नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुम्ही दररोज अंघोळ करताना हे तीन शब्द नक्की बोला. घरात लहान मुले असतील तर लहान मुलांच्या वतीने तुम्ही हे शब्द बोला आणि मगच अंघोळ करा.
तुम्हाला असे दिसून येईल की तुमच्या आयुष्यात जी संकट आहेत काही रो ग, व्याधी आहेत किंवा एखादी व्यक्ती विना कारण तुमची शत्रू बनू पाहत असेल या सर्वां पासून तुम्हाला मुक्ती मिळेल.
मित्रांनो रो ग, संकटे, शत्रू हे अगदी पळून जातील. हा एक मंत्र आहे जो तुम्ही दररोज नित्य नियमाने अंघोळ करताना उच्चारायचा आहे. हा देवाधिदेव भगवान शंकरांचा महादेवांचा मंत्र आहे.
ज्या व्यक्तींवर भगवान शंकर प्रसन्न होतात ज्या व्यक्तींना त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांचे अगदी काळ सुद्धा काही वाईट करू शकत नाही. शिवशंकरांचे मंत्र हे अटळ, अंतिम सत्य असतात. कोणत्याही शारीरिक व्याधी पासून मुक्ती हवी असेल तर आपण या मंत्र उच्चार नक्की करावा.
मित्रांनो महाकालेश्वर च्या दर्शनाने अकाल मृ त्यूचे भय राहत नाही. हा मंत्र म्हणजे महामृ त्युंजय मंत्र. आपल्या पैकी बऱ्याच जणांनी हा मंत्र आधी ऐकला असेलच. मात्र त्याचा वापर किंवा विधी हे बर्याच जणांना माहित नसते.
या मंत्राचा जितक्या जास्त वेळा तुम्ही उच्चार कराल तितकाच काळ हा तुमच्यापासून दूर जाईल. सर्व बाधा व्याधींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल.
अंघोळीला गेल्यावर एका मगात पाणी घेऊन उजव्या हाताची करंगळी आहे ती करंगळी त्या पाण्यात बुडवून पुढील मंत्र 11 वेळा म्हणावा.
ॐ हौं जूं सः
हा मंत्रपठण झाल्यावर ते पाणी आपल्या डोक्यावर टाकून आपण स्नानाला सुरुवात करायची आहे. अगदी दररोज हे पाणी डोक्यावर घेतले नाही तरी चालेल परंतु अंगावर टाकून स्नान करायचे आहे. लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे पालक हा मंत्र जप करून ते पाणी त्या लहान बाळाच्या अंगावर टाकून स्नान घालू शकतात.
मित्रांनो हा मंत्र आपल्या रक्षणाचे काम करतो. एक रक्षा कवच आपल्या शरीराभोवती निर्माण करतो. शत्रु भय नष्ट होते. शत्रूंचा चांगल्याप्रकारे मुकाबला करू शकाल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.