नमस्कार मित्रांनो ,
एक पंजाबी गृहस्थ श्री स्वामी समर्थाकडे येऊन म्हणाले, ‘आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मै आया हूं!’ त्यावर श्री स्वामी उत्तरले, ‘चमत्कार गारूडी के खेल मे नहीं देखें?’ चमत्कार हा श्री स्वामींच्या लीलांचा एक भाग होता. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या.
परंतु केवळ चमत्कारांच्या वर्णनाने एक भाग होता. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. परंतु केवळ चमत्कारांच्या वर्णनाने श्री स्वामी समर्थाच्या जीवनचरित्रास न्याय मिळू शकत नाही. चमत्कार सांगू नयेत असे नाही, मुळात चमत्कार नसतात.
कार्यकारण भावावाचून या निसर्गात कोणतीच गोष्ट घडत नाहीत. जेव्हा एखाद्या गोष्टीमागचा कार्यकारण भाव आपल्याला माहीत नसतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला चमत्कार वाटते. श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते.
त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. पण तो केवळ त्यांच्या साधनेचा एक पैलू होतो, हे वाचकांनी, अभ्यासकांनी व भक्तांनी लक्षात ठेवले पाहिजे. खरे पाहता श्री स्वामींच्या जीवनामध्ये जे जे चमत्कार घडले, त्यावरून त्यांचे मूल्यमापन करू नये.
श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.
कोणीही कोणत्याही धर्मपंथांच्या मार्गाने गेलात तरीही, समाजापुढे एक ‘आदर्श’ राहिला पाहिजे. ‘सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति।’ याचा दाखला श्री स्वामी देत असत. मी कोठून आलो हे सांगताना एकाप्रसंगी ‘माझी जात चांभार, बाप महार आणि महारीण’ असे समर्थानी सांगितल.े जातीभेदांच्या संकुचित कल्पनांना तडा देण्यासाठी त्यांनी भक्तांना दिलेली ही शिकवण होय.
भोंदू लबाड माणसे ही समाजाला लागलेली कीड असून तिचा बंदोबस्त वेळीच करावयास हवा, असं स्वामींचे मत होतं. समाजातील निष्क्रियतेवर ते नेहमीच आघात करीत. ‘आळशी माणसाचे तोंडही पाहू नये’असे स्वामी नेहमी म्हणत.
‘बैलासारखे कष्ट करा’ असा त्यांचा सततचा आग्रह होता. स्वामींचा कर्मवादावर भर होता. कोणी मनात विवंचना करीत बसल्यास, ‘काय रे, तुजजवळ बैल नाहीत काय?’ असा प्रश्न महाराज करीत. ‘मेहनत करून खावे. शेत करून खावे.’ असे ते सांगत. हा कर्मयोग श्री स्वामींनी सातत्याने सांगितला.
संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा. त्यांना शरण जा. गर्वाचा त्याग करा. भजन, पूजन व नामस्मरण करा. जे मिळेल त्यातच तृप्तता माना. सर्वाच्या ठायी आत्मा आहे. परमात्मा आहे. तेव्हा कोणत्याही प्राणीमात्राला काया-वाचा-मने पीडा देऊ नका. असा स्वामींचा आग्रह असे. आपल्या आयुष्यातील सर्व बऱ्या-वाईट घटना ह्या श्री स्वामींच्याच इच्छेने होतात, असे स्वामींचे भक्त मानतात.
त्यामुळे या घटनांच्या फलस्वरूप जे काही भोगावे लागते, त्या सुख-दु:खापासून ते अलिप्त असतात. आपल्या रसाळ वाणीने श्री स्वामी जेव्हा उपदेश करीत तेव्हा ते सांगत की, माझे भक्त मला सर्वस्व अर्पण करून केवळ माझ्याच ठायी मन एकाग्र करून, काया-वाचा-मने माझी उपासना करतात. हे भक्त संसारापासून मुक्त असतात. मातेला तिचे लेकरू जसे प्रिय असते, तसेच मला ते प्रिय असतात.
स्वामींचा भक्त हा कोणाचाही द्वेष न करणारा असतो. सुख-दु:ख एकसारखे मानणारा, क्षमाशील, जगमित्र, तसेच दयाशील असतो. श्री स्वामींकडून काहीही मिळावे असा त्यांचा उद्देश कधीच नसतो.
जे प्रेम श्रीस्वामी भक्तांला देऊ इच्छितात ते त्यांनी प्राप्त केलेले आहे. सद्गुरूंकडून काही मिळाले नाही तरीदेखील, ‘देवाचे देणे’ असा भाव या भक्तांच्या ठिकाणी सतत वास करतो. असा हा निरलस भक्तिभाव श्री स्वामींना भुरळ घालतो व ते मोठय़ा ममतेने आपल्या भक्तांना सांगतात,
‘व्यसनाधीनता समाजाला रसातळात नेते. सत्य, धर्म, व न्यायाचा मार्ग प्रत्येकाने नेहमी अनुसराला पाहिजे.’ परोपकार करण्यासाठी धर्मशाळा बांधा, विहिरी, देवळे, तलाव बांधा असे श्री स्वामी समर्थ सांगत.
त्या काळातील लोक अंध:श्रद्धेच्या फार आहारी जात. या पार्श्वभूमीवर श्री समर्थाचे विचार फारच प्रगत होते. सद्गुरू ज्याच्या पाठीशी असतो व जो भक्त सदगुरूंची आज्ञा शिरसावंज्ञ मानून जीवन जगतो त्याला काहीही कमी पडत नाही. अशा सच्च्या भक्ताच्या जगण्याचे सारे स्वरूपच पालटून जाते.
म्हणतात ना, सत्याची कास धरणाऱ्याचा, सत्याच्या आधारे निर्णय घेणाऱ्याच्या पाठीशी नेहमीच देव असतो. सद्गुरूंचे स्मरण करून चांगल्या कामाची सुरुवात करावी. सद्गुरूंवर विश्वास ठेवला की यश निश्चितच येते. समर्थाच्या सेवकाला यश हे येणारच. पण त्याने हात जोडून स्वस्थ न बसता आपले सामर्थ्य पणास लावले पाहिजे. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताचे सामर्थ्य कमी पडू देत नाहीत.
मनाची शक्ती ही फार मोठी शक्ती आहे. मनाचे मांगल्य, पावित्र्य कायम ठेवण्यासाठी समर्थानी नामस्मरणाचा आग्रह धरला. नामस्मरणाच्या उपासनेद्वारे अनेक जणांना त्यांनी भक्तिमार्गाला लावले.
स्वामी समर्थानी जीवनासंबंधी जो वास्तव दृष्टिकोन आपणांस दिला, त्याचे चिंतन करावे. त्यांच्या जीवनात सर्वत्र अलिप्तता दिसते. याबरोबरच करुणा, संयम, दाक्षिण्य, ऋजुभाव, नि:स्पृहपणा, सत्याची आवड, इ. अनंत सद्गुण जरी आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने उतरला, तर आपले जीवन खरोखरी धन्य होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.