नमस्कार मित्रांनो,
कोणत्याही शनिवारी रात्री झोपताना आपल्या दोन पायांना ही एक वस्तू आपण नक्की लावा याने 3 प्रकारचे लाभ होतात. पहिली गोष्ट जर घरामध्ये अशांती आहे, सतत भांडणे होतात, लोक एकमेकांशी वैर भावाने शत्रुत्व भावाने वागतात तर ही घरातली अशांती, क्लेश, कलह, भांडणे, वाद विवाद याने दूर होतात. घरामध्ये सुख शांती नांदू लागते
दुसरी गोष्ट आपल्या कुंडलीमध्ये जर कोणत्याही स्वरूपाचा शनी दोष असेल मग शनीची साडेसाती चालू असेल, शनीची दह्या म्हणजे अडीचकी चालू असेल, अंतर्दशा किंवा महादशा चालू असेल तर हे तमाम प्रकारचे शनी दोष सुद्धा या उपायाने दूर होतात. आपण हा उपाय 3 शनिवार सलग करायचा आहे.
तीनपेक्षा जास्त ही करू शकता आपल्याला त्याने लाभच प्राप्त होईल. घरांमध्ये ज्या ज्या व्यक्तींना अशा प्रकारचे त्रास होतात ते सर्व व्यक्ती हा उपाय शनिवारी रात्री झोपताना करू शकता. तिसरा लाभ याने जो संभवतो तो म्हणजे आपल्या घरात जर लक्ष्मी टिकत नसेल म्हणजे जर पैसा येत नसेल,
आलेला पैसा जर टिकून राहत नसेल, आजारपणामध्ये पैसा निघून जातो किंवा अगदी नको त्या गोष्टींवर वायफळ जर पैसा खर्च होत असेल आणि पैशाची जशी आवक असायला हवी ज्याप्रकारे पैसा यायला हवा तो तसा तुमच्या उद्योग धंद्यातून, व्यवसायातून नोकरीतून किंवा कामातून येत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत कारगर आहे.
मात्र शनी दोषांमुळे जी पैशांची आवक थांबलेली आहे केवळ त्याचसाठी याचा फायदा होतो. कधी कधी शनी इतर ग्रहांची दुष्ट युती निर्माण करतो. जसे की, राहू असेल, केतू असेल किंवा काही शुभ ग्रहांची अशुभ युती तयार होते की, त्यामुळे आपल्या कुंडलीत असे दोष निर्माण होतात की धनप्राप्तीचे योग नष्ट होतात.
पैसा येता येता थांबतो, पैसा येणार असतो मात्र येता येता थांबत असेल तर त्यासाठी हा उपाय आहे. मित्रांनो यासाठी आपण जी वस्तू याठिकाणी वापरायची आहे ती म्हणजे मोहरीचं तेल. मोहरीच्या तेलाला हिंदीमध्ये सरसों का तेल असेही म्हणतात. तर थोडसं मोहरीच तेल आपण घ्यायच आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत.
अगदी थोडेसे एक चमचाभर टाकले तरी चालेल, अर्धा चमचा टाकला तरी चालेल, चिमूटभर टाकला तरी त्याचा तितकाच प्रभाव निर्माण होतो. हे काळे तीळ तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा किराणामालाच्या दुकानात मिळून जातील. हे दोन पदार्थ एकत्र केल्यानंतर ते थोडेसे तेल तापवायचे आहे.
जेणेकरून त्या दोन पदार्थांचा अर्क एकटर्नहोईल आणि त्यानंतर रात्री झोपताना हे तेल आपल्या तळपायांना आपण व्यवस्थित चोळायच आहे. थोडंस तेल हे आपल्या भुवया ज्या आहेत ज्याला आपण आयब्रो अस म्हणत त्या भुवयाना सुद्धा अगदी थोडस तेल लावायचं आहे.
दोन्ही तळपाय आणि दोन्ही भुवया लावायचं आहे आणि आपण शांतपणे झोपी जायचं आहे. मित्रांनो या ज्या बाधा आहेत, ही संकटे आहेत, हे जे दोष आहेत ते तात्काळ नष्ट झालेले तुम्हास दिसून येतील. हे सर्व करताना आपल्या इष्ट देवतेचे आपल्या कुलदेवतेचे स्मरण करण्यास मात्र विसरू नका.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.