शनी देवाच्या कृपेने येत्या दीड महिन्यात होणार ‘या’ तीन राशींच्या उत्पन्नात भरभक्कम वाढ!

नमस्कार मित्रांनो,

न्यायाची देवता शनि जेव्हाही कोणत्याही राशीत संक्रमण करतो तेव्हा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे मागच्या महिना अखेरीस शनी देवांनी आपली हक्काची मकर रास सोडून आपली उप रास कुंभ यात प्रवेश केला आहे. हा मुक्काम 5 जुलै पर्यंत असेल त्यानंतर 13 जुलै रोजी, तो पुन्हा मकर राशीत प्रवेश करेल. यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी तो पूर्णपणे कुंभ राशीत येईल.

तोवर येत्या दीड महिन्यात कोणत्या राशींना या स्थित्यंतराचा आर्थिक लाभ होईल ते जाणून ते जाणून घ्या. शनीच्या संक्रमणाने मीन राशीवर साडेसाती सुरू झाली असून धनु राशीचे लोक साडेसातीपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. त्याचवेळेस कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार असून मकर राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे.

मिथुन, तूळ राशीतून शनीची परिक्रमा संपली आहे. आणि कर्क व वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव सुरू झाला आहे. त्या स्थित्यंतराचा लाभ कोणत्या तीन राशींना होणार आहे ते जाणून घेऊया.

मिथुन राशी – शनिदेव हे अष्टमेश आणि भाग्येश असल्याने या राशीत भाग्य स्थानात भ्रमण करत आहेत. यासोबतच या राशीतून शनिदेवाचा प्रभाव संपला आहे. कुंभ राशीत शनीचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान असेल.

आर्थिक स्थिती मजबूत राहील. जीवनात संघर्ष कमी होईल आणि यशाचे अनेक मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. आजवर रखडलेल्या सर्व योजना सुरळीत सुरू होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप फलदायी असेल.

शनीच्या या संक्रमणामुळे शत्रू पक्ष पराभूत होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. पोटाशी संबंधित आजार वाढू शकतात. त्यामुळे आवश्यक पथ्य पाळा.

तूळ राशी – या राशीमध्ये शनिदेव सुखाचा आणि पंचम स्थानाचा स्वामी असल्याने केवळ पंचम स्थानातूनच भ्रमण होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी शनीचा राशी बदल चांगला ठरू शकतो. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

तुम्ही काही कामासाठी किंवा सहलीसाठी कुटुंबासह परदेशात जाऊ शकता. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. सतर्क राहा. वैवाहिक जीवनात तणाव वाढू नये यासाठी सुसंवाद ठेवा.

धनु राशी – या राशीमध्ये शनि धन आणि शक्तीचा स्वामी आहे. गेल्याच महिन्यात शनिदेवाची साडेसातीही संपली आहे. त्यामुळे या राशीचे लोक एका नवीन अध्यायाला सुरुवात करतील. सर्व जुनी प्रलंबित कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीही मजबूत राहील.

नोकरी व्यवसायात प्रगतीची पूर्ण शक्यता आहे. मात्र खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. कारण जास्त खर्च वाढू शकतो. न्यायालयाशी संबंधित बाबी तुमच्या हिताच्या ठरतील. आईच्या आणि स्वतःच्या तब्येतीची तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक उत्पन्नाची नवनवी दालने तुमच्यासाठी खुली होत आहेत, संधीचे सोने करून घ्या.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *