पत्नीवर संशय घेणाऱ्या पुरुषांनो…संशय घेण्याआधी हे बघा एकदा.

नमस्कार मित्रानो

मित्रानो संशय घेतल्याने अनेक लोकांची आयुष्य उध्वस्त झालेली आहे. अनेक पुरुष आपल्या बायकोवर, आपल्या प्रेमीकेवर संशय घेतात. त्यांचं म्हणणं असतं की परिस्थितीच अशी आहे, तिचं वागणंच अस आहे, कि नक्कीच तीच कुठेतरी अफेयर चालू आहे.

मित्रांनो जस आधीही सांगितलं आहे की, ह्या संशयाच्या नादात अनेकांनी आपलं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेल आहे. बरेच लोकं बरबाद झालेले आहेत. केस स्टडी केल्यास अस दिसून येईल की, दोन प्रकारच्या स्त्रिया असतात.

एक, अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या आणि कधीच तुम्हाला धोका न देणाऱ्या अशा चारित्र्यवान, पतीव्रता स्त्रिया. तर दुसऱ्या प्रकारच्या स्त्रीया अशा असतात, त्यांना आपण चारित्र्यसंपन्न म्हणू शकत नाही. अशा स्त्रियांचा पाय वारंवार घसरतो.

मित्रांनो, तुमची पत्नी तुम्हाला धोका देत आहे, याबद्दल तुम्ही खात्रीने सांगू शकता का? जर सांगू शकत असाल तर अशा स्त्री सोबत नात आताच तोडा. मात्र जर तुम्हाला याची शंभर टक्के खात्री नसेल, तर मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या पतीवर संशय व्यक्त करू नका.

कारण कोणतीही खात्री नसताना, कोणताही सबळ पुरावा नसताना, केवळ परिस्थिती मुळे आपल्या पत्नीवर संशय घेऊ नका. वारंवार अशा प्रकारे घेतला जाणारा संशय, चांगल्या व्यक्तीला सुद्धा वाममार्गाला लावतो.

चांगली व्यक्ती सुद्धा वारंवार संशय घेतल्याने चुकीच्या गोष्टी करू लागते. अनेकांना अशी भीती वाटते की, माझी पत्नी मला सोडून जाईल, दुसऱ्या सोबत निघून जाईल, तर मग माझं काय होईल ?

मित्रांनो, जास्तीत जास्त काय होईल ? तर आपण इतरांकडे ही पाहा. जी जाणार आहे ती जाणारच आहे, तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न करा, जिला जायचं आहे, ती जाणारच आहे.

त्यामुळे उगीचच संशय घेऊन, जी जाणारच नाहीये, जी आपल्या बरोबर प्रामाणिक वागते, तिच्यावर उगीचच संशय घेऊन, तुमचं आणि तुमच्या बायकोचं आयुष्य उध्वस्त करू नका.

याठिकाणी अनेकांना असाही प्रश्न पडेल की, जे होत आहे ते फक्त पाहत राहावं का? परंतु हे पाहत राहण्यापूर्वी काही प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, की तुम्ही तुमच्या पत्नीला आवश्यक असणारा वेळ देता का?

तिची स्वप्न, तिच्या महत्त्वाकांक्षा तुम्ही पूर्ण करता का? तिला योग्य ते स्वातंत्र्य तुम्ही देता का? योग्य याचा अर्थ, स्वातंत्र्य हे द्यायलाच हवं, मात्र स्वातंत्र्याच रूपांतर स्वैराचारात होता कामा नये.

मात्र जेव्हा आपण आपल्या पत्नीला घरातच कैद करतो, जसे की तिने कुठेही बाहेर जायचं नाही, तिने कोणत्याही परपुरूषाशी बोलायचं नाही. अशी बंधन जेव्हा एखाद्या व्यक्तीवर लादण्यात येतात, तेव्हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व खुंटत, तिचा व्यक्तित्व विकास होत नाही.

अशी स्त्री तुम्हाला सुख देऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या पत्नीला स्वातंत्र्य द्या, तिचा व्यक्तित्व विकास होऊ द्या. तुमच्या सुखी संसारामध्ये अनेकजण विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतात, हे लक्षात राहू द्या.

असे लोक मुद्दाम तुमच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करतच असतात, याकडे ही तुम्ही लक्ष द्यायला हवं.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *