नमस्कार मित्रांनो,
जर तुमच्या जीवनात गरिबी आहे, दारिद्रय आहे, तुम्ही जेवढी मेहनत करता त्या मानाने तुमच्याकडे पैसा येत नसेल, तर स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जाप करावा.
मित्रांनो तुम्ही या मंत्राचा जाप किमान एक वेळा, अकरा वेळा, एकवीस वेळा, एकावन्न वेळा, एकशे एक वेळा, एकशे आठ वेळा जितक्या वेळा तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा तुम्हाला या मंत्राचा जाप करायचा आहे.
मित्रांनो या मंत्रामध्ये इतकी ताकत आहे की तुमच्या घरातून अलक्ष्मी काढता पाय घेईल. अलक्ष्मी ही माता लक्ष्मी ची मोठी बहीण समजली जाते. अलक्ष्मी ला अवदसा असेही म्हटले जाते.
ज्या घरात अलक्ष्मी म्हणजेच अवदसा असते त्या घरात पैसा कधीच येत नाही. आला तरी टिकत नाही. कारण प्रत्यक्ष माता लक्ष्मी त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाही.
स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जर तुम्ही रात्री झोपताना जप केला तर अवदसा म्हणजेच अलक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल, आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी चा वास निर्माण होईल.
कोणता आहे हा मंत्र
मित्रांनो हा मंत्र आहे ओम नमो विष्णवे नमः
तुम्हाला मंत्र कोणता आहे ते समजलं. पण आता लगेच या मंत्राचा जप करायला सुरू करू नका. कारण जप करण्या आधी या मंत्राला आपल्याला सिद्ध करावं लागेल. त्यानंतर तुम्ही रोज रात्री झोपताना फक्त एकदा जरी या मंत्राचा जप केलात तरी याचे फायदे आपल्याला मिळतील.
हा मंत्र सिद्ध कसा करणार
तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मंत्र सिद्ध कसा करणार. मित्रांनो आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर देवघरा समोर बसून एक हजार वेळा या मंत्राचा जप करा.
घरातील सर्व सदस्यांनी मिळून या मंत्राचा जप केला तरी चालेल. पण सर्वांना शक्य नसेल तर घरातील फक्त कर्त्या पुरुषाने या मंत्राचा जप केला तरी चालेल. पण लक्षात ठेवा 1000 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. इतर सदस्यांनी फक्त 108 वेळा जप करावा. असं केल्याने हा मंत्र सिद्ध होईल.
एकदा मंत्र सिद्ध झाल्यानंतर रोज रात्री झोपताना ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप करा. जप करून झाल्यानंतर एक ग्लास भर पाणी प्या. आणि स्वामी समर्थांचे स्म रण करत झोपी जा.
महत्वाची गोष्ट म्हणजे जो पर्यंत आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य दूर होत नाही तो तोपर्यंत दर रोज नित्य नियमाने या मंत्राचा जप करायचा आहे. अर्धवट सोडू नका.
ओम विष्णवे नमः हा स्वामींचा अत्यंत प्रिय असा मंत्र आहे. या मंत्रामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याची ताकत आहे. भगवान श्री हरी श्री विष्णू हे या जगाचे पालन हार आहेत. आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या नामाचा जप होतो त्या ठिकाणी भगवान विष्णूंची पत्नी म्हणजेच माता लक्ष्मी नक्की अवतरते.
भगवान विष्णूंना प्रसन्न केल्याने माता लक्ष्मी चा वास त्या घरात निर्माण होतो. या मंत्रासोबतच एक छोटा उपा य केला तर या मंत्राची ताकत खूप मोठ्या प्रमाणात वाढते.
काय आहे तो उपा य
या मंत्राचा जप करताना तुमच्या कडून काही चुका होऊ शकतात. ज्या ज्या वेळी तुमच्या कडून काही चुका घडतील त्या वेळी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्या त्या वेळी तुम्ही विष्णू सहस्त्र नामाचा पाठ सुद्धा करावा. श्री विष्णू सहस्त्र नामाचा पाठ आपण पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही पवि त्र तिथींना करू शकतो.
धन प्राप्ती साठी, द्रव्य प्राप्ती साठी हा एक अत्यंत सोपा असा उपा य आहे. मित्रांनो तुमची स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल, तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असाल तर तो मंत्र सुद्धा तुम्ही सिद्ध करून घ्या.
ज्या प्रकारे ओम विष्णवे नमः हा मंत्र आपण सिद्ध करण्याची माहिती घेतली तशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ हा मंत्र सुद्धा सिद्ध करून घ्या.
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्याची सर्वात चांगली वेळ ही सकाळी देवपूजा झाल्या नंतर देव घरासमोर बसून तुम्ही या मंत्राचा जप करू शकता.
या दोन मंत्राचा जप करून तुम्ही स्वामी समर्थ आणि श्री भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून पैशाची प्राप्ती, धनाची प्राप्ती करून घेऊ शकता.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.