नमस्कार मित्रांनो,
कोणत्याही व्यक्तीची हाय लागलेली असेल कुणी काही केलेला असेल, एखादा नजर दोष असेल म्हणजेच नजर लागलेली असेल किंवा तुम्ही जर एखाद्या नि र्जन जागी जाऊन आलेला असाल ज्या ठिकाणी लोकांचा वावर नसतो. आणि त्या ठिकाणी चुकून जर तुम्ही एखाद्या वस्तूला ओलांडलेला असेल पाय दिलेला असेल किंवा स्पर्श केलेला असेल तर अशावेळी आपल्या घरात मोठ्या प्रमाणात निगे टि व्हिटी तयार होते.
बाधा उत्पन्न होतात. आणि मग घरात सतत लोक एकमेकांच्या अंगावर डाफरतात. ओरडतात कुटुंबातील सदस्यात प्रेम शिल्लक राहत नाही. सातत्याने भांडणे होतात. अशा घरात लक्ष्मी सुद्धा राहणे. पसंत करत नाही आणि घरात जो येत असलेला पैसा असतो तो सुद्धा येणं बंद होतो. आहे त्या पैशाला मार्ग फुटतात. पाय फुटतात. पैसा टिकत नाही. मित्रांनो अनेक लोकांनी अशा प्रकारच्या समस्या अडचणी मांडलेल्या आहेत.
या अडचणींवर नक्की मार्ग कोणता खर तर आपण दररोज देवपूजा करत असाल. देवाकडे मागणं मागत असाल की आमच्या घरात सुख संपदा समृद्धी समाधान नांदू दे. मात्र तरीही देव हे सगळ का ऐकत नाही? का आपल्या देवपूजेमध्ये काही कमतरता राहत आहेत? मित्रांनो ज्या नकारात्मक शक्ती ना तुम्ही स्वतः आमंत्रित केलेल आहे त्या नकारात्मक शक्ती तुम्ही सांगितल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही, किंबहुना तुम्ही जा म्हटला तर त्या जाणार नाही.
त्यांना काही ना काही तरी प्रलोभन द्यावं लागतं, त्यांना कुठेतरी सोडून याव लागत आणि याउलट जर कोणी काही केलेल असेल तर अशा शक्ती तुम्ही सांगितल्याने सुद्धा बाहेर जात नाही त्यांना काढावं लागत. आज आपण कुणाची हाय लागलेली असेल हाय म्हणजे काय तर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने किंवा अगदी तुमचे आजी आजोबा पणजी पणजोबा किंवा खापर पणजोबा असतील त्यातील एखाद्या व्यक्तीने कुणाचं तरी वा टोळं केलेल आहे.
एकूणच कुणाचं तरी प्रचंड नुकसान केलेल आहे. तर त्या नुकसान झालेल्या व्यक्तीचा तळतळाट शिव्या शाप जेव्हा त्या व्यक्तीस लागतात, आपल्या कुटुंबातील व्यक्तीला लागतात. तेव्हा ही जी हाय आहे ती पिढ्य न्पिढ्या चालू राहते, आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका आपल्याला सुद्धा भोगाव्या लागतात. त्या पापांची शिक्षा जी आज जे सध्या जगात आहे आज जे आपल्यात आहेत त्यांना सुद्धा ती भो गावी लागते.
ह्याला हाय लागणे. साध्या सोप्या भाषेत म्हणतात तर अशी कोणतीही समस्या असू द्या एक उपाय सांगत आहे. हा उपाय शनिवारी करायचा आहे. तेव्हा हा उपाय करणे म्हणजे सर्वस्व नव्हे आपण देवपूजा करत राहा आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची पूजा इष्ट देवतेची पूजा ही नित्यनियमाने करा. मित्रांनो जो उपाय आहे तो प्रत्येक शनिवारी आपण नक्की करा.
कदाचित पहिल्या शनिवारी तुम्हाला फरक दिसू लागेल. मात्र जर शंभर टक्के फरक पडला नाही. तर दोन शनिवार तीन शनिवार जेव्हा तुम्हाला फरक जाणवेल. तेव्हा हा उपाय करा. तुम्ही बंद करू शकता. उपाय साधा सोपा आहे. पाच ते दहा मिनिटात तुम्ही करू शकता. जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे उपाय करू लागतो, उपाय सांगू लागतो, टोटके सांगू लागतो, मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अडथळे आणतात.
अचानकच तब्येत बिघडणे, अचानकच काहीतरी मळमळणे, किंवा अस्वस्थ वाटू लागणे, तब्येत खराब झाल्यासारखे वाटू लागणे, अशी लक्षणे दिसू लागतात. या नकारात्मक शक्तींची ही इच्छा असते असे टोटके असे उपाय हे सर्वसामान्य पर्यंत पोहोचू नये मात्र ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष बाळूमामा आहे त्याला अशा नकारात्मक शक्तींना घाबरण्याची गरज नाही.
<
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन चीजवस्तू लागणार आहेत. पहिली वस्तू लाल मिरच्या, ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात ज्यापासून आपण चटणी तयार करतो एक तर मिरची हिरवी असते ती हिरवी मिरचीच नंतर लाल बनते आणि वाळते तर अशी वाळलेली दोन लाल मिरच्या, कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळून जातील. त्याला देठ असावेत. अश्या दोन मिरच्या घ्या.
सोबतच जो लसुन आहे लसणाच्या पाच पाकळ्या आपल्याला लागतील. लसणाच्या अखंड पाच पाकळ्या ज्या आपण कट करायच्या नाहीयेत तर व्यवस्थित अखंड असल्या पाहिजे. अर्ध्या वगैरे घेऊ नका. पाच लसणाच्या पाकळ्या वरचे टरफल आहे ते सुद्धा काढू नका. हा दोन लाल मिरच्या मी सांगितलेल्या पाच लसणाच्या पाकळ्या आणि काळी मोहरी, मोहरी दोन प्रकारची असते.
एक पिवळी असते एक चॉकलेटी रंगाची असते. ज्याला आपण काळी मोहरी म्हणतो, आपल्याला थोडीशी काळी मोहरी लागणार आहे अगदी चिमूटभर घेतली दोन तीन चिमूटभर एक चमचाभर घेतली तरी चालेल. मित्रांनो या तिन्ही सामग्री नकारात्मक शक्तींना वास्तूतून बाहेर काढण्यासाठी मनुष्य जीवनातून बाहेर फेकून देण्यासाठी वापरल्या जातात.
या तिन्ही वस्तू आपण आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत. आपल्या घरातच आपण हा उपाय करणार आहात,आपल्या डोक्यावरून आपण त्या सात वेळा वारायच्या आहेत. मात्र हे करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट करा. आपल्या संपूर्ण घरात फिरून या पूर्णघरांमध्ये अगदी बाथरूम टॉयलेट्सकट सगळीकडे आपल्या उजव्या हातात या तिन्ही वस्तू ठेवून आपल्या पूर्ण घरामध्ये फिरून या त्यानंतर स्वतःच्या डोक्यावरुंन सात वेळा ही सामग्री वारायची आहे.
वारणे म्हणजे काय तर स्वतःच्या डोक्यावरून गोलाकार फिरवणे. ज्या प्रकारे घड्याळाच्या काटा फिरतो गोलाकार आपण आपला हात फिरवायचा आहे. सात वेळा त्यानंतर आपल्या कुटुंबात जितक्या व्यक्ती आहे. जितके लोक आहेत. लहान बाळापासून ते वयोवृद्धांना पर्यंत स्त्रियांनापासून पुरुषानंपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावरून सात वेळा ही सामग्री वारायाची आहे.
त्यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर जाऊनअगदी तुम्ही जर खेडेगावात राहताय आपल्या दाराच्या बाहेर जावा. मुख्यत प्रवेशद्वाराच्या बाहेर जा आणि घराबाहेर ही सामग्री जाळायची आहे. अंगणाच्या ही बाहेर अंगण आहे. त्याच्या ही बाहेर जाळायची आहे. जाळण्यासाठी कोळसे लाकूड किवणा जर गोवारी असेल काही जण शेण्या म्हणतात आणि गायीच्या शेनापासून ह्या शेन्या बनतात.
ह्याला गोवारी किंवा शेण्या अस म्हणतात. त्यावरती ती जाळून आपण ही सामग्री जाळायची आहे. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय शहरी संस्कृती मध्ये आहात, तर शहरातील लोकांनी फ्लॅटमध्ये राहतात, त्यांनी आपल्या फ्लॅटच्या बाहेर जाऊन ज्या ठिकाणी खूप कमी लोक आहेत, गर्दी नाहीये, निर्जन जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ही सामग्री जाळायची आहे.
मित्रांनो घरातून बाहेर पडताना त्या नकारात्मक शक्तीला आवाहन करा, की तू आता माझ्याबरोबर चल तुला माझ्या घराच्या बाहेर जायच आहे. मनोमन बोला स्पष्टपणे बोला. आपल्या उंबरठ्याच्या बाहेर पडल्यानंतर तू आता माझ्या घराच्या बाहेर हो. असा आदेश द्या. हा आदेश आहे आणि जेव्हा तुम्ही ती सामग्री जाळू लागाल तेव्हा तू आता इथेच थांब. हे नकारात्मक शक्ती हे बाधा तू आता इथंच थांब.
तू पुन्हा परत येऊ नकोस. असं बजावून सांगा. खरं तर अनेकांना हे हास्यास्पद वाटेल. मात्र जो हा त्रास भोगतो आहे त्यालाच माहिती आहे की हे किती भयंकर आहे असा आदेश देऊन आपण पुन्हा परत यायचं आहे. परत येताना मागे वळून पाहायचे नाही. आपल्या दारात घरच्यांना सांगून ठेवा. तांब्याभर पाणी किंवा एखाद्या जगामध्ये जगभर पाणी त्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा अंगणाच्या बाहेर ठेवायला.
सांगा आल्याबरोबर थोडंसं पाणी आपल्या अंगावरची शिंपडा. आत मध्ये या. बाथरूम मध्ये जाऊन स्वच्छ हात पाय तोंड धुवा. स्नान केल्यास अतिउत्तम आहे आणि सर्वात प्रथम आपल्या देवघरा समोर बसून आपल्या इष्ट देवतेला कुलदेवतेला प्रार्थना करा की आता ही नकारात्मक शक्ती पुन्हा आपल्या घरात येता कामा नये.
आपला कृपा आशीर्वाद आपल्या शक्तीने आमच्या घरात सुख समृद्धी समाधान शांतता नांदू दे. किंवा तुम्हाला कुलदैवत माहित नाही तुम्ही ज्या देवतेवर श्रद्धा आहे. विश्वास आहे त्या देवतेला हे आवाहन करा. मित्रांनो विश्वास ठेवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती या प्रकारे जर तुम्ही वारंवार हा उपाय प्रत्येक शनिवारी करू लागलात तर तुमच्या घरात परत कधीच येणार नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.