हातात पाश आणि खालच्या उजव्या हातामध्ये एक रत्न कुंभ धारण केले आहे.

हरिद्रा गणेशाचे पूजन हे पिवळ्या वस्तूंनी केले जाते. म्हणजे जर आपण तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर त्या तुपामध्ये देखील हळद मिसळली जाते. कन्हेरी ची पिवळी फुले त्यांना वाहिली जातात. पिवळी मिठाई, बेसनाचे लाडू अर्पित केले जातात. हळदीने तिलक केला जातो व चंदनाचा धूप दाखवला जातो.

तर यादिवशी उपाय म्हणून काय करायचे आहे की ज्यामुळे आपले शत्रू देखील आपले मित्र बनतील. या दिवशी आपण एक पिवळी चपाती किंवा रोटी बनवायची आहे. म्हणजे पिठामध्ये थोडी हळद मिसळून पिवळी रोटी बनवावी किंवा आपण बेसन पिठाची देखील रोटी बनवू शकता.

या रोटी किंवा चपातीवर आपल्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने ज्याला आपण तर्जनी म्हणतो त्याने थोडेसे मध घेऊन तर्जनी च्या साहाय्याने शत्रूचे नाव त्या चपातीवर लिहायचे आहे. यानंतर शत्रूचे नाव लिहिलेली ही रोटी गणेशाला अर्पण करावी.

त्याचा भोग गणेशाला लावावा व त्यानंतर ही रोटी पिवळसर रंगाची छटा असणाऱ्या गाईला खाऊ घालावी. त्याच बरोबर एका विशेष अशा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तो मंत्र आहे..

।। ॐ हुं गं ग्लौं हरिद्रा
गणपत्ये वरद वरद सर्वजन
हृदये स्तम्भय स्वाहा ।।

मित्रांनो, हा एक तांत्रिक मंत्र आहे. त्यामुळे अगदी अचूक असा या मंत्राचा आपण जप करायचा आहे.

या उपायांमुळे आपले शत्रू देखील आपले मित्र बनून जातील. आपण हा उपाय अवश्य या श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला करावा. फारच साधा आणि प्रभावी असा हा उपाय आहे.

यामुळे ज्या काही आपल्या समस्या असतील त्या संपून जातील. ज्या देखील प्रकारचे तांत्रिक प्रयोग आपल्या शत्रूने आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर केले असतील तर ते सर्व तंत्र प्रयोग तत्काळ नष्ट होऊन जातील.

आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता निघून जाईल. दुःख, दुर्भाग्य, दरिद्रता कायमची निघून जाईल व आपल्याला आपल्या इच्छित कार्यामध्ये यश मिळू लागेल. आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येईल.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *