संपूर्ण घर कसे असावे?…ज्यामुळे घर आनंदी आणि सुखी होईल..

नमस्कार मंडळी,

वास्तू शास्त्रानुसार घर कसे असावे. वास्तू शास्त्र हे पंच तत्वावर आधारित आहे. अग्नी, आकाश, वायू, पृथ्वी, जल ही पाच तत्व आहेत. वास्तू शास्त्रानुसार घर बांधले तर सुख, समाधान, आरोग्य, समृध्दी लाभते.

सुरुवात करुया देवघरपासुन जे आपल्याला संकटांपासून दूर ठेवतो. आपले रक्षण करतो. आपल्या वास्तू मध्ये देवघर ईशान्य दिशेला असावे. उत्तर आणि पूर्व या मधील दिशा आहे.

ईशान्य म्हणजे ईश्वराचे स्थान. भगवान शंकराचे जा अधिपत्य मानले गेलेले आहे ते म्हणजे ईशान्य स्थान. पूजा करताना आपले तोंड हे नेहमी पूर्वेला असावे.

ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ असावी. तिथे कचरा नसावा. ईशान्य दिशा हे पवित्र स्थान आहे. स्वयंपाक घर हे घराचा आत्मा म्हटले गेले आहे. स्वयंपाक घर हे नेहमी आग्नेय दिशेला असावे.

पूर्व आणि दक्षिण याच्या मधील दिशा म्हणजे आग्नेय दिशा. सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाक घरात धूप किंवा अगरबत्ती लावू शकतो. झोपण्यापूर्वी स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ असावे.

खरकटे नसावे. शेगडी जवळ कधीही पाणी ठेऊ नये. हे दोन्ही परस्पर विपरीत तत्व आहेत. स्वयंपाक घरात आपले तोंड पूर्व दिशेला असेल याची काळजी घ्यावी.

बेडरूम हे मुख्य व्यक्तीचे नेहमी नैऋत्य दिशेला असावे. बेडरूम हे वायव्य, पश्चिम, उत्तर दिशेला असावे. वास्तू शास्त्रानुसार शौचालय नेहमी वास्तूच्या वायव्य दिशेस असावे. शौचालयाचे दर हे पूर्व किंवा उत्तर दिशेला उघडणारे असावे.

लहान मुलांचे तोंड हे नेहमी अध्यास करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. मयत व्यक्तींचा फोटो नेहमी उत्तर दिशेच्या भिंतीवर असावा. घरामध्ये काटेरी झुडपे (गुलाब सोडून) नसावे.

<
झोपताना आपले डोके नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे. उत्तरेकडे पाय करून झोपावे. तिजोरीची दिशा नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीशेजारी असावी. तिजोरीच्या दर नेहमी उत्तरेकडे उघडेल.

कॅलेंडर हे दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला लावू शकता. फ्रिज चे दार हे नेहमी पूर्व, उत्तर, ईशान्य दिशेकडे उघडावे. झाडू हा नेहमी नैऋत्य दिशेला असावे.

घरामध्ये जे जड सामान असते ते नैऋत्य दिशेला असावे. हॉल हा वास्तूच्या पूर्व, उत्तर, ईशान्य दिशेला असावे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *