नमस्कार मित्रांनो,
दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा आवश्य लावावा. मग तो तुपाचा असेल किंवा तेलाचा असेल. त्याने काही फरक पडत नाही. पण दिवेलागणीच्या वेळी संध्याकाळी घरात दिवा लावल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते.
घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. संध्याकाळची वेळ हि घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते व या वेळेत देवघरात दिवा लावलेला नसेल तर लक्ष्मी घरात येत नाही व आपल्याला धनाची कमतरता जाणवायला लागते.
संध्याकाळची वेळ ही अशी असते जेव्हा बाहेरील सर्व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. जर त्यावेळी आपल्या घरात दिवा लावलेला नसेल तर ती ऊर्जा आपला प्रभाव दाखवायला लागते व घरातील सर्व सकारात्मक ऊर्जा निघून जाते.
सूर्यास्त झाल्यानंतर निगेटिव्ह ऊर्जा खूप प्रबल होते. हे सर्व नेगेटिव्ह ऊर्जा नष्ट करण्यासाठी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या पूर्व दिशेला तुपाचा किंवा तेलाचा दिवा जरूर लावावा.
जर तुम्हाला नेहमी पैशाची अडचण येत असेल, धनाची कमतरता जाणवत असेल, पैशांची आवक कमी झाली असेल तर दररोज घरातील उत्तर दिशेला दिवा लावावा. यामुळे तुमच्या पैशा संबंधीच्या सर्व समस्या दूर होतील. पण हा दिवा शुद्ध तुपाचा लावा.
ज्या व्यक्तीला जास्त अडचण असेल, खूप संकटे असतील त्याच व्यक्तीने संध्याकाळी दिवा लावला तर त्यांना त्याचा खूप फायदा होतो. त्यांची अडचणी व संकटे लवकरात लवकर दूर होतात.
जर अंधार पडला असेल आणि आपण घरात लाईट लावून प्रकाश केला आहे परंतु देवघरात दिवा लावला नसेल आणि देव अंधारात असतील तर ते आपल्या जीवनात आनंद व प्रकाश कसा आणतील?
संध्याकाळी जर देवघरात दिवा लावलेला असेल व अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळत असेल तर घरातील वातावरण प्रसन्न होते आणि या प्रसन्न वातावरणात केलेले कोणतेही काम आनंद व सुख देते. अशा वातावरणात केलेले कोणतेही काम यशस्वी होते.
संध्याकाळी दोन कापराच्या वड्या ही घरात लावल्यास घरातील सर्व सूक्ष्मजीव व किटाणू यांचा नाश होतो. यामुळे आपल्या आरोग्यावरही याचा वाईट प्रभाव पडत नाही. तसेच संध्याकाळी बाहेर तुळशी जवळ एक दिवा अवश्य लावावा.
यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता तर येईलच पण बाहेर अंधार पडला की बारीक-बारीक कीटक उजेडाकडे पळतात म्हणजे घरात प्रकाश दिसला की त्याकडे धाव घेतात. परंतु जर बाहेर तुळशीला दिवा लावलेला असेल तर त्या उजेडाकडे कीटक आकर्षित होतात व तेथेच नष्ट होतात आणि घरात येत नाहीत.
अशाप्रकारे संध्याकाळी बाहेर तुळशीला दिवा लावल्याने आपल्या घराचे या कीटकांपासून ही संरक्षण होते. अशाप्रकारे संध्याकाळी घरात दिवा लावावा आणि आपले घर निगेटिव्ह ऊर्जेपासून दूर ठेवून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.