. नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ. सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपला नवरा विष्णू बरोबर येते. स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होईल ते सहन करायची तयारी ठेव. सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती.
पण तयारी ठेव या ताकीदिने तिचा थर थरकम पसरतो. त्या गोष्टीमुळे फार चिंतित राहायची. सुमन चा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचं खाली पोत देतात. शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून स्वीकार करतो .
सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरुन पडते तेव्हा वैद्य असे सांगतात की गर्भातील शिशु चे निधन झाले आहे असे सांगतात आणि सुमन कधी ही आई होणार नाही असे सांगतात. हे ऐकून सुमन फार खचून जाते.
तिकडे शिवाच्या शेतात भरपूर पाऊस पडल्याने शिवाचे सर्व पिक खराब होते व शिवाचे स्वप्न धुळीस मिळतात. त्यावर देशोधडीस जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करण्यासाठी नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बाळ अप्पाना वेळेवर पाठवून सुमन ला वाचवतात.
स्वामी आणि बाळप्पा मध्ये संवाद होतो स्वामी म्हणतात. बाळ्या आपले भक्त असले तरी त्यांना स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावाच लागतो. बाळाप्पा म्हणतो यावर स्वामी काही उपाय नाही का. स्वामी म्हणतात एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्याप्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही.
सद्गुरु त्या भोगाला मागेपुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावे च लागतात. म्हणूनच आम्ही नाम स्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहते आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायचे असते.
भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का कौन्स, श्रावण, हिरण्यकश्यप सबको दिया फिर भी वो नही माने तब उनका सहार किया. बाळाप्पा म्हणतो मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्यांनी काय करावे. स्वामी म्हणतात अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो.
आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो. जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हा तो देवाची कास सोडतो आणि म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखीन भयानक संकट आले असते.
शेत वाया गेल्यामुळे शिवा पूर्णतः खचलेला असतो. त्याची बायको त्याला सांत्वन करते. त्याच्या मनात एक विचार येतो स्वामींनी आपल्याला एक खाली पोत देऊन एक खूण केली होती. तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य यायला निघतो पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की,
जसा तू खंबीर होऊन सावरला तसंच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवं. तिला जाऊन काही बोध कर पण तिकडे सुमन वेड्या सारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तेथे येऊन तिला अडवतात.
स्वामी तिथे प्रगट होतात आणि म्हणतात सुमन मरण सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं. अरे देवाने ठरवलेली वेळ नसली तर काही केलंत तरी सुटका होणार नाही. मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू ,नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते.
सुमन म्हणते संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू. शिवा ची बायको शारदा आपल्या नणंद ला आपलं बाळ देते. शारदा म्हणते हे माझं बाळ घे याला तू आपल्या मुलासारखं वाढव याची तुला जास्त गरज आहे. मला दुसरे अपत्य होईल सुमनला स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते.
सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. मित्रांनो तात्पर्य असं स्वामींवर विश्वास, निष्ठा असणं फार महत्त्वाचं. प्रारब्ध म्हणजेच आपले नशीब हे आपल्याला भोगावेच लागते. स्वामी प्रारब्ध भोगायला पुढेमागे करू शकतात. भक्ती सेवा अत्यंत महत्वाची नामस्मरण महत्त्वाचे. आपल्या भक्तीमुळे
येणारे संकट, दुःख जे इतक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ते आपल्या भक्तीमुळे तितक्या भयानक स्वरूपात येत नाही. आपण हे विसरता कामा नये. सुख असो वा दुःख या दोन्ही वेळेस आपण आपल्या स्वामीभक्तीवर आपण ठाम असावे.
आणि दुःखातच स्वामींची आठवण नको आणि मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतरही नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा श्री स्वामी समर्थ.. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.