संकल्प शक्ती, मनावर ताबा.

अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय

अक्कलकोट दरबारात सुंदरा बाई अंत्यत मनमानी वृत्तीने वागत होती. पैशाच्या लोभाने तिला पूर्णपणे आंधळे केले होते नशिबाने आपण प्ररब्रह्मच्या दरबारात आहोत आणि प्ररब्रह्मच्या सेवेत आहोत ह्या परमभाग्याचा विसर पडला होता. ह्यातूनच स्वामींचे अनेक हाल होत असे त्या दिवशी दत्तजयंती होती पहाटे पासून अनेक भाविकांची गर्दीच गर्दी सुरू झाली होती म्हणून स्वामींना पहाटे 4 वाजता स्नान घालून भोजन घातले होते इतक्या पहाटे एक भाविक गृहस्थ स्वामींनी आपल्या नैवद्य ग्रहण करावा ह्या इच्छेने पांच्पक्कवांनाचे ताट घेऊन दरबारात आला.

परंतु स्वामींना आचमनाची आणि हा नैवैद्य येण्याची वेळ एकच झाली आणि म्हणून त्या भाविकाला हिरमुसल्या सारखे झाले. आणि म्हणून त्याने सुंदरा बाईला स्वामींना कसे ही करून एक तरी घास खाऊ घाला. ही अत्यंत तळमळीची विनंती केली आणि ह्या बद्दल त्याने सुंदराबाईला दोन रुपये देण्याचे कबूल केले. दोन रुपये देणार म्हणून सुंदरा बाई तयार झाली. परंतु स्वामींचे जेवण आता झाले आहे.

दुपारी जेवायला घालू अस सुंदराबाईंनी त्यांना सांगितले आणि ताट आपल्याजवळ घेतले. भक्तहो दत्तजयंतीचा दिवस होता. त्यामुळे दिवसभर भाविकांची गर्दी होती आणि ह्या गर्दीमुळे स्वामींनी दुपारचे जेवण सुद्धा केले नाही. आता रात्रीचे नऊ वाजले तरी अजूनही गर्दीच होती. जवळजवळ रात्रीचे दहा वाजेपर्यंत गर्दी होती. त्यानंतर गर्दी कमी झाल्यावर बाळप्पानी स्वामींच्या जेवणासाठी ची तयारी केली. इतक्यात सुंदरा बाई बोलली अहो बाळप्पा ताट वाढलेले आहे.

नवीन स्वयंपाक नका करू !! सुंदराबाईंची मर्जी असल्यामुळे बाळप्पानी स्वयंपाक न बनवता पहाटे आलेले शिळे जेवणाचे ताट स्वामींना दिले. आणि स्वामींनी सुद्धा ते मुकाट्याने खाल्ले. परंतु नैवैद्य खात असताना स्वामी त्रिवार बोलले आता काय.. नवाब झाले..!! स्वामींचे हे वाक्य बाळप्पांच्या अंतकरणाला भिडले. बाळप्पांना तीव्र दुःख झाले आणि बाळप्पा स्वामींचे चरण आपल्या पोटाशी पकडुन ढसाढसा रडू लागले. त्यांनी स्वामींची माफी मागितली.

आणि ह्या पुढे स्वामींची कोणतीही अव्यवस्था होणार नाही असा त्यांनी संकल्पच केला आणि मग त्यानंतर बाळप्पांनी सुंदराबाईंच्या सांगण्यावरून कधीही स्वामींना शिळे अन्न खाऊ घालण्याचा प्रसंग येऊ दिला नाही. आजच्या लीलेतूंन श्री स्वामी महाराज आपल्या अनन्य भक्त असलेल्या मनाला शिकवण देत सांगत आहेत की जर आपली संकल्प शक्ती कमकुवत असेल तर गुरुसेवा गुरुभक्ती करत असताना माया कशी मागच्या दारातून येते व आपल्या मनावर पगडा बसवते.

आणि आपल्याकडून तिचेच कार्य करवून घेते. आणि मग अशा वेळेला आपण कसे हतबल होतो. आपण काहीच करू शकत नाही. ह्या आपल्या मनातील अवस्थेचे दर्शन करून देत आहेत. बघा ह्या लिलेत बाळप्पा हे स्वामींचे अनन्य भक्त होते. परंतु मायारूपी सुंदराबाईच्या अधीन ते गेले आणि त्यांची इच्छा नसताना सुद्धा स्वामींना त्यांनी शिळे अन्न खाऊ घालावे लागले.

आता काय नवाब झाले मोठे अधिकार गाजवणारे झाले असे बोलून स्वामींनी त्यांना तुझ्या मनावर ताबा मिळवला आहे. तू मायेचा गुलाम झाला असून तू मायेच्या आहारी गेला आहेस. माया तुला चालवते आहे. ही आठवण करून दिली आणि स्वामिसेवेत संकल्पशक्ती दृढ करण्याची समज दिली आणि बाळप्पानी सुध्दा हे स्वामी संकेत ओळखले. आणि त्याप्रमाणे आचरण करून भविष्यात कधीही स्वामींची अव्यवस्था होऊ दिली नाही.

ह्या लीलेत जे घडले ते भविष्यात पण तुम्हा आम्हा सोबत घडते आहे. स्वामीभक्ती करता करता स्वामींचे विचार स्वामींची शिकवण स्वामींबोध आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक कर्म स्वामीं सेवा करत असताना कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात. की स्वामींच्या विचारांची स्वामिबोधांची आपल्याकडून पायमल्ली होत असते. अशा वेळेला स्वामी विचाराऐवजी मायेच्या विचारांचा आपल्यावर पगडा असतो.

<
आणि जसे बाळप्पांच्या बाबतीत घडले तसेच आपल्याकडून चुकीचे घडत आहे हे समजत असताना सुद्धा आपण त्याला थांबवू शकत नाही. आपण हतबल होतो अशा वेळेला ह्या लीलेतून बोध घेत आपण खुशाल समजायचे की स्वामी आपल्याला बोध देत आहेत की काय आता नवाब झालेत म्हणजेच तुझ्यातील मायारुपी मनाने अनन्य भक्त असलेल्या मनाने विजय मिळवला आहे. आता तुझी संकल्पशक्ती वाढव आचरण शक्ती वाढव.

असा हुकूम स्वामी महाराज आपल्याला देत आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आपले कार्य करायचे आहे. ह्याचे उदाहरण घेता तुम्ही दुकानदार आहात. दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक स्वामींचे रूप आहे. ही समज मनात ठेवून आपण आपले कर्म स्वामी सेवा ह्या भावनेनं करत असतो आणि दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सेवा देत असतात. परंतु हे करत असताना कधी कधी दुकानात अशा काही वस्तू असतात की त्या निकृष्ट दर्ज्याच्या असतात.

आणि त्यात जास्त नफा असल्याने आपण त्या वस्तू विकत असतो खरतर अशा वेळेला आपल्यातील आपल मन सांगत असते की हे चुकीचं आहे स्वामींना भूषणावह नाही परंतु आपल्यातली दुसरे मायेने झपाटलेले मन सांगत असते की व्यवसायात हे चालते. व्यवसायात लबाडी करावीच लागते वगैरे तेव्हा आपले अनन्य भक्तीचे मन हरते आणि दुसरे जास्त नफा मिळवण्याच्या हव्यास पोटी मायेने झपाटलेले मन जिंकते कारण आपल्याकडे तेव्हा संकल्प शक्ती कमी असते.

खरतर जर आपल्या दुकानात निकृष्ट दर्जाची एखादी वस्तू आली असेल तर आपण ती डीस्ट्रीबुटरला सुद्धा परत करू शकतो व आपल्या दुकानात उत्तम प्रकारच्या वस्तू विकायच्या असा संकल्प करून दुकानाचा उत्तम ब्रँड तयार करू शकतो. परंतु नफ्याच्या हव्यासापोटी आपल्यातील अनन्य भक्त असलेल्या मनाचा पराभव होतो. पर्यायाने अदृश्यत का होईना एका पायरीने अधोगती होते. असो हे मात्र एक उदाहरण होते असे आपल्या दैनंदिन जीवनात सतत घडत असते आपल्याला आपल्या स्वतःच्या मनावर काम करायचे आहे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया

हे समर्था!! तुम्ही माझे गुरू आहात.. तुमच्या लीलांमधून.. जीवनातील विविध प्रसंगातून तुम्ही मला सतत शिकवत आहात.. हे आई!! तुम्ही जे शिकवले .. ते आचरणात आणण्याची शक्ती द्या.. तुमची अनन्य भक्ती द्या.. संकल्प शक्ती द्या.. आणि तुम्हाला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिवक्त्यी करवून घ्या.!

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह
श्री सचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *