शनी देवाला इतकं का मानले जाते?…नक्की जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो,

जाणून घेउया शनिदेवां बदल, अहमदनगर जिल्ह्यतील शिर्डी जवळचं वसलेलं प्रमुख आणि जागृत तीर्थ क्षेत्र मधील शनी शिंगणापूर परिचित आहे. भारतामधील सूर्य पुत्र शनीचे अनेक मंदिर आहेत.

ह्या मध्ये जाणलेलें प्रमुख मंदिर हे शनी शिंगणापूर इथे आहे. जग प्रसिद्ध शनी मंदिराची विशेषता म्हणजे येथील शनी देवांची पाषाणी मूर्ती हि खुल्या आकाशाखाली उघड्यावर विराजित देव आहे. पण देऊळ नाही अशी ह्या देवाची वैशिष्ट्य आहे.

हि मूर्ती उंचीला पाच फूट, नऊ इंच आणि लांबीला एक फूट, सहा इंच एवढी आहे. शनी शिंगणापूर इथे शनीचे महत्व इतर मंदिर पेक्षा अतिशय वेगळं आहे. ह्या स्थानाची आणखी एक विशेषता म्हणजे ह्या गावातील नागरिक आपल्या दाराला कधीही कुलूप लावत नाही.

ह्या स्वयंभू मूर्ती वर आख्ययिका सांगितले जातात. काही रोचक अखिलेखा मध्ये असे मानले जाते कि शनी इथेच वास्तव्य करतात त्या मुळे इथे कधीच चोरी होत नाही, आणि चोरी केल्या नंतर चोर ह्या गावाची सीमारेषा परत आजिवंत पार करू शकत नाही.

शनी शिंगणापूर शिर्डी पासून जवळ असल्या मुळे इथे भाविक पर्यटक मोठ्या संख्यावर येतातं. भाविकांची श्रद्धा आहे कि साप चावल्या नंतर मूर्ती जवळ नेल्यास विष उतरते. अगदी जगावेगळं असणारे हे देवस्थान चमत्कारा मुळे जगप्रसीद्ध आहे.

दर शनिवारी आणि शनिजयंती च्या दिवशी शनी शिंगणापूर दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून भाविक येतात. इथे दररोज पहाटे ४ वाजता आणि सायंकाळी ८ वाजता आरती करण्यात येते. शनिजयंती च्या दिवशी प्रत्येक ब्राम्हणांना बोलवण्यात येते आणि रुद्र अभिषेक केला जातो.

शनी देवाच्या मूर्ती बद्दल सांगितले जाते कि १५० वर्षा पूर्वी एका पुरानात एकशिळा आली. ह्या शिळेला वेगळा आकार नव्हता. परंतु त्या रात्री शनी देवाने ऐका गावकऱ्याला दृष्टांत देऊन आपण माजी स्थापना करा असे सांगितले आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून त्याची पूजा प्रारंभ केली.

भाविक शनी देवाला तेल अर्पित करतात. भाविकांनी परिधान केलेले कपडे, पायथने इथेच सोडतात. अशी मान्यता आहे कि गरिबी पण सुटली जाते.शनी देवाची ह्या पिठाची पूजा केल्यानंतर झटपट फळ मिळते अशी मान्यता आहे.

<
शनी शिंगणापूर पासून जवळ विमानतळ शिर्डी इथे आहे रेल्वेने गेल्यास रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे. इथून शनी शिंगणापूर शिर्डी पासून जवळ च आहे तर पहिले शिर्डीला जात असाल तर शनी शिंगणापूर इथे नक्की जावे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *