कराल सेवा तर मिळेल मेवा

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्त हो नमस्कार,

पुण्यातील नंदराम सुंदरजी गवंडी यांना एक शारिरीक व्याधी होती. त्यांनी पुष्कळ डॉक्टर वैद्य केले.परंतु फरक पडत नव्हता.एके दिवशी अक्कलकोट मधील बाळकृष्ण जोशी बडोदयावरून परत येताना पुण्यात उतरले होते, आणि त्यावेळी नंदराम त्यांना भेटायला गेले. नंदराम यांना असलेल्या व्याधिबद्दल समजले असता श्री जोशी यांना स्वामीबद्दल यांना सांगितले.

स्वामिमहाराजाची महंती ऐकून नंदराम यांना व्याधी नक्की बरी होईल. असा विश्वास आला आणि त्यांनी श्री जोशीना नावाने मला अंगारा लावा. अशी विनंती केली, आणि बरे वाटल्यास नक्कीच अक्कलकोटला दर्शनास जाऊ असेही सांगितले, आणि त्यांनंतर श्री जोशी यांनी त्याप्रमाणे केले. अंगारा लावल्यांनतर श्री नंदराम यांना बरे वाटू लागले.झोपही चांगली येऊ लागली.

पुढे काही दिवसात स्वामी कृपेने त्यांची व्याधी बरी झाली.आता आपली बरी झाल्यांनंतर अक्कलकोट इथे येऊ असा त्यांनी संकल्प केला होता, आणि त्याप्रमाणे ठाकुरदास बुवा यांना बरोबर घेऊन ते अक्कलकोट इथे आले. अक्कलकोटमध्ये स्वामींची अजानुभवू मूर्ती बघून त्यांना आनंद झाला, आणि इथेच काही दिवस राहून स्वामींची सेवा करूया असा विचार करून त्यांनी श्री बाळकृष्ण जोशी यांच्या घरी मुक्काम केला.

इथे त्यानी सेवेकरी गोरगरीबांना अन्न,वस्त्र दक्षिणा दिली. स्वामी भक्त हो नंदराम हे सोमवारचे व्रत करत असे. सोमवारी ती नित्यानियमाने शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आणि येथील एका मुक्कामात नंदराम श्री जोशी यांना घेऊन मल्लिकार्जुन च्या दर्शनास आले. त्यावेळी स्वामी महाराजांची स्वारी मंदिराच्या बाहेरील ओट्यावर बसलेली होती.

नंदारा म आणि जोशी आले त्यांनी स्वामीना बघितले. आणि दोघांनी पण स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींचे दर्शन घेत असताना स्वामींनी त्यांच्या कडे बघितले. आणि बोलले अरे आम्ही शंकर नाही. जा त्या दगडाच्या देवाकडे..! स्वामींचे हे बोलणे ऐकून दोघांना काहीच समजले नाही. आणि लगेचच मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी गेले.

गाभाऱ्यात दर्शनासाठी गेले असता एक चमत्कार घडला. त्यांना शिवलिंग दिसले नाही. नंदरा म घाबरले. हा काय अजब प्रकार मंदिरातील शिवलिंग मला का दिसत नाही. माझ्याकडून काही चुकले का? असा पुन्हा विचार करत गाभाऱ्यात बघितले. तर मंदिराच्या शिवलिंगाच्या ठिकाणी स्वामी बसलेले दिसले. बाहेर स्वामी आणि गाभाऱ्यात सुद्धा स्वामी आश्चर्याने थक्क झाले.

स्वामी महाराज हे प्रत्यक्ष शिव शंकर आहेत. ही त्यांना खून पटली. आणि त्यानंतर त्यांच्या हृदयात अनन्य भक्तीची भावना जागृत होऊन अक्षरशः त्यांनी स्वामी चरणी लोटांगण घातले. जयघोषात स्वामींचा जयघोष केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय! आजच्या लीलेतुन स्वामी महाराज आपल्या मनाला खूप छान समज देतात.

आजच्या लीले त वर्णन केल्या प्रमाणे पुण्यात राहणारे नंदराम यांची व्याधी ही मात्र स्वामींच्या नावाने लावलेल्या अंगाऱ्याने बरी झाली. यावरून श्री नंदराम यांची विश्वासाची दृढता किती जबरदस्त होती. ही समज आपल्याला मिळत आहे. स्वामी भक्त हो आपल्या पूर्वजांनी अँगारे, धुपारे व इतर काही तत्सम गोष्टी आपल्याला दिल्या त्यामागील मुख्य उद्देश हा होता.

की आपल्यातील सुक्त असलेला विश्वास प्रकट व्हावा. कारण हा विश्वास आणि प्रेम या दोन गोष्टी अशा आहेत की त्याचे रूपांतरण चमत्कारात होते. परंतु पुढे एक गडबड झाली. या सर्वा मागील समज लुप्त झाल्याने विश्वास प्रकट होण्याऐवजी भीतीच जास्त झाली. आणि या भीतीचे रुपांतर अज्ञानात झाले.

आणि हे अज्ञान दूर करण्याचे काम स्वामींनी अक्कलकोट नगरीत प्रत्यक्ष कृतीद्वारे विविध लीला करून केले बघा नंदराम हे भाविक होते सोमवार व्रत आणि शिव शंभो चे दर्शन हा त्यांचा नित्य क्रम अत्यंत काटेकोर होता. परंतु शिव ही मुळ मौन चैतन्य अवस्था आहे. शिव ही समाधी अवस्था आहे. शिव ही परमानंद अवस्था आहे. आणि ही परम मौन अवस्था चराचरात आहे.

ही समज त्यांना मिळणे गरजेचे होते. आणि म्हणूनच जेव्हा ते स्वामींच्या दर्शनासाठी आले. तेव्हा त्यांना आम्ही शंकर नाही. जा त्या दगडाच्या देवाकडे असे उरपटे बोलून फक्त दगडाचे शिवलिंग म्हणजे शिवशंकर होय. या अज्ञानातून बाहेर ये. शिवलिंग तर माझ्या विराट स्वरूपाचे प्रतीकात्मक रूप आहे. मीच मुळ परम चैतन्य अवस्था आहे. आणि ह्या परम चैतन्य अवस्थेतून हे विश्व प्रगट होत आहे. विस्तारते आहे.

आणि आता तुझ्या समोर शरीर धारण करून बसलेलो आहे. हे सांगण्याचा प्रयत्न स्वामींनी त्यांना केला. परंतु त्यांना काही समजले नाही. आणि ते मंदिरात गेले आणि मंदिरात गेले तेव्हा शिवलिंगाच्या ठिकाणी आणि बाहेर ओट्यावर दर्शन देऊन आधी स्पष्टपणे समज दिली. स्वामी भक्त हो म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी या लीलेतून बोध घेताना आज आपण कोणत्याही धर्माचे असाल.

जात पंथाचे असाल आपल्या रूढी परंपरा प्रमाणे जी पण काही व्रत वैकल्य, उपवास वगैरे कर्मकांड करत असाल. त्यांना चांगले आणि वाईट असे लेबल न लावता ईश्वर एकच आहे. आणि तो चराचरात आहे. आणि आपल्या मनात असलेला त्याच्या बद्दल असलेला सुप्त विश्वास प्रेम जागृत करण्यासाठी स्वामींनी ही लीला केली आहे.

ही त्यामागील मुळ समज प्रगल्भ करायची आहे. आणि या सर्व गोष्टींचा उपयोग स्वामींची भक्ती, स्वामिंप्रती असलेला विश्वास दृढ करण्यासाठी करायचा आहे. आणि आनंदी जीवनाची अभिव्यतीं करायची आहे. चला तर मग आज आपण स्वामीना प्रार्थना करुया हे समर्था सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांड रुपी वडाच्या झाडाचे मूळ शिव स्वरूप तुम्हीच आहात.

तुम्हीच माझा भोळा शंकर आहात. तुम्हीच माझी माता पार्वती आहात तुमचे अस्तित्व चराचरात आहे. हे आई आज आम्हा बालकांना ही समज दिली तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद स्वामी ! तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद !

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *