नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे,
ओम शं शनैश्चराय नमः
शनी ग्रह हा नवग्रहांमध्ये एक क्रूर ग्रह मानला जातो. परंतु शनिदेव हे एक मानवी जीवनातले योग्य न्याय व कर्म करणारे आहेत.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि साडेसाती, महादशा, शनी दोष असतात त्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व त्या अडचणी कमी करण्यासाठी प्रचंड लोक अनेक विविध प्रकारे उपाय करत असतात.
जर असे संघर्ष आपल्या जीवनात येत असतील तर शनी प्रसन्न महामंत्र दिवसातून दोन वेळा जपावा.
शनि महामंत्र
ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥
त्याचबरोबर, हा देखील उपाय करावा, शक्यतो शनिवारी, संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरात तेलाचा दिवा लावून शनिचालीसाचा पाठ करावा. तसेच, शक्य असल्यास शनि मंदिरात, जर शनिमंदिर नसेल तर मारुती मंदिरात जाऊन तेल व काळे उडीद मूर्तीला अर्पित करावे.
तसेच शनि दोष कमी करण्यासाठी काळ्या वस्तू दान कराव्यात. असे करणे शुभ मानले जाते व शनिदेव प्रसन्न होतात.
शनिदेवाचे माहात्म्य खूप श्रेष्ठ आहे. म्हणून शनीदेवाला न्यायाचा देवता म्हटले जाते. असे मानले जाते शनिदेव सर्व कर्माचा हिशोब ठेवतात व त्यानुसार लाभ देतात.
शनिवार दिवस भगवान शनिदेवाला समर्पित असतो. जे लोक चांगले कर्म करतात, सत्य व न्यायाची साथ देतात त्यांच्यावर शनि देवाची कृपा राहते आणि या लोकांवर प्रसन्न होतात त्यांची मनोकामना पूर्ण करतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.