ज्या कामाला हात लावाल ते सोन्यासारखे होईल आज शनिवारी करा हे छोटे उपाय… शनिदेव करतील कृपा

नमस्कार मित्रांनो,

आज आपण शनिवारी शनिदेवांना प्रसन्न करण्याचे काही उपाय पाहणार आहोत. या उपायांनी प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते. मित्रांनो प्रत्येक शनिवारी काळे तीळ, कणिक, साखर मिसळून घ्यावे. नंतर हे मिश्रण मुंग्यांना खाऊ घालावे. शनि दोषाशी संबंधित समस्यांपासून मुक्तीसाठी काळ्या घोड्याची नाळ किंवा नावाची खीळ याने तयार अंगठी मधल्या बोटात शनिवारी सूर्यास्त काळात धारण करावी.

शनि दोषापासून मुक्तीसाठी शनी देवांची दहा नावे जपावी. याने कामात नक्कीच यश मिळते. शनि देवाच्या नामांचा जप करण्यासाठी शनी देवांची कोण कोणती ती नावे आहेत. ते आता आपण पाहूयात. कोणहस्थ, पिंगळ, बभ्रू, कृष्ण, रौद्रांत, यम, सौरी, शनैश्चर, मंद, पीपलाश्रय. ही शनी देवांची दहा नावे आहेत.

मित्रांनो शनिवारी दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते. म्हणून आपल्या सामर्थ्या नुसार काळे तीळ, काळे कापड, लोखंडी भांडे, उडीद डाळ दान करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन आपणास शुभ फळ प्रदान करतात. माकडांना गुळ व चणे खाऊ घातल्याने हनुमान प्रसन्न होतात. प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा चा पाठ करावा. हनुमानाचे पूजन केल्याने व्यक्तीला शनी देवाच्या दोषाचा सामना करावा लागत नाही.

शनि देवाची पूजा करून त्यांना निळ्या रंगाचे फुल त्यांना अर्पित करावे. यासोबतच रुद्राक्ष माळ घेऊन ओम शम शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. प्रत्येक शनिवारी असे केल्याने साडेसाती आणि धैय्या पासून मुक्ती मिळते.

सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर एका वाटीत तेल घेऊन आपला चेहरा बघावा. नंतर ते तेल गरजू व्यक्तीला दान करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भाग्य संबंधी अडचणी दूर होतात. तसेच सकाळी उठल्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि सात प्रदक्षिणा घालाव्या. सूर्यास्तानंतर एखादा सुनसान जागी असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावावा. असे शक्य नसल्यास मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकता.

तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात तीळ मिसळावे. नंतर हे पाणी शिवलिंगावर अर्पित करावे. असे केल्याने व्यक्तीला सर्व आजा रांपासून मुक्ती मिळते आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात. धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *