नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो श्री गणरायाच संकटनाशन स्तोत्र जर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकलं. तर आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नाश होतो.
आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात आणि परिणामी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं. मित्रांनो श्री गणरायाचं हे जे संकटनाशन स्तोत्र आहे,
हे आम्ही आपल्या माहितीमध्ये देणार आहोत. याच्या केवळ ऐकणे किंवा म्हणण्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होतील. सुख आणि समाधान आपल्या जीवनामध्ये येईल.
आणि जोडीला येईल माता लक्ष्मी चा आशीर्वाद. माता लक्ष्मी आपल्यासोबत धन व संपत्ती सदैव नेहमीकरिता आपल्या घरात घेऊन येईल.
धनधान्याने, पैशाने घर हे नेहमी भरलेले राहील. तर मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी, दररोज आपण हे स्तोत्र रात्री झोपण्याआधी ऐकावं किंवा म्हणाव.
कमीत कमी 108 दिवस नित्यनियमाने आपण हे स्तोत्र ऐकायला किंवा म्हणायला हवं.
मित्रांनो लक्षात ठेवा, हे स्तोत्र जे आपण 108 दिवस पूर्ण श्रद्धा पूर्वक आणि भक्ती भावाने आपण एका किंवा म्हणा आणि श्री गणेशा वरती, विघ्नहर्ता वरती, देवा वरती, प्रथमेशावरती पूर्ण श्रद्धा असू द्या.
त्याच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. मित्रानो हे स्तोत्र अस आहे आपल्यास झोपण्यापूर्वी ऐकायचं किंवा म्हणायचं आहे.
गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||
देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||
जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||
तर मित्रांनो असे हे स्तोत्र आपण नित्यनियमाने एकशे आठ दिवस झोपण्यापूर्वी ऐकले किंवा म्हटलं आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
आपल्या मार्गातील संकट दूर होतील. आणि मित्रांनो खरं पाहता हे स्तोत्र पण सातत्याने सहा महिने तरी ऐका किंवा म्हणा. झोपण्यापूर्वी हा अगदी दोन मिनिटांचा स्तोत्र आहे.
तर या स्तोत्राचा जप आपण नेहमी करत चला आणि जर वर्षभर आपण या स्तोत्राचा नित्यनेमाने जप केलात. तर आपल्याला याची अनंत फळे नक्कीच मिळतील.
अगदी आयुष्यभरासाठी तुम्ही सुखी आणि समाधानी तसेच पैशांनी आणि धनधान्याने, ऐश्वर्याने संपन्न व्हाल. तर मित्रांनो अशा प्रकारे श्री गणपतीच संकटनाशन स्तोत्र होतं. केवळ आपल्यासाठी. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.